म्युच्युअल फंडात गुंतवणूक का व कशी करावी?
म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी? उत्तर अगदी सोपं आहे, कारण अतिरिक्त संपत्ती निर्माण करण्यासाठी. फक्त एकच गोष्ट लक्षात असूद्या की, समभाग संबधीत म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करताना ही गुंतवणूक फक्त दीर्घ मुदतीसाठी असावी. अल्पमुदतीत नफा किंवा नुकसान मोठ्याप्रमाणात होण्याची शक्यता अधिक असते दीर्घ मुदतीत एक तरी नफ्याची चांगली संधी उपलब्ध होण्याची शक्यता अधिक असते. अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची असल्यास डेट फंड योजनेत गुंतवणूक करावी.
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदेः
अत्यल्प खर्च. तज्ञ फंड मॅनेजर्स तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करतात. पारदर्शकता. गुंतवणुकीची किंमत रोजच्या रोज कळते. तरलता – पैसे केव्हाही काढता येतात – ज्यामुळे अपेक्षीत भांडवलवॄद्धी झाली असता किंवा गरज असेल तेव्हा पैसे काढता येतात. देशाच्या ग्रोईंग आर्थिक व्यवस्थात सहभाची संधी. जगाच्या तुलनेत भारतीय अर्थ व्यवस्था वेगाने वाढत आहे. गुंतवणूक अनेक कंपन्यांच्या शेअर्शमध्ये गुंतविली जात असल्यामुळे मर्यादित जोखीम. इक्विटी लिंक सेव्हींग स्कीम मध्ये गुंवणूक करून आयकर कलम ८०-सी खाली मूळ उत्पन्नात वजावट मिळण्याची सुविधा. गुंतवणूक केल्यादिवसापासून एक वर्षानंतर पैसे काढले असता परतावा करमुक्त असतो.
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे तोटेः
आपले नियंत्रण नसते. नफा किंवा नुकसान शेअर बाजारातील चढउतारावर अवलंबून असते. निश्चित परतावा माहीत नसतो. आता दीर्घ मुदत म्हणजे किती हे व्यक्तीसापेक्ष वेगवेगळे असू शकते. तरी किमान ३ ते १० वर्षे थांबण्याची तयारी असणे सर्वोत्तम म्हणता येईल. नियमित ठरावीक मुदतीने एकाच चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करितं राहणे फारच उत्तम. ठरावीक मुदत ही शक्यतो दर महा, दर तीन महिन्यांनी अथवा वार्षिक आपल्या सोयीने ठरवता येते. या मध्ये सरासरीचा फायदा मिळतो कारण आपण मार्केट वर असताना तसेच खाली असताना (जेव्हा आपल्या गुंतवणुकीपोटी जास्त युनिट प्राप्त होतात व सरासरी होते). आणखीन एक उत्तम पर्याय म्हणजे ज्याला शक्य असेल त्याने मार्केट प्रत्येक वेळी ३०० ते ५०० पॉंईंटने खाली येते त्या प्रत्येक वेळी गुंतवणूक करावी यामध्ये फारच मोठा फायदा मार्केट मध्ये तेजी आल्यावर होण्याची शक्यता असते.
गुंतवणूकदाराला मिळणारा फायदा.
१) म्युच्युअल फंड हे गुंतवणूकीचे प्रभावी माध्यम आहे.
२) प्रत्येकाच्या गरजेनुसार म्युच्युअल फंडाच्या विविध योजना गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात.
३) म्युच्युअल फंडात जास्त जोखमीच्या तसेच जवळपास अजिबात जोखीम नसणा-याही योजना असतात.
४) म्युच्युअल फंडाच्या कर बचतीच्याही योजना असून यातून आयकर कलम ८०-सी अंतर्गत सुट मिळते.
५) म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर एक वर्षानंतर मिळणारा सर्व फायदा करमुक्त असतो.
६) म्युच्युअल फंडाच्या डेब्ट योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर एक वर्षानंतर मिळणा-या उत्पन्नावर इंडेक्ससेशनचा फायदा घेऊन कर बचत करता येते.
७) म्युच्युअल फंडात दिर्घकाळासाठी नियमीत दरमहा गुंतवणूक केली असता फार चांगला फायदा मिळण्याची शक्यता असते.
८) तज्ञ व्यक्ती त्याच्या गुंतवणूकीची काळजी घेतात.
९) शेअर बाजारातील दिर्घकालीन वाढीचा फायदा मिळतो.
१०) नियमीत बचतीची सवय लागते.
११) भविष्यातील आर्थीक गरजा भागवल्या जातात.
१२) संपत्ती निर्माण होते.
१३) त्याच्या गुंतवणूकीचा तपशील केव्हाही ऑनलाईन पहाता येतो.
१४) केव्हाही पैसे काढण्याची सुवीधा असल्यामुळे गरजेला केव्हाही पैसे मिळू शकतात.
१५) म्युच्युअल फंडाच्या योजनेत केलेल्या गुंतवणूकीतून कोणतीही कपात केली जात नसल्यामुळे संपुर्ण रक्कम गुंतवणूकीलाच जाते.
१६) रिलायन्स, बिर्ला व आयसीआयसीआय या म्युच्युअल फंडाच्या योजनेत एसआयपी इंशुरन्सची सुवीधा घेता येते ज्यामुळे रु.२० लाखापर्यंत मोफत विमा मिळू शकतो ज्यासाठी कोणताही आकार (चार्जेस) लागत नाही, ह्यासाठीचा खर्च म्युच्युअल फंड कंपनी त्यांचे फायद्यातून सोसते.