या विभागातील उदिष्ठांचा वापर तुमच्या गरजेनुसार म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक कण्यासाठी करा

Home » आर्थिक नियोजन

तुम्हाला गुंतवणूक तर करण्याची इच्छा आहे, पण कोठून सुरुवात करावी हे समजत नाही? यासाठी तर आर्थिक नियोजन करावयाचे असते. यामुळे तुम्हाला कोणत्या कारणासाठी गुंतवणूक करावयाची आहे? किती काळासाठी करावयाची आहे? हे समजून घेता येते. आपल्याला अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची आहे कि दीर्घ मुदतीसाठी, हे समजून घेता येते.  अल्पमुदतीसाठी गुंतवणूक करताना त्यात जोखीम नसावी. आणि दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करताना जास्त फायद्यासाठी थोडी जोखीम स्वीकारायची तयारी ठेवली पाहिजे. जेव्हा तुम्ही Thakur Financial Services ची तुमचे गोल ठरवताना मदत घेता तेव्हा तुम्ही निश्चिंत होऊ शकता कारण आमच्याकडे या विषयी २० वर्षांचा अनुभव आहे. तसेच आमचे गोल प्लानर वापरून तुम्ही गुंतवणूक निर्णय करू शकता, तरीसुद्धा आमची मदत तुम्हाला केव्हाही उपलब्ध आहे. 

 

अगदी सोपे आहे - तुमच्या भविष्यातील कोणत्या आर्थिक गरजा आहेत ते लिहून काढा. उदा. तुमच्या पहिल्या मुलाचे शिक्षण, दुसऱ्या मुलाचे शिक्षण, नंतर त्यांचा विवाह, तुम्हाला निवृत्ती नंतर नियमित पेन्शन मिळावे अशा ज्या गोष्टी साठी तुम्हाला पैसे लागणार आहेत, आता त्यासाठी किती कालावधी तुमच्याकडे आहे ते तपासा. असे तुमच्या सर्व उदिष्ठाबाबत करा.

एकदा का तुम्ही हे ठरवून झाले कि या उदिष्ट पूर्तीसाठी सध्य परिस्थितीत किती पैसे लागू शकतात ते पहा, आमचे साधनात तुम्ही एकदा हि माहिती भरली कि भविष्यात किती पैसे लागतील ते उत्तर तुम्हाला मिळून जाईल.

यानंतर तुम्ही एकरकमी किती गुंतवणूक केली पाहिजे व दर महिना एसआयपी माध्यमातून किती गुंतवणूक केली पाहिजे हे तुमचे तुम्हालाच दिसेल. 

 

TOP