• 9503718779 Sujay
  • 9518 752 605 Sadanand
  • clients.tfs@gmail.com
  • साइन इन
  • साइन अप करा
  • Switch English

Thakur Financial Services

  • पहिले पान
  • आमच्या बाबत
  • म्युचुअल फंड
    • ऑनलान गुंतवणूक करा
    • म्युचुअल फंडाबाबत
    • म्युचुअल फंडाचे प्रकार
      • समभाग आधारित
      • कर्जरोखे आधारित
      • करबचतीच्या योजना
    • गुंतवणूक
    • शेअरबाजार
      • भांडवली बाजार
      • फ्युचर्स
      • ऑप्शन
    • डिमॅट खाते
    • उत्पादने
    • सेवा व सुविधा
  • विमा
  • आयकर
  • लेख
  • डाउनलोड
  • म्युच्युअल फंड ऑनलाईन
    • ऑनलान व्यवहार करा
  • संपर्क करा

बँकिंग फंड्स

Tuesday, 22 January 2019 by Sadanand Thakur

क्षेत्रीय बँकिंग फंड्स योजनेत ऑनलान गुंतवणूक करा

आम्ही येथे क्षेत्रीय बँकिंग फंड्स प्रकारातील काही आघाडीच्या योजना देत आहोत, यामध्ये तुम्ही ऑनलान गुंतवणूक करू शकता.

योजनेचे नांवरजिस्ट्रेशन कराऑनलान गुंतवणूक करालॉगीन मागणी करा
ABSL Banking & Financial Services Fundऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
IDBI Banking & Financial Services Fund ऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
LIC MIF Banking & Financial Services Fund ऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
ICICI Pru Banking & Financial Services Fund ऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
TATA Banking & Financial Services Fund ऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
Sundaram Financial Services Opportunities Fundऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
Reliance Banking Fundऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
SBI Banking & Financial Services Fund ऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
UTI Banking & Financial Services Fund ऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com

सूचना:

  • जर तुम्ही प्रथमच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक असाल तर तुम्हाला प्रथम आमच्या मार्फत एकदाच रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल. हि तुम्ही ऑनलान करू शकता किंवा आमच्याकडे फॉर्मची मागणी करूनही करू शकता.
  • जर तुम्ही यापूर्वी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुम्ही तुमचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड वापरून ऑनलान गुंतवणूक करू शकता.
  • जर तुम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले असेल मात्र तुमच्याकडे लॉगीन डीटेल्स नसतील तर तुम्ही आमच्याकडे लॉगीनची मागणी करा, आम्ही तसे तयार करण्याची सूचना देऊ तुम्हाला MFU कडून एक इमेल येईल त्यात दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करू शकता. याचा वापर करून तुम्ही ऑनलान गुंतवणूक किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकता.

बँकिंग फंड्स हे क्षेत्रीय प्रकारातील गणले जातात. या योजनेतील पैसे हे सर्व प्रकरच्या बँक्स, एनबीएफएसी या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवले जातात. व्याज दरातील बदलांचा मोठा परिणाम होतो. तसेच NPA वगैरे बाबींचा परिणाम होतो. बँकिंग क्षेत्र हे फारच संवेदनाशील क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रातील शेअर्सच्या किंमतीवर बऱ्याच गोष्टीचा प्रभाव पडतो. मात्र एक गोष्ट त्रिकालबाधित सत्य आहे कि जर संपूर्ण उद्योग क्षेत्र जेव्हा वार्षिक १०% दराने वाढत असते तेव्हा बँकिंग क्षेत्रातील शेअर्स हे २०% ते ३०% दराने वाढत असतात. क्षेत्रीय योजना असल्यामुळे फार मोठी जोखीम असते. नियमितपणे आपल्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवावे लागते. जर तुम्हाला शेअरबाजाराची पुरेशी जाण असेल, क्षेत्रीय फंडाच्या जोखीमीची माहिती असेल तरच तुम्ही क्षेत्रीय योजनेत गुंतवणूक करा अन्यथा क्षेत्रीय फंडात गुंतवणूक करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या डायव्हर्सीफाईड योजनेत गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी करा.

शेअर बाजार जेव्हा खाली येतो तेव्हा सर्वच कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी होतात मात्र मंदी नंतर जेव्हा तेजी येते तेव्हा लवकरच झालेले नुकसान भरून येऊ शकते.

मंदीचा कालावधी कमी असतो व तेजीचा कालावधी जास्त असतो.

श्रद्धा और सबुरी या साईबाबांच्या वचनावर विश्वास ठेवून जर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर प्रत्येकालाच चांगला फायदा होऊ शकतो.

दीर्घ मुदतीत शेअर बाजार निश्चितच वर जात असतो.

#Banking FundsAbout banking funds in Marathimutualfundmarathi.com
Read more
  • Published in Invest Online
No Comments

व्हॅल्यू फंड्स

Tuesday, 22 January 2019 by Sadanand Thakur

व्हॅल्यू फंड्स योजनेत ऑनलान गुंतवणूक करा

आम्ही येथे व्हॅल्यू फंड्स प्रकारातील काही आघाडीच्या योजना देत आहोत, यामध्ये तुम्ही ऑनलान गुंतवणूक करू शकता.

योजनेचे नांवरजिस्ट्रेशन कराऑनलान गुंतवणूक करालॉगीन मागणी करा
ABSL Pure Value Fundऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
Kotak India EQ Contra Fundऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
HDFC Capital Builder Value Fundऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
ICICI Pru Value Discovery Fundऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
Templeton India Value Fundऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
L&T India Value Fundऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
Reliance Value Fundऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
SBI Contra Fundऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
UTI Value Opportuninties Fundऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com

सूचना:

  • जर तुम्ही प्रथमच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक असाल तर तुम्हाला प्रथम आमच्या मार्फत एकदाच रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल. हि तुम्ही ऑनलान करू शकता किंवा आमच्याकडे फॉर्मची मागणी करूनही करू शकता.
  • जर तुम्ही यापूर्वी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुम्ही तुमचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड वापरून ऑनलान गुंतवणूक करू शकता.
  • जर तुम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले असेल मात्र तुमच्याकडे लॉगीन डीटेल्स नसतील तर तुम्ही आमच्याकडे लॉगीनची मागणी करा, आम्ही तसे तयार करण्याची सूचना देऊ तुम्हाला MFU कडून एक इमेल येईल त्यात दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करू शकता. याचा वापर करून तुम्ही ऑनलान गुंतवणूक किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकता.

व्हॅल्यू फंड्स हे एक प्रकारे मल्टी कॅप प्रकारातीलच योजना असतात या डायव्हर्सीफाईड योजना मानल्या जातात कारण या योजनेतील पैसे हे मोठ्या (पहिल्या १००), मध्यम (१०१ ते २५०) आणि छोट्या (२५१ पासून पुढील साऱ्या) कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. बाजारातील काळानुसार यातील मालमत्तेचे वर्गीकरण केले जाते. मात्र या प्रकारातील योजनेतील गुंतवणूक हि अश्या शेअर्स मध्ये केली जाते कि ज्या शेअर्सच्या किंमती या तुलनेने कमी झालेल्या असतात व त्या भविष्यात चांगल्या वाढू शकतात असे निधी व्यवस्थापकाचे मत असते. या प्रकारातील योजनेत मल्टी कॅप योजनेपेक्षा जास्त जोखीम असते म्हणून नवीन गुंतवणुकदाराने शक्यतो या योजनेत गुंतवणूक करू नये. जर तुमचे गुंतवणुकीचा कालावधी १० वर्षांपेक्षा जास्त असेल तरच अशा योजनेत गुंतवणूक करावी.

शेअर बाजार जेव्हा खाली येतो तेव्हा सर्वच कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी होतात मात्र मंदी नंतर जेव्हा तेजी येते तेव्हा लवकरच झालेले नुकसान भरून येऊ शकते.

मंदीचा कालावधी कमी असतो व तेजीचा कालावधी जास्त असतो.

श्रद्धा और सबुरी या साईबाबांच्या वचनावर विश्वास ठेवून जर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर प्रत्येकालाच चांगला फायदा होऊ शकतो.

दीर्घ मुदतीत शेअर बाजार निश्चितच वर जात असतो.

about Value Funds in marathimutualfundmarathi.com
Read more
  • Published in Invest Online
No Comments

स्मॉल कॅप योजना

Tuesday, 22 January 2019 by Sadanand Thakur

स्मॉल कॅप फंड्स योजनेत ऑनलान गुंतवणूक करा

आम्ही येथे स्मॉल कॅप प्रकारातील काही आघाडीच्या योजना देत आहोत, यामध्ये तुम्ही ऑनलान गुंतवणूक करू शकता.

योजनेचे नांवरजिस्ट्रेशन कराऑनलान गुंतवणूक करालॉगीन मागणी करा
ABSL Small Cap Fundऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
Franklin India 
Smaller Companies Fund
ऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
HDFC Small Cap 
Fund
ऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
ICICI Pru 
Smallcap Fund
ऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
Kotak 
Smallcap Fund
ऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
L&T India Emerging Business Fundऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
Reliance Small
Cap Fund
ऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
SBI Smallcap
Fund
ऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com
Sundaram Smallcap Fundऑनलान 
रजिस्ट्रेशन करा
ऑनलान गुंतवणूक कराclients.tfs@gmail.com

सूचना:

  • जर तुम्ही प्रथमच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक असाल तर तुम्हाला प्रथम आमच्या मार्फत एकदाच रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल. हि तुम्ही ऑनलान करू शकता किंवा आमच्याकडे फॉर्मची मागणी करूनही करू शकता.
  • जर तुम्ही यापूर्वी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुम्ही तुमचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड वापरून ऑनलान गुंतवणूक करू शकता.
  • जर तुम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले असेल मात्र तुमच्याकडे लॉगीन डीटेल्स नसतील तर तुम्ही आमच्याकडे लॉगीनची मागणी करा, आम्ही तसे तयार करण्याची सूचना देऊ तुम्हाला MFU कडून एक इमेल येईल त्यात दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करू शकता. याचा वापर करून तुम्ही ऑनलान गुंतवणूक किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकता.

स्मॉल कॅप योजनेतील गुंतवणूक हि देशातील पहिल्या २५१ व त्यापुढील लहान भांडवली आकारच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये केली जाते यामुळे अशा योनेत केलेली गुंतवणूक हि तुलनेने जास्त जोखीमीची मानली जाते.

या लहान कंपन्या असल्यामुळे त्या बुडण्याची किंवा बंद होण्याची शक्यता असते.

शेअर बाजार जेव्हा खाली येतो तेव्हा या लहान कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती फारच जास्त प्रमाणात कमी होतात मात्र मंदी नंतर जेव्हा तेजी येते तेव्हा झालेले नुकसान भरून येण्यासाठी बराच काळ जाऊ शकतो कधी कधी तर २/३ वर्षांचा काळसुद्धा नुकसान भरून येण्यासाठी लागू शकतो. ज्यांना या जोखीमीची माहिती असेल त्यांनीच या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करावी. नवीन गुंतवणूकदराने शक्यतो या प्रकारातील योजनेत गुंतवणूक करू नये.

mutualfundmarathi.comSmall Cap Funds information in Marathi
Read more
  • Published in Invest Online
No Comments

१९. पोर्टफोलिओचे पुनरावलोकन

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

१९. पोर्टफोलिओचे पुनरावलोकन

पोर्टफोलिओ व्यवस्थापन हि एक नियमितपणे चालू असणारी प्रक्रिया आहे ज्यामध्ये नियमितपणे आपल्या सर्व गुंतवणुकीचे पुनरावलोकन करावे लागते. आपल्या पोर्टफोलिओ मध्ये असणाऱ्या प्रत्येक शेअर्स, रोखे यांच्या कामगिरीचे मूल्यांकन नियमितपणे तपासून त्याच्या खरेदी अथवा विक्रीचा निर्णय नियमितपणे घ्यावा लागतो. अर्थात आपल्या पोर्टफोलो मध्ये असलेल्या एकूण गुंतवणूक रक्कम, त्याचा आकार आणि कोणत्या प्रकारचे साधन पोर्टफोलिओ मध्ये आहे यानुसार किती वेळा पोर्टफोलिओचे पुनरावलोकन केले पाहिजे हे अवलंबून असते. यासाठी तुम्ही किती वेळ देता यावर तुम्हाला मिळणारा परिणाम अवलंबून असतो. जर तुम्ही जास्त वेळ दिला, तुम्हाला जास्त चांगला परिणाम मिळू शकतो. जर तुमचा पोर्टफोलिओ मोठा असेल तर, किमान ज्यावेळी बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता असेल तेव्हा तुम्ही दिवसातून एक तास तरी यासाठी दिला पाहिजे. जेव्हा बाजार स्थिर असेल तेव्हा तुम्ही आठवड्यातून एखादा दिवस यासाठी दिला तरी चालू शकेल.  यासाठी नियमितपणे बाजारातील उलाढालीवर लक्ष ठेवले पाहिजे.

पहा, विश्लेषण करा आणि आवश्यकता असेल तर बदल करा

तुमचा पोर्टफोलिओ नीट काळजीपूर्वक तपासा, त्याचे योग्य प्रकारे विश्लेषण करा आणि जर गरज असेल तरच त्यातील काही शेअर्स विका आणि दुसरे नवीन शेअर्स खरेदी करा. मात्र थोडे नुकसान झाले किंवा फायदा झाला म्हणून उगाच कारणाशिवाय तुमच्या पोर्टफोलिओ मधिल शेअर्स विकू नका, कारण असे करण्याने तुम्ही तुमचे भविष्यात होणाऱ्या फायद्यात नुकसान करून घेता. वारंवार शेअर्सची खरेदी विक्री करून तुम्ही उगाच कारणाशिवाय जास्त कर भरता दुसरे म्हणजे उगाच तुमच्या ब्रोकरला फायदा (ब्रोकरेज देऊन) करून देत असता. वारंवार खरेदी विक्री करणारा ट्रेडर ब्रोकरला नेहमीच प्रिय असतो कारण तुम्हाला फायदा होउदे किंवा नुकसान त्याला तुम्ही केलेल्या उलाढालीवर ब्रोकरेज मिळणारच असते.

खालील बाबी नेहमी तपासूनच निर्णय घ्या:

१) जर तुमच्या शेअर्सचे उत्पन्न अपेक्षेप्रमाणे असेल व ते जर वाढत असेल तर शेअरची किंमत थोडी बहुत कमी जास्त झाली किंवा ती वाढली नाही तरी तो विकू नका तर त्याला सांभाळून ठेवा. कारण कोणत्याही शेअरची किंमत वाढण्यामागे प्रतिशेअर कमाई हे एक महत्वाचे कारण असते. सयंम हा बहुमोल आहे म्हणूनच तो दुर्मिळ आहे, सयंम पाळलात तर त्याचे मोठे बक्षीस तुम्हालाच मिळणार हे कायम लक्षात ठेवले पाहिजे.

२) जर तुम्ही असा विचार करत असाल की  आत्ता चांगला फायदा झालेला आहे तेव्हा आपल्याकडील फायद्यात असणारा शेअर विकूया आणि तो परत खाली आला की परत विकत घेऊ. या प्रकारे विचार करण्यात दोन प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. एक तुम्ही दोन वेळचे ब्रोकरेज देता (एकदा विकताना आणि परत खरेदी करताना) आणि दुसरे म्हणजे तो शेअर सतत वाढत गेला तर तो तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करता येणार नाहीच आणि नंतर जर खरेदी करावयाचा झाला तर जास्त किंमतीत खरेदी करावा लागेल आणि किंमत वाढण्याचा तुम्हाला फायदा काहीच मिळणार नाही.

३) बाजारात खरेदीची योग्य वेळ ठरवण्यात उगाच तुमचा वेळ व्यर्थ घालवू नका कारण या जगात ते परिपूर्णपणे कोणालाच जमत नसते.

४) मात्र जर तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये जर एखाद्या क्षेत्रातीलच अनेक शेअर्स असतील तर त्या क्षेत्रावर नियमित नजर हि ठिवावीच लागते व परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो.

५) जर तुमची गुंतवणूक मोठी असेल तर किमान ५ क्षेत्रात ती विभागलेली असली पाहिजे व किमान १० शेअर्स तरी तुमच्या पोर्टफोलिओ मधे असले पाहिजेत याची काळजी घ्या.

६) मग्जला काही प्रकरणात दिलेल्या रेशोंप्रमाणे तुमच्या पोर्टफोलिओचे विश्लेषण करा आणि नंतरच कोणताही निर्णय घ्या, घाई घाई मध्ये कोणताही निर्णय घेतल्यास तो चुकण्याचीच जास्त शक्यता असते हे नेहमी लक्षात ठेवा.

mutualfundmarathi.comPortfolio Evaluation read in Marathi. How to track your portfolio read in Marathi.
Read more
  • Published in Capital Market
No Comments

१८. वयानुसार पोर्टफोलिओ

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

१८. वयानुसार पोर्टफोलिओ

आपण मागील लेखात पहिले आहेच कि आपली गुंतवणूक हि गुंतवणुकीच्या विविध साधनात गुंतवून आपण जोखीम कमी करू शकतो सोबत आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवू शकतो. आपला पोर्टफोलिओ कसा तयार करावा याचे नियोजन प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार आणि त्याच्या जोखीम स्विकारण्याच्या क्षमतेनुसार करावे लागते. मात्र सर्वसाधारणपणे जर सांगावयाचे झाले तर आपल्या सध्याच्या वयानुसार गुंतवणूक कशी करावी याचे येथे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. असे मानले जाते कि जेवढे वय कमी तेव्हढा आपल्याकडे कालावधी जास्त असतो म्हणून कमी वयात जास्त जोखीम असणाऱ्या साधनात जास्त गुंतवणूक करून जास्तीत जास्त फायदा मिळवावा आणि जसे वय वाढत जाईल तसे जोखमीच्या साधनातील गुंतवणूक कमी कमी करत न्यावी व ती सुरक्षित साधनात वाढवत न्यावी असे एक सर्वमान्य सूत्र आहे.

खालील टेबलचा वापर करून तुम्ही निर्णय करू शकता:

वय पोर्टफोलिओ
३० पेक्षा कमी 80% शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स  
10% रोख (लिक्विड फंड्स)
10% एफडी किंवा रोखे
३० ते ४० 70% शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स
10% रोख (लिक्विड फंड्स)
20% एफडी किंवा रोखे
४० ते ५०60% शेअर्स आणि म्युच्युअल फंड्सs
10% रोख (लिक्विड फंड्स)
30% एफडी किंवा रोखे
५० ते ६०50% शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स
10% रोख (लिक्विड फंड्स)
40% एफडी किंवा रोखे
६० पेक्षा जास्त 40% शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स
10% रोख (लिक्विड फंड्स)
50% एफडी किंवा रोखे

तुम्ही तुमच्या जोखीम स्विकारण्याच्या तयारीनुसार आणि किती कालावधीसाठी गुंतवणूक करावयाची आहे व तुम्हाला काय दराने तुमच्या गुंतवणुकीवर वार्षिक परतावा मिळावा यावर अवलंबून तुम्ही यामध्ये बदल करू शकता. एक लक्षात ठेवले पाहिजे

जास्त जोखीम = जास्त फायदा किंवा जास्त नुकसान होण्याची शक्यता.

मध्यम जोखीम = माफक फायदा किंवा माफक नुकसान होण्याची शक्यता.

कमी जोखीम = कमी फायदा किंवा कमी नुकसान होण्याची शक्यता.

मात्र एक गोष्ट निश्चितपणे प्रत्येकाने केलीच पाहिजे कि महागाईवर मात करून दीर्घ मुदतीत जास्त फायदा मिळण्यासाठी काही रक्कम हि शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडाच्या समभाग आधारित योजनेत गुंतवलीच पाहिजे.  हा नियम प्रत्येकालाच लागू होतो मग तुमचे वय कितीही असुदे याचे कारण फक्त शेअरबाजारातूनच सर्वाधिक परतावा मिळू शकतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही एफडी किंवा रोख्यात गुंतवणूक करता तेव्हा हि काळजी घेतली पाहिजे कि प्रत्येकाची मुदतपूर्तीची वेळ वेगवेगळी असेल यामुळे तुमचा कॅश फ्लो प्रवाही राहील.

आणि महत्वाचे म्हणजे कायम नियमितपणे थोडी का होईना गुंतवणूक करत राहावे ज्याचा उपयोग भविष्यात होत असतो.

mutualfundmarathi.comPortfolio As per age read in Marathi. How to track your portfolio read in Marathi.
Read more
  • Published in Capital Market
No Comments

१४. अनेक क्षेत्रातील सवलतीत असणारे शेअर्स – सौदा करून विकत घ्या

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

१४. अनेक क्षेत्रातील सवलतीत असणारे शेअर्स – सौदा करून विकत घ्या

बाजारात अनेकवेळा काही चांगले शेअर्स अगदी कमी किंमतीमध्ये उपलब्ध असतात, जे सध्या अनेकांचे नावडते झालेले असतात. असे स्टॉक शोधण्याची एक चांगली पद्धत असते.

१) प्रथम असे शेअर्स शोधा कि काही तात्कालिक कारणामुळे ज्यांच्या किंमती कमी झालेल्या असतात व जे स्टॉक विकत घेण्यास बहुतांशी अल्पकालीन गुंतवणूकदार इच्छुक नसतात.

२) वरीलप्रमाणेच तर्क लढवून असे पहा कि एखाद्या कोणत्या क्षेत्रातील बहुतांशी स्टॉक या प्रकारात मोडत आहेत ते पहा. म्हणजेच किंमत कमी झाली आहे व दुर्लक्षित आहेत.

३) आता यातील काही शेअर्स तुम्ही तुमच्या “अवलोकनाच्या यादीत” समाविष्ट करा. हे असे करण्यासाठी खालील घटक विचारात घ्या:

पी/इ रेशो (Price to Earnjng Ratio): यासाठी कमीत कमी १० व जास्तीत जास्त ३० शेअर्स निवडा, ज्यांचा सध्याचा पी/ई ३० च्या जवळपास असला पाहिजे. बरेच वेळा कमी पी/इ असणारा शेअर हा अल्पकालीन गुंतवणूकदार खरेदी करण्यासाठी इच्छुक नसतात, म्हणून दुर्लक्षित असतो. आता अशा शेअर्स बाबत आघाडीचे विश्लेषक काय म्हणतात ते तपासून पहा. यासाठी तुम्ही एखादया चांगल्या मोठ्या ब्रोकरच्या संकेतस्थळावर हि माहिती पाहू शकता. उदा. ICICIDIRECT चे संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊन हे पाहू शकता.

किंमत-विक्री गुणोत्तर (Price to Sales Ratio):  याला PSR असेही संबोधले जाते. ह्याचा वापर स्टॉकचे सूक्ष्म विश्लेषण करण्यासाठी केला जातो. बरेच गुंतवणूकदार ज्या शेअरचा  PSR १ पेक्षा कमी असतो तो गुंतवणुकीसाठी चांगला शेअर मानत असतात. यासाठी मी जास्तीत जास्त 0.5 चा PSR आणि कमीत कमी कोरी जागा सोडून शेअर्स शोधतो. मात्र हे करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे कारण अनेकवेळा कमी PSR असणारे बरेच शेअर्स असू शकतात. याचा वापर करून आपण असे शेअर्स शोधू शकतो कि ज्यांची पूर्वी बरीच जास्त किंमत होती मात्र सध्या काही तात्कालिक कारणामुळे त्या शेअर्सची किंमत कमी झालेली असते.

कमाई मधील वाढीचा दर (Earnings Growth): अशी कंपनी पहा कि जिच्या वार्षिक कमाईचा दर हा २०% पेक्षा जास्त आहे. जर एखादया कंपनीचा Earnings Growth दर हा २०% पेक्षा जास्त व सोबत पी/ई १०% किंवा कमी असेल तर ती गुंतवणुकीची उत्तम संधी असू शकते. याला PEG किंवा PE to Growth रेशो असे म्हटले जाते. हुशार गुंतवणूकदार १ पेक्षा कमी PEG असणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. समजा वरील उदाहरणा प्रमाणे P/E १० / EG २० आहे तर PSR ०.५ होतो.

भांडवलावरील परतावा (Return on Equity): अशा कंपनीचे शेअर्स शोधा कि जे भांडवलावर वार्षिक २०% पेक्षा जास्त परतावा देत असतात. यामुळे तुम्हाला समजू शकते कि तुमच्या गुंतवणुकीवर किती दराने परतावा मिळू शकतो. जेवढा जास्त परतावा तेवढा तो शेअर खरेदी करण्यासाठी चांगला हे समजून जा.

वरीलप्रमाणे सर्व रेशोंचे एकत्रित विश्लेषण करून तुम्ही शेअर्स खरेदीचा योग्य निर्णय करू शकता. हे विश्लेषण करून झाल्यावर निरनिराळ्या आर्थिक संकेतस्थळावर जाऊन संबंधित कंपनीबाबतची माहिती गोळा करा आणि त्यानंतर योग्य किंमतीत शेअर्स खरेदी करा आणि शांत बसा. पैसा आपोआप तुमच्यासाठी काम करू लागेल.

About buy at a bargain in shares read in marathimutualfundmarathi.com
Read more
  • Published in Capital Market
No Comments

५. तुमचे उदिष्ठ सुरुवातीलाच निश्र्चित करा

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

प्रकरण ५ वे

५. तुमचे उदिष्ठ सुरुवातीलाच निश्र्चित करा

गुंतवणूकीचे उदिष्ठ

ज्या गुंतवणूकीमधून दिर्घ मुदतीत चांगला परतवा मिळेल अशा गुंतवणूकीच्या साधनाची निवड अत्यंत काळजीपुर्वक केली पाहिजे. अल्प काळाचा विचार गुंतवणूक करताना करणे हा तद्दन मुर्खपणाच आहे. मुख्यत्वेकरुन जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तेव्हा तुम्ही दिर्घ काळाचाच विचार करणे तुमच्या हिताचे होईल. शेअर बाजारात नेहमीच शेअर्सच्या किंमती अत्यंत वेगाने वर खाली होत असतात. सुरुवात करताना किमान ३ ते ५ वर्षाचे उदिष्ठ ठेऊन गुंतवणूकीची सुरुवात करा. त्यासाठी प्रथमत: तुम्ही स्वत:लाच ओळखण्यास सुरुवात करा.

तुम्ही तुमच्या गुंतवणूकीपासून काय मिळवू इच्छित आहात?

नियमीत उत्पन्न, मुद्दलात वाढ कि दोन्ही गोष्टी मिळवू इच्छीत आहात हे ठरवा.

आता तुम्ही किती जोखीम स्विकारण्यासाठी तयार आहात?

प्रत्येकाची जोखीम स्विकारण्याची मानसीकता सारखी असू शकत नाही त्यामुळे काही व्यक्ती बाजारात गुंतवणूक केल्यानंतर जर नुकसान झाले तर लगेच शेअर्स विकून बाजाराला राम राम करतात, यामध्ये अनैसर्गीक असे काहीच नाही. मात्र अशी प्रवृत्ती असणाऱ्या माणसाने शेअरबाजारात गुंतवणूक न करणेच इष्ट असते. कोणत्याही व्यवसायात नफा व नुकसान हे होतच असतेच. जेथे जास्त फायदा मिळण्याची शक्यता असते तेथे नुकसानही जास्तच होऊ शकते. शेअर बाजाराचा दोनशे वर्षाचा इतिहास पाहिल्यास असे दिसून येते कि अनेकवेळा शेअर बाजार ६०% पेक्षा जास्त कोसळलेला आहे हि जशी वस्तुस्थीती आहे त्याचप्रमाणे ज्यानी ज्यानी चांगल्या कंपन्याच्या शेअर्समध्ये दिर्घकाळासाठी गुंतवणूक केली आहे त्या सर्वानाच अतिशय उत्तम फायदा झालेला आहे. म्हणूनच शेअर बाजारात तुम्हाला उतरावयाचे असेल तर तुम्ही दिर्घकाळासाठीच गुंतवणूक करणे व ती नियमीतपणे करणे हेच अंतीमत: योग्य ठरु शकते. तुम्हाला माहित असेलच कि बेंजामीन ग्राहम व वॉरेन बफेट सारख्या यशस्वी गुंतवणूकदारानी शेअर बाजारातून अमाप उत्पन्न मिळवले पण त्यानी कंपनीच्या फंडामेंटलमध्ये बदल झाला तरच त्यांची त्या कंपनीतील गुंतवणूक काढून त्यांच्या पोर्टफोलीओमध्ये बदल केलेला आहे. जर का तुम्हाला एकदा हे समजले कि आपल्याला आपल्या गुंतवणूकीपासून किती फायदा होऊ शकतो तरच काही तासात, दिवसात, आठवड्यात, माहिन्यात किंवा अगदी २ ते ३ वर्षातसुध्दा तुम्ही घेतलेल्या शेअरची किंमत कमी अथवा जास्त झाली तरी तुम्ही विचलीत होणार नाही. शेअर बाजारात गुंतवणूकीची सुरुवात करताना म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी योजनेपासून सुरुवात करणे केव्हाही चांगले असते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन तज्ञ व्यक्तींव्दारे केले जाण्याची सुवीधा मिळते. जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला दिसून येईल कि म्युच्युअल फंडाच्या अनेक योजनानी गेल्या २५ वर्षात वार्षीक सरासरी १५% ते ३०% परतावा तोही चक्रवाढ पध्दतीने दिलेला आहे. परत यात आपल्याला काही व्यवस्थापन करावे लागत नाही. तुमचा गुंतवणूक सल्लागार यासाठी म्युच्युअल फंडाची चांगली योजना निवडण्यास मदत करत असतो. मात्र जर का बाजारातील चढ-उतार, अस्थीरता या गोष्टींचे तुम्हाला वावडे असेल तर तुम्ही निश्र्चित उत्पन्न साधनात गुंतवणूक करणेच योग्य होईल.

आर्थीक नियोजन व उदिष्ठ ठरवीणे:

गुंतवणूकीसाठी शिस्तबध्द नियोजन व कोणत्या उदिष्ठपुर्तीसाठी गुंतवणूक करावयाची या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. यासाठी प्रथमत: तुम्ही तुम्हालाच काही प्रश्र्न विचारा:

मी कीती काळ नियमीत गंतवणूक करु शकतो? याचा अर्थ तुम्ही गुंतवणूकीची सुरुवात करत असताना तुमचे सध्याचे वय काय आहे व तुम्ही तुमच्या वयाच्या कितव्या वर्षापर्यंत नियमीत गुंतवणूक करु शकता या मधील काळ हा तुमचा गुंतवणूकीचा काळ असतो. दुसरे महत्वाचे म्हणजे तुम्ही कोणत्या कारणासाठी गुंतवणूक करत अहात हेही महत्वाचेच आहे. कारण काहीही असू शकते जसे कि घर/गाडी घेणे, गृह कर्ज घेताना स्वत:चा हिस्सा निर्माण करणे, दुसरे घर/प्रॉपर्टी घेणे, मुलांचे शिक्षण/लग्न, मोठ्या ट्रिपला जाणे, निवृत्तीनंतरची सोय इ.

याचबरोबर अल्प मुदतीत आपली कोणती आर्थीक गरज भागवावी लागणार आहे याचा सुध्दा विचार करणे अत्यावश्यक असते.

तुमची उदिष्ठ ठरवताना ती उदिष्ठ पुर्ण होण्यासाठी नियमीतपणे किती गुंतवणूक तुम्ही करु शकता याचा नीटपणे विचार करा. उदिष्ठपुर्तीचा कालावधी सुध्दा नीटपणे निश्र्चित करा. यामुळे तु्म्ही तुमच्या गुंतवणूकीचे चांगल्याप्रकारे नियोजन करु शकाल.

काळ तुम्हाला अनुकूल आहे काय?

तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही किती काळ देऊ शकता? रोज काही तास कि महिन्यातील काही तास हेही महत्वाचे आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे तुम्हाल पैसे केव्हा लागणार आहेत यावरच गुंतवणूकीचा कोणता प्रकार तुम्ही निवडला पाहिजे हे अवलंबून असते. यासाठी गुंतवणूकीच्या विवीध प्रकारातून मागील काळात कसा परतावा मिळाला आहे हे तुम्ही तपासले पाहिजे. मिळणा-या परताव्यावर कर दायित्व आहे कि नाही याचाही विचार करणे महत्वाचे असते. जर का तुम्हाला पैसे १० वर्षानंतर किंवा त्यापेक्षा जास्त काळाने मिळून चालणार असतील तर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारात गुंतवणूक केली पाहिजे. जर का तुम्हाला पुढील १ ते ३ वर्षात पैसे लागणार असतील तर तुम्ही बॉण्ड फंडात गुंतवणूक करणे योग्य होईल. जर का तुम्हाला २ वर्षापेक्षा कमी काळात पैसे लागणार असतील तर तुम्ही अल्प मुदतीच्या बॉण्ड फंडात किंवा एफएमपीमध्ये गुंतवणूक करणे योग्य होईल. जर तुम्हाला १ वर्षापेक्षा कमी काळात पैसे लागणार असतील तर तुम्ही लिक्वीड फंडात किंवा बँक ठेवीत गुंतवणूक करणे योग्य होईल.

गुंतवणूकीचे नियोजन

एकदा का तुमचा गुंतवणूक सुरु करण्याचा निर्णय झाला कि प्रथमत: हे ठरवा कि तुम्ही किती पैशाची गुंतवणूक करु शकता. आता तुम्ही किती रक्कम प्रथमत: एकरकमी गुंतवू शकता ते पहा. यानंतर पुढे दरमहा नियमीत किती पैसे गुंतवणूकीसाठी बाजूला काढू शकता ते निश्चित करा. उत्पन्नाचे साधन कसे आहे, ते दरमहा ठरावीक आहे कि अनियमीत आहे हि गोष्ट सुध्दा तपासली पाहिजे. तुम्ही अचानक उभ्दवणा-या गरजेसाठी तरतुद केली आहे याची खात्री करा. एकदा का निर्णय झाला कि तुमच्या उदिष्ठाना पुर्ण करण्यासाठी तुमच्या गुंतवणूकीची सुरुवात करा व घेतलेल्या निर्णयाला चिकटून रहा. विचलीत होऊ नका.

Decide your goals read in Marathimutualfundmarathi.comRead about your goal in Marathi. understand mutual funds and share market in Marathi. Learn about stock/share market in Marathi also decide your goal
Read more
  • Published in Capital Market
No Comments

भविष्याची तरतुद

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

भविष्याची तरतूद:

भविष्याची तरतूद करण्यास म्युच्युअल फंडात नियमित व दीर्घकाळ गुंतवणूक करीत राहणे हाच एक उत्तम पर्याय आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊन ताबडतोब सुरुवात करा.

तरुणपणात मौज मजेसाठी खर्च करण्याची मनोवृत्ती असतेच त्यात काही चूक आहे असं आम्ही म्हणत नाही मात्र थोडीशी काटकसर करून व अनावश्यक खर्चात थोडी कपात करून तुम्ही जर म्युच्युअल फंडात नियमितपणे गुंतवणूक केलीत तर तुमच्या अचानक उद्भवणा-या गरजांना या बचतीचा उपयोगच होईल.

बाजाराचे पुढील अगदी पांच वर्षांचेसुद्धा भविष्य कोणीच करू शकत नाही. जो कोणी असे सांगतो तो कदाचित जास्त आशावादी असेल.  बाजारात गुंतवणूक करताना ती नियमितपणे व काही दशकांसाठी करत रहाण्याराला मात्र उत्तमोत्तम परतावा मिळतो.  गुंतवणूक करताना शक्यतो वर्षांचा विचार करू नका, किमान एक दशकाचा व शक्यतो दोन/तीन दश्कांचाच विचार करा. तुम्ही जर नोकरी करत असाल तर जेवढी वर्षे तुम्हाला निवृत्त होण्यासाठी असतील तेवढी वर्षे नियमित गुंतवणूक करत रहा. जर वार्षिक २०% पेक्षा चाक्रवाढीने फायदा झालेला असेल तर त्यातली काही रक्कम काढून आपल्या गरजा, हौस/मौज जरूर पूर्ण करा.

Learn provision for future in Marathimutualfundmarathi.comRead about provision for future in MarathiServices offered by Thakur Financial Servicesstock/share market in MarathiUnderstand provision for future investment
Read more
  • Published in Articles
No Comments

गुंतवणूक कशी करावी?

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

सध्याचे परिस्थितीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी?

जर आपण अवलोकन केले तर असे दिसून येते कि गेल्या  दिड वर्षात सेन्सेक्स १८००० पासून जवळपास २९००० पर्यत वर गेलेला आहे अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यात काय फायदा असा विचार अनेकांच्या मनात येत असतो. बाजार १५ हजार असताना गुंतवणूक केली  असती तर बरे झाले असते मग गुंतवणूक यात करावी कि नाही असे वाटणे सहाजीकच आहे. पण ज्याना दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची आहे त्यानी ती केव्हाही सुरु करावी असा नियम आहे. 

अर्थशास्त्राच्या नियमानुसार कोणत्याही वस्तुची किंमत जेव्हा वर जाते तेव्हा ती परत खाली येतेच व परत जेव्हा खाली येते तेव्हा ती नंतर परत वर जातेच. जेव्हा सर्वच लोकांना एखादी वस्तू काहि कारणाने महाग होईल असे वाटू लागते तेव्हा बरेच लोकं ती वस्तू खरेदी करण्यासाठी उताविळ होतात व त्या वस्तूची किंमत वाढू लागते या उलट जेव्हा सर्वानाच वाटू लागते कि आता आपणाजवळ असणारी वस्तूची किंमत कमी होणार आहे व ते सारेच ती विकण्याच्या मागे लागतात व किंमत कमी होऊ लागते. अर्थशास्त्राचा दुसरा नियम हा वस्तूची किंमत हि वस्तूच्या मागणी व उपलब्धतेवर अवलंबून असते, जेव्हा बाजारात एखाद्या वस्तुची उपलब्धता कमी असते व तिची मागणी जास्त असते तेव्हा तीची किंमत वाढते व उपलब्धता जास्त झाली व मागणी कमी झाली कि किंमत कमी होते. हे चक्र अव्याहतपणे चालूच असते, आणि म्हणूनच शेअर बाजारातही कधी तेजी असते तर कधी मंदी असते.  मात्र कधीही कायम तेजी अथवा मंदी रहात नाही, राहूच शकत नाही. मात्र सध्या जर आपणास एक रकमी गुंतवणूक करावयाची असेल तर आपण ती रक्कम म्युच्युअल फंडाच्या–लिक्वीड योजनेत गुंतवावी (या योजनेतील गुंतवणूक हि प्रामुख्याने ९० दिवसांचे निश्र्चित उत्पन्न देणा-या गुंतवणूक साधनात केली जात असते) –  

या योजनेत सध्या व्याजदर चढे असल्यामुळे वार्षीक सरासरी ८.५% ते ९% च्या दरम्याने परतावा मिळत आहे व तेथून एसटीपी (सिस्टीमँटीक ट्रान्सफर प्लान) व्दारे डायव्हर्सिफाईड इक्वीटी योजनेत साप्ताहीक तत्वावर वर्ग करण्याचा पर्याय निवडावा, मुदत साधारणपणे ३ ते ५ वर्षाची असावी. याचा फायदा असा होतो कि लिक्वीड फंड योजनेतील गुंतवणूकीवर तुम्हाला ८.५०% ते ९% दराने परतावा मिळत राहील व एसटिपीव्दारे बाजाराच्या सर्वच स्तरावर तुमची गुंतवणूक होत राहिल्यामुळे दिर्घ मुदती तुम्हाला फारच आकर्षक परतावा मिळू शकेल. 

दुसरे म्हणजे या परिस्थितीत एसआयपी (सिस्टिमँटीक इंन्व्हेस्टमेंट प्लान) माध्यमातून दर महा ठरावीक तारखेला दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत रहाणे, यातही तुम्ही साप्ताहिक गुंतवणूकीचा पर्याय निवडू शकता. तुमच्या बँकेच्या बचत खात्यात पैसे शिल्लक ठेवलेत कि झाले. तुमच्या मासिक उत्पन्नातील काही भाग तुम्ही या प्रकारे गुंतवून जेव्हा बाजारात परत तेजी येईल तेव्हा आकर्षक परतावा मिळवू शकाल.

थोडक्यात नियमीत गुंतवणूक, दिर्घ मुदत, थोडा संयम व आपल्या गुंतवणूकीच्या निर्णयाची ठामपणे अंमलबजावणी याव्दारे तुम्ही भविष्यात चांगले उत्पन्न मिळवू शकाल.

तुमच्या गरजेप्रमाणे सर्वप्रकारच्या योजनाम्युच्युअल फंडात असतात. समभाग आधारित योजनेत शेअर बाजाराची जोखीम असते तर कर्ज रोखे आधारित योजनेत शेअर बाजाराची जोखीम नसते मात्र व्याजाचे चढ उताराची व पत मानांकनाची जोखीम असते,  मात्र हि जोखीम लिक्विड फंड योजनेत सर्वात कमी, म्हणजे नाहीचे बरोबरच, असते. म्युचुअल फंड योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन तज्ञ फंड मॅनेजर्स करत असतात हा सर्वात मोठा फायदा असतो.

Learn how to investmutualfundmarathi.comRead how to invest in MarathiServices offered by Thakur Financial Servicesstock/share market in MarathiUnderstand how to invest in Marathi
Read more
  • Published in About Mutual Fund
2 Comments

गुंतवणुकिचे व्यवस्थापन

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

गुंतवणुकीचे व्यवस्थापनः

तसं पाहिले असता म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर्स हे आपल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करतच असतात त्यामुळे आपल्याला काही वेगळे व्यवस्थापन करण्याची गरज नसते. मात्र म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर्सवरती योजनेच्या उद्दिष्टांचे बंधन असते व एका मर्यादेबाहेर त्यांना खरेदी-विक्री करता येत नाही आणि म्हणूनच मार्केट जेव्हा मोठ्या प्रमाणात कोसळते तेव्हा NAV सुद्धा कमी होते. वर्ष २००८ मध्ये शेअर बाजार २१ हजार ते ७५०० पर्यंत कोसळला होता मात्र तो तसा एकाच दिवशी कोसळला नव्हता तर तो टप्या टप्प्याने खाली आला होता. आपल्याला त्यामागचे जागतिक मंदी, अमेरिकेत झालेला सबप्रईमचा घोटाळा, परदेशात दिवाळखोरित निघालेल्या अनेक आर्थिक संस्था इ. कारणे ज्यावेळी आपल्याला समजली त्यावेळी ज्यांनी आपली गुंतवणूक निष्क्रियपणे पाहत न बसता एक तर काढून घेतली अथवा म्युच्युअल फंडचे डेब्टस फंडात वर्ग केली व मार्केट जसं जसं खाली येत गेले त्या त्या वेळी पुनःर्गुंतवणूक केली अथवा डेब्टस फंडातून इक्विटी फंडात वर्ग केली त्यांना मात्र फायदाच झाला.

सर्वोत्तम पर्याय म्हणजे नियमीत दरमहा गुंतवणूक करत रहाणे व जर आपण दरमहा रु.२०००० पेक्षा जास्त करणार असाल तर अँटो डेबीटचे ४ फॉर्म भरुन महिन्यात साधारणपणे ७-८ दिवसाचे फरकाने ४ वेळा गुंतवणूक करावी, अशी गुंतवणूक केली असता सरासरीचा सर्वोत्तम फायदा मिळतो.  माझा अनुभव आहे कि अशा प्रकारे गुंतवणूक करत राहील्यास १० वर्षात एखादे वर्ष सोडल्यास उर्वरीत ९ वर्षे चांगला फायदा होतो.

जर एकरकमी गुंतवणूक करावयाची असेल तर प्रथमत: म्युच्युअल फंडाचे कर्जरोखे (Debt Fund Scheme) आधारीत योजनेत गुंतवणूक करुन तेथुन नियमीत वर्ग योजनेव्दारा (Systematic Transfer Plan) समभाग योजनेत दर आठवडा तत्वावर वर्ग करावी जेणे करुन वरील प्रमाणे नियमीत गुंतवणूकीचाच लाभ मिळतो.

साधारणपणे ८/१० वर्षात एका मोठ्या मंदीचे व एका मोठ्या तेजीचे बाजारात आवर्तन होत असते, अर्थात असा काही नियम नाही.  मात्र गेले अनेक दशके याप्रमाणे घटना घडलेल्या आहेत. माझा अनुभव असे सांगतो कि जर का बाजारातून सलग ४/५ वर्षे दर साल दर शेकडा जर का २०% पेक्षा जास्त परतावा मिळाला तर नंतरचे वर्षात एक मंदी येते व बाजारात बऱ्यापैकी करेक्शन येते.  जर का असा परतावा तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर मिळाला तर एक तर पैसे काढून घ्यावेत अथवा त्याच फंडाचे लिक्विड योजनेत पैसे वर्ग करून तेथून सिस्टीमॅटीक ट्रान्स्फर प्लान चा वापर करून परत काही ठराविक कालावधीत रक्कम परत मूळ योजनेत आणावी. यामुळे काय होईल कि जर बाजार खाली आला तर झालेला फायदा कायम राहून त्यात जास्त भर पडेल. जर बाजार वर गेला तर फक्त फायद्यातच नुकसान होईल, झालेल्या फायद्यात नुकसान होण्यापेक्षा हे केव्हाही चांगले.

अर्थात जर का आपण नियमितपणे गुंतवणूक करत असाल व आपण वर्षांचा नव्हे तर काही दशकांचा, दोन दशके, तीन दशके असा आपले गुंतवणुकीचा कालावधी ठरवलेला असेल तर तुम्ही काहीच न करता, फक्त नियमितपणे गुंतवणूक करत राहणेच तुमच्या फायद्याचे होईल. कारण सारासरीमध्ये बाजारातील चढ उतारावर मात करण्याची फार मोठी ताकद असते.

Learn managing investmentmutualfundmarathi.comRead about managing investment in Marathiread managing investment in MarathiServices offered by Thakur Financial Servicesstock/share market in MarathiUnderstand managing investment in Marathi
Read more
  • Published in About Mutual Fund
No Comments

अनिवार्य सूचना (Disclaimers)

www.mutualfundmarathi.comया वेबसाईटची निर्मिती हि मराठी भाषिकांना त्यांचे मातृभाषेत म्युचुअल फंड व शेअरबाजाराची माहिती मिळावी म्हणून तयार केलेली आहे. या वेबसाईटची मालकी हि सदानंद ठाकूर याची असून येथील मजकूर पूर्व परवानगीशिवाय अन्यत्र पोस्ट करू नये. Thakur Financial Services ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस ARN-46061 व्दारे म्युचुअल फंड वितरक म्हणून AMFI व अनेक AMC सोबत रजिस्टर आहे. या संकेतस्थळावर दिलेली माहिती, फायनान्शियल प्लानिंग सुविधा, कॅलक्यूलेटर व अन्य सुविधा हि तुमच्या म्हणजे या संकेतस्थळाला भेट देणार्यांच्या माहितीसाठी त्यांनी स्वत: उपयोगात आणण्यासाठी आहे. आम्ही यासाठी कोणतीही फी किवा अन्य कोणतेही मानधन आकारत नाही. ह्याचा वापर करून केलेली गुंतवणूक तसेच परिणाम देईल असा आमचा दावा नाही. म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते. मागील कामगिरी तशीच राहील अथवा राहणार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा. (Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risk, read all scheme related documents carefully. Past performance of the scheme may or may not sustain in future).

Design & Powered By S.N Enterprises

TOP
×