आपल्या गुंतवणूक सल्लागाराचे मुल्यवर्धित सेवेबाबत आपण समाधानी आहात काय?
या महत्वाचे प्रश्र्नाकडे बरेचसे गुंतवणूकदार गांभीर्याने पहात नाहीत त्यांचे दृष्टीने महत्वाचे असते कि ते रोख्यात, म्युच्युअल फंडात, विम्यात कि बँकेचे कायम निधीत गुंतवणूक करतायत आपण ज्याचे मार्फत गुंतवणूक करत आहोत या गोष्टीला ते दुय्यम महत्व देतात आणि या मुळेच बरेच वेळा गुंतवणूकीचा निर्णय चुकीचा घेतला जाऊ शकतो. बहुतेक गुंतवणूकदारांचे परीचयातीलच एखादी व्यक्ती गुंतवणूक प्रतिनीधी म्हणून फावल्या वेळेतील व्यवसाय करत असते आणि एखाद्या दिवशी तो गुंतवणूकदाराला भेटतो योजनेची अर्धी-मुर्धी माहीती देतो, यासाठी बहुदा तो ज्याकंपनीचे तो प्रतिनीधीत्व करत असेल त्या कंपनीचे नवीनच नियुक्त झालेल्या सेल्स मँनेजरला बरोबर घेऊन येतो आणि गुंतवणूकदार त्या तथाकथीत गुंतवणूकदार सल्लागारामार्फत आपण कष्टाने मिळविलेला पैसा गुंतवून मोकळा होतो.
काही काळानंतर केव्हातरी गुंतवणूकदाराला त्याचा एखादा मित्र किंवा परिचीत भेटतो सांगतो की मी एका चांगल्या गुंतवणूकदार सल्लागाराला भेटून माझ्या गुंतवणूकीचे नियोजन जाणीव पुर्वक केले व आज मी माझे गुंतवणूकीबाबत पुर्णत; नि:शंक व समाधानी आहे तेव्हा तो त्याने केलेल्या गुंतवणूकीचे मुल्य काय झाले हे पहाण्यासाठी आपल्या परिचीत गुंतवणूक प्रतिनीधीशी संपर्क साधतो तर त्याला उत्तर मिळते कि एक तर त्याने तो फावल्या वेळेतील व्यवसाय बंद केला आहे किंवा मी नंतर पाहून सांगतो, साहेबाना विचारून सांगतो किंवा असेच काहीतरी. एक अर्ज भरुन देणे, आवश्यक ती कागदपत्रे व चेक जोडून ते संबधीत कंपनीत पोहोचविणे आणि स्वत:चे कमिशनचा चेक खात्यात जमा झाला कि मौज करणे म्हणजे काही गुंतवणूक सल्लागार होता येत नाही.
काही तथाकथीत प्रतिनीधी विमा एजंट किंवा म्युच्युअल फंड वितरक म्हणून फक्त बाजारात येणा-या नविन योजनांचे अर्ज गुंतवणूकदाराला नेमाने देणे व योजनेचे फॉर्म भरुन ते संबधीत ठिकाणी पोहोचविणे एवढेच काम करत असतात. त्यांचेकडे ते विकत असलेल्या योजनांची अत्यंत त्रोटक माहीती असते. बाजारातील सर्व घडामोडींबाबत ते अनभिज्ञ असतात.
खरे पहाता गुंतवणूक सल्लागाराकडे बाजारात उपलब्ध असणारे सा-याच गुंतवणूक पर्यांची अद्यावत माहिती असणे हे सद्याचे अस्थीर आर्थीक वातावरणातच नव्हे तर नेहमीच अत्यावश्यक आहे. दरवर्षीच होणारे व्याजदरातील तसेच कररचनेतील बदलांमुळे या सर्वच बदलांची दखल घेऊन गुंतवणूकदाराला कोणताही पुर्वग्रह न ठेवता नि:पक्षपातीपणे गुंतवणूकीचा सल्ला मिळणे हा गुंतवणूकदाराचा हक्कच आहे.
गुंतवणूकदाराला त्याच्याकडील गुंतवणूकीसाठी असणारी अतिरीक्त रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणे अत्यावश्यक असते व त्यासाठी योग्य गुंतवणूक सल्लागारच गुंतवणूकदाराला या बाबतचा निर्णय घेण्यास योग्य ती मदत करु शकतो आणि त्यासाठी गुंतवणूक सल्लागाराला पुर्णत: व्यावसाईक, अभ्यासू एवढेच असून चालत नाही तर त्याला त्याचे निर्णय ठामपणे व कोणत्याही पुर्वग्रह विरहीत दृष्टीकोन ठेऊन घेता आलेच पाहिजेत.
तुमचे गुंतवणूक सल्लागाराबाबत खालील प्रश्र्न स्वत:लाच विचारुन तुम्ही तुम्ही तुमचा निर्णय करु शकता:
1)तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे आवश्यक ती शैक्षणीक पात्रता आहे का?
जेव्हा आपण म्युचअल फंड योजना, जीवन विमा, रोखे किंवा अन्यत्र गुंतवणूक करु इच्छीता तेव्हा त्याबाबत तुमचे वतीने निर्णय घेण्यासाठी तुमचा गुंतवणूक सल्लागार पुरेसा सक्षम आहे काय?
2)तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे पुरेशी माहिती आहे काय?
इंटरनेटच्या वापरामुळे व दुरदर्शन वरील निरनीराळ्या वृत्त व आर्थिक वाहीन्यांमुळे तसेच वर्तमान पत्रे व निरनीराळ्या नियतकालीकांमुळे आजकाल गुंतवणूक विषयासंबंधी माहिती आपणापर्यंत सहजपणे व नियमितपणे आपणा सर्वांपर्यंत पोहोचत असते.
तर अशा एजंटसोबत काम चालू ठेवायचे का याचा निर्णय करण्याची वेळ आली आहे.
इथेच खरी गोम आहे कि या माध्यमातूनच गुंतवणूकदाराला बरेच वेळा एजंट पेंक्षा अधिक माहिती उपलब्ध होत असते. जर तुम्हाला असे आढळून आले कि तुमचे एजंट पेंक्षा तुम्हालाच जास्त माहिती आहे किंवा त्याला जे याबाबत माहित असावयास हवे ते त्याला माहितच नाही
3)तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे पुरेसा अनुभव आहे काय?
शिक्षणा बरोबरच किंबहूना अनुभव हा महत्वाचा घटक आहे. तुमचा एजंट तुमचे सारख्याच अनेक गुंतवणूकदाराना या पुर्वीपासून नियमीत सेवा देत असेल व जर तो पुर्णवेळ गुंतवणूक सल्लागार म्हणूनच काम करत असेल तरच तो अनुभवाने परिपुर्ण समजता येईल.
4)तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता आहे काय?
तुमचा गुंतवणूक सल्लागार मागील कामगिरी, अस्थीरता, जोखीम व परतावा यातील गोष्टींची माहिती न देता तुम्हाला एकच योजना अथवा एकाच कंपनीच्या एकाच प्रकारचे गुंतवणूकीचे साधनात गुंतवणूक करावयास वारंवार सुचवत असेल तर त्यात त्याचा वैयक्तीक फायदा विचारात घेत असण्याची अधिक शक्यता असते. जेव्हा तो तुम्हाला एखादे गुंतवणूकीचे माध्यम सुचवितो तेव्ह त्याला त्या योजनेच्या ब-या व वाईट बाबींबद्दल प्रश्र्न विचारुन तुमची खात्री करून घ्या तसेच त्या योजनेला पर्यायी योजनेत गुंतवणूक का करू नये याचे तो योग्य उत्तर देऊ शकतो का याची पडताळणी जरूत करा. गुंतवणूकीचा सल्ला हा नेहमीच पुर्वग्रह विरहीत दृष्टीकोन ठेऊन व स्वतंत्रपणे विचार करून व फायद्याबरोबरच जोखीमीची माहिती सांगूनच दिला गेला पाहिजे.
5)तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे आवश्यक त्या सर्व अद्यावत सोयी सुविधा आहेत का?
तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे स्वत:चे कार्यालय, प्रशिक्षीत व पुरेसा कर्मचारी वर्ग, आवश्यक ती सर्व सॉप्टवेअर्स नसतील तो तुम्हाला हवी सेवा हव्या त्या वेळी देऊ शकत नाही. आवश्यक वेळी रक्कम काढावयाची झाल्यास अशा परिस्थितीत विलंब होण्याचीच अधिक शक्यता असते. हे सारे अंतिमत: तुमच्या हिताचे नसते. गुंतवणूकीचा व्यवसाय हा एक डायनँमीक व्यवसाय आहे कि जो एकाच तराजूत तोलता येत नाही आणि याची जाणीव तुमचे सल्लागाराकडे आहे याची खात्री करा.
6)तुमचा गुंतवणूक सल्लागार तुम्हाला कोणकोणत्या मुल्यवर्धीत सेवा देऊ शकतो हे गुंतवणूक करण्या पुर्वीच जाणून घेतलेत का?
तुमचा अर्ज व धनादेश योग्य ठिकाणी पोहोचवील्यानंतरच गुंतवणूक सल्लागाराचे खरे काम सुरू होते. जर आपणास कोणत्याही कारणाने गुंतवणूकीचा खाते उतारा तुमचे पर्यंत पोहोचू शकला नाही तर तो तुम्हाला हव्या त्या क्षणी देण्याची सुविधा तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे असणे आवश्यक आहे, तसेच जर गुंतवणूक म्युच्युअल फंडासारखे शेअर बाजारसंबंधीत जोखीमीचे अधिन असेल तर तो देत असलेल्या सल्याला व देत असलेल्या मुल्यवर्धीत सेवेला फारच महत्व आहे. तसेच तुमचे गुंतवणूकीवर लक्ष ठेवणे हे तुमचे काम आहेच पण तुमचे बरोबरच तुमचा गुंतवणूक सल्लागार सुध्दा या कामी जर तुम्हाला मदत करत असेल तर ते तुम्हाला अधीकच लाभदायकच असेल.
विचार करा तुम्ही निवडलेला गुंतवणूक सल्लागार वरीलसारखा तर नाही ना? आणि म्हणूनच तुम्ही स्वत:लाच प्रश्र्न विचारा कि मी माझ्या सद्याचे गुंतवणूक सल्लागाराकडूनच गुंतवणूक करत राहणे योग्य होईल का? आणि जर याचे उत्तर समाधानकारक नसेल तर तुमचे गुंतवणूक सल्लागार बदलण्याची वेळ आली आहे.