शेअर्स खरेदी विक्री कशी करता येईल?
एकदा का तुमचे खाते उघडून झाले कि तुम्हाला शेअर्स, म्युचुअल फंड, रोखे, आय.पी.ओ. इ. बाबतची माहिती देण्यात येईल. शेअर ट्रेडिंग/गुतंवणूक कशी करावी, शेअर बाजारातून नियमितपणे फायदाच कसा मिळवावा याचे मार्गदर्शन केले जाईल.
४) शेअर्स खरेदी विक्री करताना तुम्हाला काही मार्गदर्शन हवे असल्यास आपण फोन करून केव्हाही माहिती घेऊ शकता.
५) एकदा का व्यवहार (ट्रेड) केला कि तुम्हाला ICICI Securities मार्फत एस.एम.एस./इमेल पाठवला जाईल त्यात तुम्ही केलेल्या ट्रेडचा सारा तपशील दिला जाईल.
६) तुम्ही २४/७ केव्हाही लॉग इन करून तुमच्या खात्याचा सर्व तपशील पाहू शकता किंवा हवे ते रिपोर्टसुद्धा पाहू शकता.
७) तुम्ही जर बाजाराचे वेळेत (सकाळी ९.१५ ते सायंकाळी ३.३० पर्यंत) वेळेअभावी ट्रेडिंग करू शकत नसाल तरी काळजी करण्याचे कारण नाही कारण तुम्ही दिवसाचे कोणत्याही वेळी तुमच्या सवडीनुसार VTC (Valid Till Cancellation) या सुविधेचा वापर करून शेअर्स अथवा अन्य उपलब्ध साधनात खरेदी विक्री ची ऑर्डर देवू शकता, उदा. आज सायंकाळी तुम्ही विविध कंपन्याचे शेअर्सचे भाव टी.व्ही. वर पाहिलेत, मारुतीचा शेअर तुम्हाला खरेदीसाठी आकर्षक वाटला व तुम्ही एका ठराविक दराने मारुती मोटर्स चा शेअर खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही तशी ऑर्डर रात्री झोपण्यापूर्वी केव्हाही लावू शकता अशी दिलेली ऑर्डर १ ते ३ महिने शाबूत राहू शकते व जर या काळात तुम्ही दिलेल्या दाराला जर मारुती मोटर्सच्या शेअरचा भाव कधीही आला तर तो तुमच्या ट्रेडिंग खात्यात घेतला जाईल. समजा तुम्ही आज असणारे दाराचे १०% कमी दराने तो शेअर खरेदी करण्याची ऑर्डर लावली व तो तसा आला कि लगेच तुमच्या खात्यात जमा होईल २ दिवसांनी तो शेअर तुमचे डिमॅट खात्यात जमा होईल यानंतर परत तो १०% वरच्या किमतीने तुम्ही परत विक्रीसाठी VTC ऑर्डर लावली व दर जर १०% शेअरची किंमत वर गेली तर तो शेअर आपोआप विकला जाईल व तुम्हाला फायदा मिळेल. ८) आपण संगणक किंवा मोबाईलचा वापर करून ट्रेडिंग करू शकता.
- Published in Demat