८. फंडामेंटल विश्लेषण
फंडामेंटल विश्लेषण मध्ये सुट्टयाला स्थान नसते हे शास्त्र पारंपरिक मुलभुत विश्लेषणावर आधारित असते. फंडामेंटल विश्लेषणावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती कधीही दलाल स्ट्रीटवर घडणाऱ्या बारीक सारीक घटनांकडे सरळ दुर्लक्ष करत असतात त्याला कोणतेही महत्व देत नाहीत. कारण खालील तीन मूलभूत घटकांकडे विश्लेषण करत असताना पाहत असतात:
अर्थव्यवस्था
उद्योग क्षेत्र
कंपनी
उपरोक्त तिन्ही आयामांची एकत्रितपणे तुलना करणे आवश्यक आहे कारण या तिन्ही घटकांना तितकेच महत्व असल्यामुळे यातील कोणताही एक घटक वगळून फंडामेंटल विश्लेषण करताच येणार नाही. या विभागात आम्ही आपणास या प्रत्येक घटकाची थोडक्यात माहिती देण्याचा येथे प्रयत्न करत आहोत.
अर्थव्यवस्थेचे विश्लेषण
खालील टेबल मध्ये काही आर्थिक निर्देशक दिलेले आहेत आणि त्यांचा स्टॉक मार्केटवर काय परिणाम होतो ते दुसऱ्या रकान्यात दिलेले आहे.
Sr.No. | आर्थिक निर्देशक | स्टॉक मार्केटवरील परिणाम |
१ | GNP मध्ये वाढ घट | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
२ | किंमत स्थिती (महागाईचा दर) स्थिर वाढणारा | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
३ | अर्थव्यवस्थेत तेजी मंदी | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
४ | बांधकाम क्षेत्रातील हालचाल व मागणी या क्षेत्रातील वाढती मागणी या क्षेत्रातील कमी किंवा घटती मागणी | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
५ | रोजगार निर्मिती वाढ होणारा कालखंड कमी होणारा कालखंड | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
६ | मालाची साठेबाजी महागाई वाढत असताना मंदीचा कालखंड लांबत असताना | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
७ | खर्च करण्यासाठी उपलब्ध असणारे उत्पन्न वाढत राहणारे कमी होत राहणारे | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
८ | वैयक्तित बचतीत होणारी वृद्धी घट | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
९ | व्याज दारात होणारी घट वाढ | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
१० | व्यापाराचा समतोल सकारात्मक नकारात्मक | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
११ | चलन बाजारात रुपयाची ताकद मजबूत कमजोर | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
१२ | कॉर्पोरेट कर आकारणी कमी जास्त | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
उद्योगा संबंधित विश्लेषण
प्रत्येक उद्योग क्षेत्राला ४ प्रमुख जीवन चक्रातून मार्गक्रमण करावे लागते
१) सुरुवातीचा काळ
२) वाढीचा किंवा फैलाव होण्याचा कालखंड
३) स्थैर्याचा (परिपक्व) कालखंड
४) उतरती (अधोगती) कळा
प्रत्येक उद्योगासाठी हे गतिशील (डायनॅमिक) कालखंड असतात. प्रत्येकाने गुंतवणुकीचा निर्णय करताना शक्यतो उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात आणि ते न जमल्यास वाढीच्या किंवा फैलाव होण्याच्या (ग्रोथ) कालखंडात गुंतवणूक करावी. आणि जेव्हा परिपक्व किंवा स्थैर्याचा कालखंड असतो तेव्हा आपल्या कडील शेअर्स विकून मोकळे व्हावे. विक्री, नफाक्षमता आणि वृद्धी दर कसा आहे हे तपासले कि सध्या उद्योग जगत कोणत्या कालखंडातून जात आहे हे समजून घेता येते.
उदाहरणार्थ १९८० ते १९९० हे दशक आयटी उद्योगाचा सुरुवातीचा कालखंड होता
१९९१-२००० या कालखंडात आयटी उद्योगाची वेगाने वाटचाल चालू होती व या काळात कंपन्यांच्या मोठी वाढ झाली
वर्ष २००१ पासूनचा कालखंड हा आयटी कंपन्यांच्या स्थैर्याचा मानता येईल
म्हणून ज्यांनी १९८० ते २००० या कालखंडात आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली त्यांना सर्वाधिक फायदा झाला.
कंपनीचे विश्लेषण
काही वेळा अशीही परिस्थिती असते कि औद्योगिक क्षेत्र आकर्षक कामगिरी करत असते मात्र त्या क्षेत्रातील काही कंपन्या मात्र चांगली कामगिरी करण्यात अपयशी होत असतात; त्याचप्रमाणे असेही असू शकते कि एखाद दुसरी कंपनी एकूण संबंधित उद्योग क्षेत्रापेक्षा जास्त भरीव कामगिरी दाखवत असतात, जेव्हा त्या क्षेत्रातील अन्य कंपन्या मात्र खराब कामगिरी करत असतात. म्हणूनच तुम्ही एक गुंतवणूकदार म्हणून कंपनीचे योग्य विश्लेषण करण्यासाठी त्या कंपनीची आर्थिक तसेच अन्य सारे घटकांचा समतोलपणे विचार करूनच गुंतवणुकीचा निर्णय केला पाहिजे. आणि यासाठी महत्वाचे काही घटक खालीलप्रमाणे:
१) कंपनीचा इतिहास आणि व्यवसायाचे स्वरूप काय आहे.
२) कंपनी उत्पादित करीत असलेल्या वस्तू/सेवांची बाजारातील मागणी/पुरवठा यांची ताकद
३) कंपनीचा बाजारातील हिस्सा
४) व्यवस्थापकीय संचालक मंडळात कोण व्यक्ती आहेत
५) पेटन्ट आणि ट्रेडमार्क्स यांचे अंतर्गत व व्यावसायिक मूल्य काय आहे
६) परदेशी सहयोग, भविष्यासाठी त्याची गरज आणि उपलब्धता
७) बाजारात, वर्तमान आणि भविष्यातील स्पर्धात्मक गुणवत्ता
८) भविष्यातील व्यवसायाची योजना आणि प्रकल्प
९) कंपनीची ओळख: ब्लू चिप आहे का, भांडवली आकार: मोठा, माध्यम कि लहान
१०) कंपनीच्या शेअर्सची बाजारातील उलाढाल
११) प्रति शेअर उत्पन्न, त्यात किती वाढ वार्षिक स्वरूपात होत आहे
१२) विक्री मधील वार्षिक वाढ किती आहे आणि लाभांश नियमितपणे दिला जातो का हे पहिले पाहिजे