• 9503718779 Sujay
  • 9518 752 605 Sadanand
  • clients.tfs@gmail.com
  • साइन इन
  • साइन अप करा
  • Switch English

Thakur Financial Services

  • पहिले पान
  • आमच्या बाबत
  • म्युचुअल फंड
    • ऑनलान गुंतवणूक करा
    • म्युचुअल फंडाबाबत
    • म्युचुअल फंडाचे प्रकार
      • समभाग आधारित
      • कर्जरोखे आधारित
      • करबचतीच्या योजना
    • गुंतवणूक
    • शेअरबाजार
      • भांडवली बाजार
      • फ्युचर्स
      • ऑप्शन
    • डिमॅट खाते
    • उत्पादने
    • सेवा व सुविधा
  • विमा
  • आयकर
  • लेख
  • डाउनलोड
  • म्युच्युअल फंड ऑनलाईन
    • ऑनलान व्यवहार करा
  • संपर्क करा

शेअर बाजार संबंधी योजनेत गुंतवणूक का करावी?

by Sadanand Thakur / Saturday, 22 December 2018 / Published in About Mutual Fund

शेअर बाजारात जोखीम निश्चितच असते पण तिचा प्रभाव आपल्या मूळ गुंतवणुकीवर काही काळासाठीच  पडत असतो, दीर्घ काळात मात्र गुंतवणुकीतून भरपूर फायदाच होत असतो कारण दीर्घ मुदतीत बाजारात तेजी येतच असते. अर्थशास्त्राचा एक नियम आहे ज्याची किंमत वर जाते ती काही काळानंतर खाली येतेच आणि खाली आलेली किंमत परत वर जातेच.हे चक्र सतत चालू असते.

मुंबई स्टॅाक एक्सचेंजचा सेन्सेक्स वर्ष १९७९ मध्ये १०० पॅाइंट ने सुरु झाला होता./ आज तो जवळपास ३५३७२ आहे म्हणजेच गेल्या ३७/३८ वर्षापूर्वी जर का तुम्ही १०० रुपये सेन्सेक्स मध्ये गुंतवले असते तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य ३५३७२ एवढे झाले असते . खालील टेबल पहा :

YearOpenHighLowClose
1979 118.76
1980 148.25
1981 227.72
1982 235.83
1983 252.92
1984 271.87
1985 527.36
1986 524.45
1987 442.17
1988 666.26
1989 778.64
1990 1048.29
19911027.381955.29 1908.85
1992 4546.58 2615.37
19932617.783459.07 3346.06
19943436.874643.31 3926.9
19953910.163946.66 3110.49
19963114.084131.222713.123085.2
19973096.654605.413096.653658.98
19983658.344322.002741.223055.41
19993064.955150.993042.255005.82
20005209.546150.693491.553972.12
20013990.654462.112594.873262.33
20023262.013758.272828.483377.28
20033383.855920.762904.445838.96
20045872.486617.154227.56602.69
20056626.499442.986069.339397.93
20069422.4914035.38799.0113786.91
200713827.7720498.1112316.120286.99
200820325.2721203.777697.399647.31
20099720.5517530.948047.1717464.81
201017473.4521108.6415651.9920509.09
201120621.6120664.815135.8615454.92
201215534.6719612.1815358.0219426.71
201319513.4521483.7417448.7121170.68
201421222.1928822.3719963.1227499.42
201527485.7730024.7424833.5426117.54
201626101.5029077.2822494.6126626.46
201726711.1534137.9726447.0634056.83
201834059.9937533.532483.8437494.4

वरील टेबलवरून तुमच्या लक्षात येईल की १०० अंकांनी १९७९ मध्ये सुरु झालेला सेन्सेक्स २०१८ च्या जुलै मध्ये ३७४९४ पर्यंत वाढत गेला, मात्र हा प्रवास एकाच वरच्या (तेजीच्या ) दिशेने झालेला नसून तो वर खाली होत या टप्प्यावर पोहोचला आहे. त्याचा प्रवास पहा, १९९२ मध्ये ४५४६ पर्यंत वर गेला, येथे हर्षद मेह्ताचा घोटाळा उघड झाला व त्याच वर्षी तो १५०० अंकापर्यंत खाली आला, पण त्याच वर्षात परत तो २६१५ अंकापर्यंत वर चढला, पुढे २००० साली तो ६१५० पर्यंत वाढला यानंतर आय.टी. कंपन्यांचा फुगा सगळ्या जगातच फुटला आणि २००१ साली तो २५९४ पर्यंत खाली आला, तेथून जानेवारी २००८ मध्ये तो २१००० ची पातळी तोडून वर गेला इथे अमेरीकेत सबप्राइमचे संकट उभे ठाकले व तो ७६९७ पर्यंत खाली आला पण पुढील वर्षीच तो १७५३० पर्यंत वर गेला. दोन वर्षांपूर्वी तो  २९०००पर होऊन गेला होता परत २२००० पर्यंत खाली येऊन आता तो ३७५०० पार झालेला आहे. यातून एक गोष्ट समजून येईल की मंदी हि फार कमी काळासाठी (एक वर्ष किंवा कमी) असते व नंतर येणारी तेजी ही दीर्घ काळासाठी (३ ते ५ वर्षे) असते.

  • Tweet
Tagged under: learn mutual fund, learn share market, mutual funds in marathi, share market in marathi, म्युच्युअल फंड, म्युच्युअल फंड समजून घ्या, शेअरबाजार मराठी, शेअरबाजार शिका

About Sadanand Thakur

Mutual Fund Distributor having experience of more than 15 years. Share Market experience of more than 25 years. Author of "Mutual Fund - Swapnapurticha Rajmarg" Marathi book.

What you can read next

संज्ञा व तपशिल
गुंतवणुकिचे व्यवस्थापन
म्युचुअल फंड म्हणजे काय?

1 Comment to “ शेअर बाजार संबंधी योजनेत गुंतवणूक का करावी?”

  1. Rahul Thorat says :Reply
    January 15, 2019 at 9:52 am

    Test Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनिवार्य सूचना (Disclaimers)

www.mutualfundmarathi.comया वेबसाईटची निर्मिती हि मराठी भाषिकांना त्यांचे मातृभाषेत म्युचुअल फंड व शेअरबाजाराची माहिती मिळावी म्हणून तयार केलेली आहे. या वेबसाईटची मालकी हि सदानंद ठाकूर याची असून येथील मजकूर पूर्व परवानगीशिवाय अन्यत्र पोस्ट करू नये. Thakur Financial Services ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस ARN-46061 व्दारे म्युचुअल फंड वितरक म्हणून AMFI व अनेक AMC सोबत रजिस्टर आहे. या संकेतस्थळावर दिलेली माहिती, फायनान्शियल प्लानिंग सुविधा, कॅलक्यूलेटर व अन्य सुविधा हि तुमच्या म्हणजे या संकेतस्थळाला भेट देणार्यांच्या माहितीसाठी त्यांनी स्वत: उपयोगात आणण्यासाठी आहे. आम्ही यासाठी कोणतीही फी किवा अन्य कोणतेही मानधन आकारत नाही. ह्याचा वापर करून केलेली गुंतवणूक तसेच परिणाम देईल असा आमचा दावा नाही. म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते. मागील कामगिरी तशीच राहील अथवा राहणार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा. (Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risk, read all scheme related documents carefully. Past performance of the scheme may or may not sustain in future).

Design & Powered By S.N Enterprises

TOP
×