• 9503718779 Sujay
  • 9518 752 605 Sadanand
  • clients.tfs@gmail.com
  • साइन इन
  • साइन अप करा
  • Switch English

Thakur Financial Services

  • पहिले पान
  • आमच्या बाबत
  • म्युचुअल फंड
    • ऑनलान गुंतवणूक करा
    • म्युचुअल फंडाबाबत
    • म्युचुअल फंडाचे प्रकार
      • समभाग आधारित
      • कर्जरोखे आधारित
      • करबचतीच्या योजना
    • गुंतवणूक
    • शेअरबाजार
      • भांडवली बाजार
      • फ्युचर्स
      • ऑप्शन
    • डिमॅट खाते
    • उत्पादने
    • सेवा व सुविधा
  • विमा
  • आयकर
  • लेख
  • डाउनलोड
  • म्युच्युअल फंड ऑनलाईन
    • ऑनलान व्यवहार करा
  • संपर्क करा

गुंतवणूकीचे साधे नियम

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

गुंतवणूकीचे साधे नियम

गुंतवणूक म्हटले म्हणजे काही तरी किचकट प्रकार आहे असा समज आपण उगाचच करुन घेतो. साधे व सोपे नियम पाळले तर हिच गोष्ट फारच सोपी आहे हे समजून येईल. साधी गोष्ट हि आहे कि गुंतवणूकीचे साधे व सोपे नियम पाळून कोणतीही व्यक्ती चांगला गुंतवणूकदार होऊ शकते, ज्यामुळे मोठ्या चुकासुध्दा टाळता येतात. येथे मी तुम्हाला यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठीचे साधे व सोपे नियम सांगणार आहे.प्रथमत: प्लान तयार करा:प्रथमतः तुमच्या जोखीम घेण्याच्या तयारीनुसारच तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करा. गुंतवलेल्या रकमेपैकी जी रक्कमतुम्हाला पुढील २ ते ३ वर्षात लागणार असेल अशी रक्कम म्युच्युअल फंडाच्या लिक्वीड, मनी मार्केट, फ्लोटींग इंटरेस्ट रेट अथवा अल्प मुदतीच्या बॉण्ड मध्ये गुंतवा. जर तुम्ही या पुर्वी अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची गुंतवणूक जास्त जोखमीच्या योजनेत केलेली असेल व जर ती फायद्यात असेल तर अथवा ती फायद्यात येताच रक्कम काढून घ्या व वर सांगितलेल्या योजनेपैकी योग्य त्या योजनेत गुंतवा. हे सांगावयाची गरज नाही कि बाजाराचा निचांक काय असेल अथवा उच्चांक काय असणार आहे याचे ठोकताळे बांधत बसू नका. प्रथमत: हे लक्षात ठेवा कि अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची रक्कम सुरक्षीत ठेवण्याला प्राधान्य द्या. तुमच्या दिर्घ मुदतीच्या उदिष्टांसाठी म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनेतच गुंतवणूक करा. यासाठी, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप, संतुलित (Balanced Schemes and Balanced Advantage Fund) व इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम अशा प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत, योग्य योजनेची निवड करण्यासाठी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या. म्युचुअल फंड किंवा शेअरबाजारात गुंतवणूक करतना नेहमीच गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला महत्वपूर्ण असतो कारण तो त्याच्या अनुभवाचा वापर करून तुम्हाला सल्ला देत असतो.साधी गोष्ट:दिर्घ मुदतीच्या उदिष्टांसाठी समभाग योजनेतच गुंतवणूक करा व त्यासाठी डायव्हर्सीफाईड इक्वीटी योजनेची (शक्यतो लार्ज कँप किंवा लार्ज अँड मिड कँप फंड योजना) निवड करा. अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची रक्कम फ्लोटींग रेट बॉण्ड फंड योजनेत गुंतवा. हे गुंतवणूकीचे मुळ नियम आहेत ते काटेकोरपणे पाळणेच तुमच्या हिताचे असते. तुमच्यासमोर गुंतवणूकीचे बरेच काही पर्याय उपलब्ध आहेत अथवा ते तुम्हाला सांगीतले जातील, जसे कि पेट्रो फंड, एमएनसी फंड, गिल्ट इ. स्पेशँलीटी अथवा सेक्टोरल फंडाच्या योजना असतात व त्यात गैर कहिही नाही. परंतु नविन गुंतवणूकदाराने चांगल्या म्युच्युअल फंड हाऊसच्या डायव्हर्सीफाईड इक्वीटी योजनेतच गुंतवणूक करण्याचा साधा नियम पाळावा. दिर्घ मुदतीत अशा योजना अत्यंत फायदेशीर होतात. जर एखाद्या तिमाहीत २५% पेक्षा जास्त नुकसान सहन करण्याची तुमची तयारी नसेल तर स्पेशँलीटी अथवा सेक्टोरल फंडाच्या योजनांपासून दुर रहाणेच शहाणपणाचे असते.हॉट स्टॉक व फंड योजना टाळा:जर तुम्ही या वर्षातील सर्वात चांगली कामगिरी करणा-या म्युच्युअल फंड योजनेत व समभागात गुंतवणूक केली असेल तर पुढिल वर्षी त्याच्या निचांकी कामगिरीची तयारी ठेवा. कारण साधा नियम लक्षात ठेवा ज्या गोष्टीची किंमत वर जाते ती खाली येणारच. यासाठीच Reversion to the Mean (परत मध्य गाठलाच जातो) हा नियम आहे.नियमित गुंतवणूक करत रहा:आपल्या गुंतवणूक करण्याच्या क्षमतेनुसार कमी अथवा जास्त रक्कम दर महा ठरावीक तारखेला गुंतवत रहाणे हाच जोखीम कमी करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण बाजार उच्चांकी असताना गुंतवणूक करण्याचे या प्रकारेच टाळू शकता. शिवाय अशी सर्वकालीन शहाणी व हुशार व्यक्ती शोधूनही सापडणार नाही कि जी बाजाराचा कल, तेजीचा किंवा मंदीचा कालावधी (timing) बरोबर साधू शकेल.गुंतवणूक करा पण विकू नका:अल्प काळासाठी (वरचेवर) केलेले व्यवहार (trading) हे गुंतवणूकदारापेंक्षा फक्त ब्रोकरलाच श्रीमंत करतात. तसेच हि प्रवृत्ती आयकर विभागालाही आवडते. जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला भेटलात, कि जो असे सांगतो आहे कि मी अल्प काळाचे व्यवहार (trading) करुन भरपूर पैसे मिळवले आहेत, व तुम्ही याबाबत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलात तर मनाची तयारी ठेवा कि लवकरच तो या विषयावार बोलण्याचे टाळून दुस-याच एखाद्या विषयाला महत्व देऊ लागेल व ते तुम्हाला ऐकून घ्यावे लागेल. म्हणून साधा नियम पाळा कि फंडात अथवा स्टॉक मध्ये नियमीत गुंतवणूक करत रहा व ती विसरुन जा. यालाच म्हणतात Buy and Hold.टिपवर विश्वास ठेवून गुंतवणूक करु नका:कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणत्यातरी योजनेत गुंतवणूक करू नका. अनुभवी गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याप्रमाणेच गुंतवणूक कारणे तुम्हाला फायदेशीर होईल.जास्त व्याजाच्या मोहाला बळी पडू नका:जास्त व्याचाचे आमिष आहे म्हणून सहकारी पतसंस्था वगैरे ठिकाणी गुंतवणूक करू नका, कारण यातील एखादा संचालक जरी लबाडी करणारा निघाला तरी अशी संस्था बुडू शकते व तुमचे पैसेही बुडण्याची शक्यता असते.MLM, भीशी, चीट फंड इ. योजनांपासून दूर रहा:अशाप्रकारच्या योजनेतून फक्त सुरुवातीच्या लोकांनाच फायदा मिळतो व नंतर सामील होणाऱ्या सर्वच लोकांना नुकसान सोसावे लागते म्हणून अशा योजना जरी तुमचा जवळचा मित्र किंवा अगदी नातेवाईक घेऊन आला तरी त्याला नाही म्हणायला शिका हाच भविष्यात होणाऱ्या नुकसानीला टाळण्याचा एकच मार्ग आहे. एक लक्षात ठेवा जगात अशी कोणतीही योजना नसते कि जी तुम्हाला अल्प काळात श्रीमंत बनवू शकेल.शेअर बाजारातील डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग आदी मोहांपासून दूर रहा.डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग यातून झटपट पैसे मिळवण्याचे आमिष दाखवले जाते पण एक लक्षात ठेवा कि हा एक प्रकारचा सरकारमान्य जुगारच आहे व जुगार खेळून कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही, जुगार चालवणारा मात्र श्रीमंत होतो हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग यातून कधीतरी अल्प काळात भरपूर फायदा होऊ शकतो मात्र तो एकदा का मिळाला कि याचे एकप्रकारे व्यसनच लागते, जे सुटता सुटत नाही व मग यात मिळालेला फायदा तर जातोच परत मुद्दलहि जाते, येथे लाखाचे बारा हजार होणे हि म्हण तंतोतंत लागू पडते.लवकर सुरुवात करा:एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कि शेअर बाजारातून फक्त दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारालाच उत्तम प्रकारचा फायदा हमखासपणे मिळत असतो म्हणून गुंतवणूकदार व्हा, ट्रेडर होऊ नका. सर्वसामान्य माणसासाठी म्युचुअल फंड हे शेअरबाजारात गुंतवणूक करण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे.शेअरबाजारात गुंतवणूक करण्यासाठी वेळ महत्वाची नसून तुम्ही किती काळ नियमीत गुंतवणूक करत रहाता हे महत्वाचे असते. नियमितपणे गुंतवणूक केल्यामुळे सरासरीचा फायदा होतो. चक्रवाढीची ताकद हि एक जादूच आहे असे समजा, यामुळे तुम्ही गुंतवलेली रक्कम दीर्घ काळानंतर अत्यंत वेगाने वाढू लागते हे लक्षात ठेवा. म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनेतील गुंतवणूक हि नियमीतपणे व दिर्घ मुदतीसाठीच करत रहावयास हवी. गुंतवणूक करतानाच काळजी घ्या, तुमची उदिष्ठ लक्षात ठेवा, तुमच्या जोखीम स्विकारण्याच्या क्षमतेचे पुन:रअवलोकन करा, आणि महत्वाचे म्हणजे रोजच्या रोज शेअर बाजारावर केल्या जाणा-या टीका टिपणीला फार महत्व देऊ नका. तुमच्या भावना काबूत ठेवावयास शिकले पाहिजे. तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्यावर ठाम रहा. म्हणूनच जर तुम्ही अजून गुंतवणूकीला सुरुवात केली नसेल तर लगेचच वेळ फुकट न घालवता सुरुवात करा.

विमा हि गुंतवणूक नाही:

एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे कि जीवन विमा व गुंतवणूक हे पूर्णतः स्वतंत्र विषय आहेत याची गल्लत करू नका. विमा अत्यावश्यकच आहे परंतु तो गुंतवणूक म्हणून समजू नका. विमा फक्त टर्म इन्शुरन्स या प्रकारचाच घेतला पाहिजे.

देशात विमा व्यवसायाचे खाजगीकरण झाल्यापासून अनेक विमा कंपन्या अस्तित्वात आल्या असून त्यांनी जागोजागी त्यांच्या शाखा उघडलेल्या आहेत. सर्वच विमा कंपन्यांनी युनिट लिंक्ड इन्शुअरन्स प्लॅन अर्थात युलिप हे प्रॉडक्ट बाजारात आणलेली आहेत. अशी केलेली गुंतवणूक किमान ५ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय काढता येत नाही, तसेच दर वर्षी किमान ५ वर्ष हप्ते भरावे लागतात. असेच अशा योजनेत अनेक प्रकारचे चार्जेस असतात ते समजून घेतलेत तर तुम्ही यात कधीही गुंतवणूक करणार नाही. कारण हे चार्जेस सारा फायदा खाऊन टाकतात. यातील चार्जेसवसुलीसाठी तुमची युनिट्स कमी होतात.

म्युच्युअल फंडात मात्र केव्हाही गुंतवणूक करता येते व केव्हाही काढता येते. तसेच गुंतवलेली संपूर्ण रक्कम गुंतवली जाते. यातील सर्वमिळून चार्जेस हे २.५% पेक्षा जास्त नसतात. युनिट्स पैसे काढल्याशिवाय कधीही कमी होत नाहीत. गरजेचेवेळी ५ दिवसात खात्यात पैसे जमा होतात.फक्त फायद्यात असताना गुंतवणूक काढण्याचे पथ्थ पाळणे हिताचे असते.

जर आपला अकाली मृत्यू झाला तर आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा हा प्रत्येकालाच अत्यावश्यक आहे. मात्र तो टर्म इन्शुअरन्स स्वरूपात घेणे हे फायदेशीर असते. टर्म इन्शुअरन्समध्ये ३० वर्षे वयाच्या व्यक्तीला वार्षिक रु.७५०० मध्ये रु.५० लाखाचा विमा मिळतो. असा टर्म इन्शुअरन्स घेऊन बाकी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवणे हेच ग्राहकाच्या हिताचे असते. म्युच्युअल फंड व टर्म इंशुरन्स चे एकत्रीकरण करुन विमा संरक्षण व गुंतवणूक वृध्दी असे उदिष्ट साध्य करता येऊ शकते व तेच फायदेशीर असते.

कोणतीही गुंतवणूक जर दीर्घ काळासाठी केली तर चक्रवाढ पद्धतीने मिळणाऱ्या व्याजाचा जास्तीत जास्त फायदा मिळतो. म्युचुअल फंडाच्या अनेक योजनांनी गेल्या २५ वर्षात सरासरी २०% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिलेला आहे, म्हणूनच काही योजनेत १९९५/९६ सालात ज्यांनी रु.१ लाख रुपयांची गुंतवणूक केलेली होती त्या गुंतवणुकीचे आजचे मूल्य रु.५० लाख ते रु.१ कोटी ३५ लाख इतके झालेले आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी गेले २५ वर्षे नियमित दर महा रु.५००० एस.आय.पी. माध्यमातून गुंतवलेले आहेत त्यांची आजपर्यंत एकूण गुंतवणूक रु.१५ लाख इतकी झालेली आहे मात्र त्या गुंतवणुकीचे आजचे मूल्य सुमारे रु.३ कोटी ५० लाख इतके झालेले आहे. म्हणून गुंतवणूक करताना दीर्घ कालीनच विचार केला पाहिजे. बाजारात तेजी नंतर मंदी व मंदी नंतर परत तेजी हि आवर्तने चालूच असतात. मात्र शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत दीर्घ काळात तेजी मंदीवर मात करून उत्तम परतावा देण्याची ताकद असते हे लक्षात ठेवले पाहिजे.

तुम्हाला जर आयकर कलम ८०-सी चा फायदा मिळण्यासाठी गुंतवणूक करावयाची असेल तर जीवन विमा, ५ वर्षांची बँक ठेव, पी.पी.एफ. याचेपेक्षा म्युचुअल फंडाच्या Equity Savings Schemes चा आपण विचार केला पाहिजे कारण यातून जास्त परतावा तर मिळतोच परत तीन वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे काढण्याची सुविधासुद्धा उपलब्ध असते.

Read about simple rules of investment in Marathi. read about simple rules of investment- in Marathi. Understand simple rules of investment in Marathi. Learn simple rules of investmentServices offered by Thakur Financial Servicesstock/share market in Marathi. mutualfundmarathi.com
Read more
  • Published in Articles
No Comments

अनिवार्य सूचना (Disclaimers)

www.mutualfundmarathi.comया वेबसाईटची निर्मिती हि मराठी भाषिकांना त्यांचे मातृभाषेत म्युचुअल फंड व शेअरबाजाराची माहिती मिळावी म्हणून तयार केलेली आहे. या वेबसाईटची मालकी हि सदानंद ठाकूर याची असून येथील मजकूर पूर्व परवानगीशिवाय अन्यत्र पोस्ट करू नये. Thakur Financial Services ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस ARN-46061 व्दारे म्युचुअल फंड वितरक म्हणून AMFI व अनेक AMC सोबत रजिस्टर आहे. या संकेतस्थळावर दिलेली माहिती, फायनान्शियल प्लानिंग सुविधा, कॅलक्यूलेटर व अन्य सुविधा हि तुमच्या म्हणजे या संकेतस्थळाला भेट देणार्यांच्या माहितीसाठी त्यांनी स्वत: उपयोगात आणण्यासाठी आहे. आम्ही यासाठी कोणतीही फी किवा अन्य कोणतेही मानधन आकारत नाही. ह्याचा वापर करून केलेली गुंतवणूक तसेच परिणाम देईल असा आमचा दावा नाही. म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते. मागील कामगिरी तशीच राहील अथवा राहणार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा. (Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risk, read all scheme related documents carefully. Past performance of the scheme may or may not sustain in future).

Design & Powered By S.N Enterprises

TOP
×