एकदाच एकरकमी गुंतवणू करुन नियमीत दर महा पैसे काढण्याचे उदाहरण:
म्युच्युअल फंडात एकरकमी रक्कम ठेऊन दरमहा ठरावीक रक्कम काढण्याची सुविधा आहे. या पर्यायालाSystematic Withdrawal Plan(एस.डब्ल्यू.पी.) असे म्हणतात.
हा पर्याय ज्याना नियमीत दर महा उत्पन्न हवे आहे त्यांचेसाठी अतिशय चांगला आहे मात्र रक्कम गुंतवताना ती किमान 10 वर्षासाठी तरी गुंतवावी व सुरुवातीला दर महा 1% म्हणजेच वार्षीक 12% दराने पैसे काढण्यास सुरूवात करावी व प्रत्येक वर्षानंतर आपल्या गुंतवणूकीचे मुल्य तपासून यात आवश्यक तर बदल करावा याचा फायदा हा होतो कि दिर्घ मुदतीत मुदलात भरीव वाढ होते व जस जशी महागाई वाढत जाईल तस तशी आपल्या गरजेनुसार दर महा काढावयाचे रकमेत वाढ करता येऊ शकते जेणे करून महागाईशी सामना करणे सुलभ होईल.
मी मात्र Systematic Withdrawal Plan (एस.डब्ल्यू.पी.) पेक्षा डिव्हिडंड पे आउट या पर्यायाला जास्त पसंती देतो कारण एस.डब्लू.पी. मध्ये आपली युनिट्स कमी करून आपणास पैसे दिले जातात त्यामुळे कधी न कधी तरी आपली युनिट्स संपतातच, तेजीचे कालखंडात हा पर्याय प्रभावी ठरतो, कारण कमी युनिट्स खर्ची पडतात, मात्र मंदीचे कालखंडात जेव्हा जास्त युनिट्स खर्ची पडतात तेव्हा हा पर्याय चांगला ठरत नाही. मात्र जर का आपण डिव्हिडंड पे आउट हा पर्याय निवडला तर आपली युनिट्स कधीच कमी होत नाहीत, कारण आपल्याला जो डिव्हिडंड मिळतो तो प्रती युनिट ठराविक पैसे/रुपये या स्वरुपात मिळतो.
आपली मिळालेली युनिट्स कायम रहातात, मुद्दलाचे मूल्य बाजाराचे चढ उतारानुसार कमी जास्त होते. जर आपले उदिष्ठ दीर्घ मुदतीचे असेल तर हा पर्याय फारच फायदेशीर ठरतो. म्युचुअल फंडाच्या समभाग आधारित बहुसंख्य योजना वर्षातून एकदा डिव्हिडंड देतात व त्याचे सरासरी वार्षिक प्रमाण १०% ते १२% असे गुंतवणुकीवर पडते. मात्र काही योजना हल्ली मासिक डिव्हिडंड देतात, त्यापैकी HDFC Prudence Fund हि एक हायब्रीड प्रकारातील योजना असून जानेवारी २०१६ पासून दर महा प्रती युनिट ३० पैसे या दराने डिव्हिडंड देत आहे. हि योजना सन १९९८ पासून नियमित दर वर्षी डिव्हिडंड देत असून तेव्हापासूनचा सरासरी डिव्हिडंड ची रक्कम आपल्या गुंतवणुकीवर १३% पडलेली आहे. सध्या मिळणारे डिव्हिडंड चे मासिक उत्पन्न गुंतवणुकीवर सरासरी १% पेक्षा जास्त प्रतिमाह म्हणजेच वार्षिक १३% पेक्षा अधिक मिळत आहे. परत डिव्हिडंड पासून मिळणारे उत्पन्न वार्षिक रु.१० लाखापर्यंत करमुक्त असते. ज्यांना नियमिती दर महिना उत्पन्न हवे असेल त्यांनी या योजनेत अवश्य गुंतवणूक करावी. ज्यांना वार्षिक डिव्हिडंड चालणार असेल त्यांनी अन्य योजनांची निवड केली तरी चालेल. ज्यांनी HDFC Prudence Fund या योजनेत सन १९९६ साली रु.१० लाख गुंतवले होते त्यांना एप्रिल २०१६ पर्यंत एकूण रु.६० लाख एव्हढा करमुक्त डिव्हिडंड मिळालेला असून मूळ गुंतवणुकीचे मूल्य २४ एप्रिल २०१६ रोजी रु.२८ लाखांपेक्षा जास्त आहे. अशा योजनेत किमान १० वर्षे किवा अधिक काळासाठी गुंतवणूक करावी. आपल्याकडे असणारे एकूण रकमेपैकी साधारण ४०% रक्कम अश्या योजनेत गुंतवावेत व बाकी रक्कम सुरक्षित साधनातच गुंतवावी.