आयकर कलम ८०-सी अंतर्गत काही विशिष्ठ प्रकारच्या गुंतवणुकीवर आयकरात सूट मिळत असते.
१) जीवन विमा हप्ता
२) पांच वर्षांसाठी केलेली बँक एफ.डी.
३) पी.एफ.
४) पी.पी.एफ.
५) पोस्टाची एन.एस.सी.
याप्रमाणेच म्युच्युअल फंडाच्या ELSS (Equity Linked Savings Fund) योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर सुद्धा आयकर कलम ८०-सी अंतर्गत आयकरात सूट मिळत असते.
या गुंतवणुकीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वात कमी म्हणजे फक्त ३ वर्षांचा लॉक इन पिरीयड म्हणजे आपले पैसे ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर केव्हाही काढता येतात आणि या योजनेत जरी खात्रीशीर परतावा दिलेला नसला तरी इतिहास असे सांगतो कि या योजनेतूनच गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा मिळालेला आहे.