• 9503718779 Sujay
  • 9518 752 605 Sadanand
  • clients.tfs@gmail.com
  • साइन इन
  • साइन अप करा
  • Switch English

Thakur Financial Services

  • पहिले पान
  • आमच्या बाबत
  • म्युचुअल फंड
    • ऑनलान गुंतवणूक करा
    • म्युचुअल फंडाबाबत
    • म्युचुअल फंडाचे प्रकार
      • समभाग आधारित
      • कर्जरोखे आधारित
      • करबचतीच्या योजना
    • गुंतवणूक
    • शेअरबाजार
      • भांडवली बाजार
      • फ्युचर्स
      • ऑप्शन
    • डिमॅट खाते
    • उत्पादने
    • सेवा व सुविधा
  • विमा
  • आयकर
  • लेख
  • डाउनलोड
  • म्युच्युअल फंड ऑनलाईन
    • ऑनलान व्यवहार करा
  • संपर्क करा

२. अर्थव्यवस्थापन व गुंतवणूकीचे पर्याय

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

प्रकरण २ रे

२. अर्थव्यवस्थापन व गुंतवणूकीचे पर्याय.

व्यक्तीगत अर्थव्यवस्थापन – काय काळजी घ्यावी?

प्रत्येक गोष्टीची सुरुवात करताना ती गोष्ट ती गोष्ट नवीनच असते हेच सुत्र गुंतवणूकीलाही लागू पडते. गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे अतीरिक्त रक्कम असणे आवश्यक आहे. कर्ज काढून कधीही गुंतवणूक करु नये. तुम्हाला जर दर महिना तुमच्या उत्पन्नापैकी काही रक्कम बचत करण्याची सवय नसेल तर तुम्ही गुंतवणूक करु शकत नाही, म्हणून माझा तुम्हाला सल्ला आहे कि खालीलप्रमाणे सवयी लावून घेणे आवश्यक आहे:१) अचानक उद्भवणा-या गरजेसाठी प्रथमत: तुम्ही तुमच्या ४ ते ५ महिन्याच्या उत्पन्नाएवढी रक्कम तुमच्या बँकेच्या बचत खात्यात किंवा म्युचुअल फंडाच्या लिक्विड योजनेत कायम शिल्लक ठेवली पाहिजे. यालाच इमर्जन्सी फंड असेही म्हणतात. या रकमेचा उपयोग कोणत्याही गुंतवणूक साधनात करु नका. हे पैसे केव्हाही उपयोगात आणण्यासाठी उपलब्ध असले पाहिजेत, म्हणूनच ते मुदत ठेवीत,शेअर्स अथवा कोणत्याही दिर्घ मुदतीच्या साधनात गुंतवू नका. ज्या बचत खात्याचे एटिएम कार्ड तुमच्याकडे असेल अशाच खात्याशी हि रक्कम निगडीत असली पाहिजे. अगदी इमर्जन्सीच्या वेळीच या रकमेचा उपयोग करा. अशी रक्कम ठेवण्याचा उद्देश एखाद्या आजारपणात होऊ शकतो, अपघात झाल्यास होऊ शकतो किंवा काही कारणाने नियमीत उत्पन्नाचे साधन काही काळ बंद झाल्यास होऊ शकतो.२) तुमच्या मासिक उत्पन्नाच्या ३० ते ३५ टक्के रक्कम नियमीतपणे बचत करण्याची सवय लाऊन घ्या व हा नियम काटेकोरपणे पालन करा. तसेच बचतीचे प्रमाण वाढवण्याची सवय स्वत:ला लावा. जसे उत्पन्न वाढत जाईल तशी बचतही वाढवत न्या. अचानक बोनस किंवा अन्य मार्गाने पैसे मिळाल्यास त्यातील बहुतांश रकमेची बचत करा. काटकसरीची सवय लावणे यासाठी उपयुक्त होते.३) अनावश्यक खर्च टाळा. ऐश करण्याची प्रवृत्ती न ठेवणे भविष्यात फायदेशिर होते. महागड्या हॉटेलात जाणे टाळा. अशाप्रकारे पैसे वाचवून ते गुंतवणूकीसाठी वापरण्याची सवय लावा.४) तुमच्या विवाहाच्या वर्षदिनी, तुमच्या वाढदिवशी तसेच घरातील अन्य व्यक्तींचे वाढ दिवशी तुम्ही काही शेअर्स विकत घ्या हि तुमची स्वत:ला दिलेली सर्वोत्तम भेट भविष्यात उपयोगी पडणार आहे.५) एखाद्या खर्चीक प्रवासाला किंवा सहलीवर उगाचच पैसे उडवण्याऐवजी त्या पैशांचे चांगल्या कंपनीचे शेअर्स विकत घ्या किंवा म्युचुअल फंडाच्या मल्टी कॅप योजनेत गुंतवा.६) तुम्ही अशाप्रकारे केलेल्या बचतीतून जास्त व्याज द्यावे लागणारी काही कर्जे, क्रेडिट कार्डचे देणे वगैरे प्रथमत: फेडून टाका कारण अशा प्रकारच्या कर्जावर २४ ते ३६% व्याज आकारले जाते. मी शेअर बाजारात गुंतवणूक करुन त्यातून भरपूर फायदा मिळवीन व अशी कर्जे फेडिन असे म्हणणे हा तद्दन मुर्खपणाच आहे. तेव्हा तुमच्याकडे असणारी कितीही छोटी किंवा मोठी रक्कम प्रथमत: तुमचे अतिरिक्त व जास्त व्याजाचे कर्ज फेडण्यासाठीच वापरा.७) निवृत्तीनंतर जे पैसे मिळणार असतात जसे कि पीएफ वगैरे त्या पैशाना अजिबात हात लावू नका,असे करणे म्हणजे म्हातारपण कष्टात जाणार हे लक्षात ठेवा. हे पैसे काढले तर तुमचा मालक जे तुमच्या बचतीएवढीच जी रक्कम त्यात भरत असल्यामुळे जी दिर्घ मुदतीत चांगला फायदा होण्याची संधी असते ती तुम्ही गमावून बसता. तसेच हि रक्कम जर तुम्हाला वाढीव पगार म्हणून देण्याची ऑफर आली तर ती कधीच स्विकारु नका.गुंतवणूकीचे विविध पर्याय व त्यापासून मिळणारा सरासरी परतावा.तुमच्यासमोर गुंतवणूकीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, त्यापैकी योग्य तोच पर्याय तुम्ही तुमची जोखीम स्विकारण्याची मानसीक तयारी, गुंतवणूकीसाठी किती काळ देणे शक्य आहे वगैरे गोष्टी विचारात घेऊनच गुंतवणूकीचा पर्याय निवडला पाहिजे. जर शेअर बाजारातील चढ उतार तुम्ही पचवू शकता असे वाटत असेल तर शेअर्स खरेदी करा. जर तुम्ही बाजाराच्या चढ उताराला घाबरत असाल व जर तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीवर निश्र्चित नियमीत दराने उत्पन्न हवे असेल तर निश्र्चित उत्पन्न देणा-या साधनातच गुंतवणूक केलेली चांगले असते. मात्र एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा कि उत्पन्न व जोखीम हे हातात हात घालूनच चालत असतात म्हणजे ज्या गुंतवणूकीत जास्त जोखीम असते तेथे उत्पन्न सुध्दा जास्त मिळण्याची शक्यता असते.

आता काही उपलब्ध पर्याय पाहुया:

१) शेअर्स – एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेणे म्हणजेच त्या कंपनीची त्या प्रमाणात भागिदारी स्विकारण्यासारखेच असते. शेअर्स हे एक्सचेंज मार्फत तुमच्या डिमँट खात्यात विकत घेता येतात किंवा जेव्हा ती कंपनी प्रथमच भांडवली बाजारात उतरते तेव्हा आयपीओ मधूनही विकत घेता येतात. जर तुम्ही दिर्घ काळासाठी (१५/२० वर्षांसाठी) गुंतवणूकीचा विचार करत असाल तर शेअर्स खरेदी करणे अतिशय फायदेशिर होते. अशा गुंतवणूकीत बाजाराच्या चढ उताराची जोखीम असते मात्र दिर्घ मुदतीत, एकूणच अर्थव्यवस्थेत होणा-या नियमीत वाढीमध्ये हि जोखीम सामावून घेण्याची ताकद असते.
अशाप्रकारे केलेल्या गुंतवणूकीतून दोन प्रकारचे लाभ मिळतात –

अ) लाभांश – कंपनीला होणा-या निव्वळ नफ्यापैकी काही रक्कम भागधारकाना लाभांश स्वरुपात वाटली जाते. मिळणारा लाभांशचे मिळणारे उत्पन्न करमुक्त असते. लाभांश हा वर्षात एकदा किंवा जास्त वेळा सुध्दा वाटला जातो.
ब) मुल्य वृध्दी – कंपनी जस जशी तिच्या उलाढालीच्या माध्यमातून ताकदवान होत जाते तस तसे तिच्या शेअर्सचे मुल्य वाढत जाते. हा फायदाही तुम्हाला मिळतो.सर्वसाधारणपणे दिर्घ मुदतीत आघाडिच्या भारतीय कंपन्यांचे शेअर्समध्ये केलेल्या गुंतवणूकीवर वार्षीक सरासरी २५% च्या दरम्याने उत्पन्न मिळते. तेच जर का तुम्ही तुमचा शेअर्सचा पोर्टफोलीओचे व्यवस्थापन हुषारीने केलेत तर हेच उत्पन्न वार्षीक ४०% पर्यंत तुम्ही वाढवू शकता. यासाठी तुम्हाला योग्य वेळी बाजारातून शेअर्स खरेदी करावे लागतील तसेच अपेक्षीत नफा झाल्यावर योग्य वेळी ते तुम्हाला विकावेसुध्दा लागतील.
२) कर्ज रोखे (बॉण्डस्): केंद्र व राज्य सरकार, महामंडळ आणि त्याप्रकारच्या संस्था भांडवल उभारणीसाठी अशा प्रकारचे कर्जरोखे बाजारात विक्रीसाठी आणत असतात. यांची मुदत हि एक वर्षापेक्षा जास्त काळाची असते व या कर्जरोख्यांवर ठरावीक दराने व्याज दिले जाते. सर्वसाधारणपणे कर्जरोख्याच्या माध्यमातून असे वचन दिले जाते कि मुद्दल अधिक ठरलेल्या वाजदराची रक्कम ठरावीक दिवशी परत करण्याची हमी दिलेली असते. काही कर्ज रोखे हे करमुक्त व्याज देतात तर काही कर्जरोख्यांवरील व्याजावर कर भरावा लागतो. भारतात कर्जरोख्यांवर मिळणारा परतावा हा साधारणपणे ८ ते १० टक्के या दरम्याने असतो, मात्र कराचा विचार केल्यास यातील गुंतवणूक जास्त फायदेशीर होते.

३) बँक ठेवी: बँक ठेवी, पोष्टाच्या ठेवी यात ठरावीक मुदतीसाठी ठरावीक व्याज दराने पैसे गुंतवता येतात. यापासून मिळणारे व्याजाचे उत्पन्न हे करपात्र असते. मिळणारे व्याज हे मुदतीनुसार ४% ते७.५०% या दरम्याने असते. मात्र कराचा विचार केल्यास हातात मिळणारे उत्पन्न कराचे दराप्रमाणे १० ते ३०% कमी होते.

४)म्युच्युअल फंड:
अ) समभाग (इक्वीटी) आधारीत योजना: या प्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि शेअर बाजारात केली जाते. गुंतवणूकीसाठी अनेक प्रकारच्या योजना विविध उदिष्ठांनुसार असतात. या योजनेत केलेल्या गुंतवणूकीत शेअरबाजाराची जोखीम असते. अशा योजना दिर्घकाळासाठी फायदेशिर असतात. दिर्घ मुदतीत १८ ते ३०% वार्षीक परतावा या योजनेतून मिळालेला आहे.आ) कर्जरोखे (डेब्ट फंड) आधारीत योजना: या प्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि प्रामुख्याने कर्जरोखे (बॉण्डस्), मनी मार्केट, सी.डी./सीपी या साधनात केली जाते. शेअर बाजाराची जोखीम नसते मात्र व्याज दर बदलाची व पत बदलाची थोडी जोखीम असते. अल्प काळासाठी व दिर्घ काळासाठी वेगवेगळ्या योजना असताता. सरासरी परतावा ७% ते १०% वार्षीक मिळतो.
५) रोख स्वरुपातील: यामध्ये उच्च तरलता असते. ट्रेझरी बिल, मनी मार्केट फंड, लिक्वीड फंड हे प्रकार यात मोडतात. सरासरी परतावा ७% मिळतो. पैसे केव्हाही काढता येतात हा यातील फायदा असतो.
६) जमिन-जुमला: जागा जमिनीत गुंतवलेल्या पैशावरही दिर्घ मुदतीत चांगला परतावा मिळतो मात्र गुंतवणूक कोणत्या ठिकाणी केली आहे यानुसार परतावा ठरतो. या गुंतवणूकीची एक मर्यादा म्हणजे रोखीकरण हवे तेव्हा करता येत नाही कारण विकत घेणारा उपलब्ध असणे आवश्यक असते, यामुळेच यातील गुंतवणूक लिक्विड (तरल) नसते.
७) सोने: मुख्यत्वेकरुन हि भावनीक गुंतवणूक आहे, गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय आहे कि नाही याबाबत वेगवेगळे मत-प्रवाह आहेत.
८) अन्य पर्याय: कमोडिटीज्, जुन्या वस्तू, परदेशी चलन इ.
Importance of diversification read in Marathi. How to track your portfolio read in Marathi. mutualfundmarathi.comLearn simple rules of investmentRead about financial planning and investment options in MarathiServices offered by Thakur Financial Servicesstock/share market in MarathiUnderstand financial planning and investment options in Marathi
Read more
  • Published in Capital Market
1 Comment

अनिवार्य सूचना (Disclaimers)

www.mutualfundmarathi.comया वेबसाईटची निर्मिती हि मराठी भाषिकांना त्यांचे मातृभाषेत म्युचुअल फंड व शेअरबाजाराची माहिती मिळावी म्हणून तयार केलेली आहे. या वेबसाईटची मालकी हि सदानंद ठाकूर याची असून येथील मजकूर पूर्व परवानगीशिवाय अन्यत्र पोस्ट करू नये. Thakur Financial Services ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस ARN-46061 व्दारे म्युचुअल फंड वितरक म्हणून AMFI व अनेक AMC सोबत रजिस्टर आहे. या संकेतस्थळावर दिलेली माहिती, फायनान्शियल प्लानिंग सुविधा, कॅलक्यूलेटर व अन्य सुविधा हि तुमच्या म्हणजे या संकेतस्थळाला भेट देणार्यांच्या माहितीसाठी त्यांनी स्वत: उपयोगात आणण्यासाठी आहे. आम्ही यासाठी कोणतीही फी किवा अन्य कोणतेही मानधन आकारत नाही. ह्याचा वापर करून केलेली गुंतवणूक तसेच परिणाम देईल असा आमचा दावा नाही. म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते. मागील कामगिरी तशीच राहील अथवा राहणार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा. (Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risk, read all scheme related documents carefully. Past performance of the scheme may or may not sustain in future).

Design & Powered By S.N Enterprises

TOP
×