• 9503718779 Sujay
  • 9518 752 605 Sadanand
  • clients.tfs@gmail.com
  • साइन इन
  • साइन अप करा
  • Switch English

Thakur Financial Services

  • पहिले पान
  • आमच्या बाबत
  • म्युचुअल फंड
    • ऑनलान गुंतवणूक करा
    • म्युचुअल फंडाबाबत
    • म्युचुअल फंडाचे प्रकार
      • समभाग आधारित
      • कर्जरोखे आधारित
      • करबचतीच्या योजना
    • गुंतवणूक
    • शेअरबाजार
      • भांडवली बाजार
      • फ्युचर्स
      • ऑप्शन
    • डिमॅट खाते
    • उत्पादने
    • सेवा व सुविधा
  • विमा
  • आयकर
  • लेख
  • डाउनलोड
  • म्युच्युअल फंड ऑनलाईन
    • ऑनलान व्यवहार करा
  • संपर्क करा
Page 2 of 2
« Previous 1 2

म्युच्युअल फंडाचे भविष्य

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

म्युच्युअल फंडाचे भविष्य उज्ज्वल आहेः

म्युच्युअल फंड गुंतवणूकीद्वारा दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण होवू शकेल याची कारणेः

  • भारतीय अर्थव्यवस्था हि जगात अत्यंत वेगाने पुढे जात आहे हे सर्वमान्य सत्य आहे.
  • परकीय गुंतवणूकदार नियमितपणे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करितं आहेत.
  • अनेक सेझ मंजूर झाले आहेत व भविष्यात ते कार्यरत होतील.
  • येत्या ५ ते ७ वर्षात पायाभूत सुविधा विभागात जसे की पॉवर, रस्ते, धरणे, पाणी योजना, टेलिकम्युनिकेशन इ अनेक उद्योग धंद्यात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करण्याचे सरकारी व योजना आयोगाचे निर्णय झाले आहेत.
  • सर्वच विभागात उद्योग धंद्यांना पोषक वातावरण आहे.
  • जीडिपी स्थिर आहे व पुढे वाढ अपेक्षीत आहे.
  • काम करणा-या भारतीयाचे सरासरी वय फक्त ३५ आहे.
  • सद्या देशातील एकूण गुंतवणुकीपैकी नगण्य म्हणजे ३ टक्के पेक्षा कमी गुंतवणूक म्युचल फंडात आहे.
  • उद्योगधंद्याला पूरक असे सरकारी धोरण आहे.
  • शेती व शेतीला पूरक उद्योगधंद्याला पूरक असे सरकारी धोरण आहे.
  • अनेक परदेशी कंपन्यांचे काम भारतीय कंपन्या करत आहेत.
  • भारतीय शेअर बाजार अद्यावत आहे व त्यावर उत्तम नियंत्रक म्हणून सेबी व रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत.
  • भारतीय अर्थसंस्था व उद्योगधंद्यावर उत्तम नियंत्रक म्हणून सेबी व रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत.
  • गुजराथी समाजाने शेअर बाजार व म्युच्युअल फंडाचे माध्यमातून भरपूर संपत्ती निर्माण केली आहे आपण मराठी माणसानेच का मागे राहावे.
Read more
  • Published in About Mutual Fund
No Comments

म्युचुअल फंडाचे फायदे

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यामुळे मिळणारे लाभ

तुम्हाला तज्ञांचे मार्गदर्शन मिळतं

प्रत्येक म्युच्युअल फंड हाउस त्यांचे फंड व्यवस्थापनेसाठी अनेक फंड मॅनेजर्स व फंड मॅनेजरला साहाय्य करण्यासाठी रिसर्च टीम व व्यावसायिक तज्ञ यांची नेमणूक करत असतात जे तुमच्यासाठी सतत आर्थिक बाजारपेठेवर लक्ष ठेवून असतात. ते विविध क्षेत्रातील आणि कंपन्यांमधील मार्केट ट्रेड्स व भावी संभाव्यता यांच संशोधन नियमितपणे करत असतात. आपले रिसर्च रिपोर्ट संबंधित स्कीमचे फंड मॅनेजरला सादर करत असतात त्यानंतर संबंधित फंड मॅनेजर तुलनात्मक अभ्यास करून गुंतवणुकीचा अंतिम निर्णय घेत असत या तज्ञांमुळे गुंतवणुकीचा योग्य निर्णय घेता येत असतो. तसं तुम्हाला एकट्याने करणे कठिण होतं आणि म्हणूनच ९०% पेक्षा जास्त गुंतवणूकदार शेअर मार्केट मध्ये नुकसान सोसत असताना म्युच्युअल फंडाचे नियमित गुंतवणूकदार मात्र दीर्घ मुदतीत मोठा लाभ मिळवीत असतात.

कमी जोखीम

म्युच्युअल फंडाची खासियत म्हणजे त्यात गुंतवणुकीच्या अनेक संधी मिळतात. सामान्यपणे एकाच सिक्युरिटीतील गुंतवणूक ती कंपनी किती चांगला किंवा वाईट व्यवसाय करते यावर अवलंबून असते. पण म्युच्युअल फंडात तुम्ही रुपये ५००० गुंतवा अथवा रुपये पाच लाख गुंतवा त्यांतील थोडी थोडी रक्कम वेगवेगळ्या अनेक कंपन्यांचे शेअर्स मध्ये गुंतविली जात असते जेणेकरून तुमच्या गुंतवणुकीची जोखीम कमी होते.

तुम्हाला आवश्यक तेव्हा पैसे काढून घेण्याची सुविधा असते

ओपन एंडेड म्युच्युअल फंड योजना या बॅंकेतिल बचत खात्याप्रमाणे चालविता येत असतात म्हणजेच यात केव्हाही पैसे भरता येतात व केव्हाही काढता येतात. क्लोज एंडेड (बंद योजना) योजनेमध्ये केलेली गुंतवणूक काढण्यावर मात्र काही निर्बंध असतात आणि म्हणूनच बरेच तज्ञांशी सहमत होताना आम्हीसुद्धा ओपन एंडेड म्युच्युअल फंड स्कीम्स मध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत असतो.

कमीत कमी खर्च

तुम्ही इतर अनेक गुंतवणूकदारांसोबत गुंतवणूक करत असल्यामुळे तुम्हाला तुलनात्मकदृष्ट्या गुंतवणुकीचा खर्च कमी करावा लागतो. जर तुम्ही एकट्याने गुंतवणूक केली असती तर हा खर्च वाढला असता म्हणूनच भांडवली बाजारात थेट गुंतवणुकीपेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला कमी खर्च येतो.

पारदर्शकता

जमीनजुमल्यातील गुंतवणुकीत जे शक्य होत नाही ते यात शक्य होतं. यात गुंतवणुकीचे मूल्य रोजच्या रोज जाणून घेता येते शिवाय ठराविक काळानंतर बहुधा प्रत्येक महिन्याचे अखेरीला सर्वच फंड हाउसेस त्यांची फॅक्ट शिट प्रकाशित करत असतात जीचे आधारे तुम्ही म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक कोणकोणत्या कंपन्यांचे समभागामध्ये गुंतविली आहे. विविध प्रकारच्या अन्य कोणत्या ठिकाणी गुंतवणूका केलेल्या आहेत तसेच फंड मॅनेजरचे धोरणही तुम्ही ठरावीक कालावधीनंतर जाणून घेऊ शकता.

इन्कम टॅक्स मुक्त परतावे

इक्विटी म्युच्युअल फंडावरील मिळणारे लाभांश हे पूर्णता करमुक्त असतात. शिवाय इक्विटी म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक एक वर्षानंतर काढली असता पूर्णतः करमुक्त असते.

सेबी व अँफीचे नियंत्रण

सर्व म्युच्युअल फंड हे Security & Exchange Board of India (सेबी) आणि Association of Mutual Funds of India (AMFI) कडे नोंदणीकृत असतात आणि गुंतवणूकदारांचे हित सांभाळणा-या तरतुदी व नियमांनुसार काम करत असतात. सेबीकडून स्टॉक एक्सचेंज आणि त्यांच्या सहचालकांवर नियंत्रण तर ठेवले जातेच शिवाय चुकीच्या सहचालनावर दंड ठोठावून सिक्युरिटी मार्केट व सिक्युरिटी व्यवहारातील भ्रष्टाचाराला पायबंद घालते.

  • Add child page
  •  ♦ 
  • Printer-friendly version
  •  ♦ 
  • 29017 views

Add new comment

Subject Comment  Lists      Format Source

 

Book traversal links for म्यु.फंडाचे फायदे

‹ अनिवासी भारतीयUpम्यु.फंडाचे भविष्य ›

  • एम.एफ. कामगिरी
  • म्युचुअल फंडाबाबत
    • शेअरबाजारासंबंधी थोडक्यात
    • म्युचुअल फंड म्हणजे काय?
      • म्यु.फंडाचे प्रकार
      • कर बचतीसाठी
      • अनिवासी भारतीय
      • म्यु.फंडाचे फायदे
      • म्यु.फंडाचे भविष्य
    • डेट फंड
    • पतसंस्था व सोसायटी
    • शेअर बाजार कि म्यु.फंड
    • फंड कसा निवडावा
    • आपला गुंतवणूक सल्लागार
    • एक पाहा़णी
    • संज्ञा व तपशिल
    • KYC
    • FAQ
    • व्यक्त करा तुमच्या आई आणि बाबांवरील प्रेम
  • गुंतवणुकीबाबत

एस आय पी

एस आय पी

Demat A/c

आयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा

आयसीआयसी चा थ्री इन वन अकौंट

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302  
Sujay 9503718779
पुढील भेटीची तारीख: 15th & 16th December, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

Menu

  • Contact
  • Feedback
  • प्रश्न-चर्चा

माझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा

Sadanand Thakur

चिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा

 ☏:9422430302

Welcome admin

Logout


Site Managment

  • Control Panel (cPanel)

Who’s online

There are currently 2 users online.

  • Sadanand
  • staff1

Who’s new

  • testing-staff
  • admin
  • staff1
  • तुलशिदास्
  • प्रसाद

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण – ४१५६०५
टेली. ०२३५५ – २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302  
Sujay 9503718779
पुढील भेटीची तारीख: 15th & 16th December, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838

Disclaimer

म्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.

RISK AND DISCLAIMER

Mutual fund investments are subject to market risks. Please read the scheme information and other related documents carefully before investing. Past performance is not indicative of future returns. Please consider your specific investment requirements before choosing a fund, or designing a portfolio that suits your needs.

Read More

copyright © 2009 Thakur Financial Services

भेटीचे पूर्व नियोजन

आपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर  फोन करणे आवश्यक.

आपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.

Chat With Us

Chat

Use this contact form or call me on mobile 9422430302 to fix scheduled meeting for Live Chat support to get answers of all your queries and get customize solution as per your requirements.

Footer

  • Contact
  • Feedback
  • प्रश्न-चर्चा

Design and Developed by iTApplication.net

Read more
  • Published in About Mutual Fund
No Comments

म्युच्युअल फंडाचे प्रमुख प्रकार

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur
Types of Mutual Fund




म्युच्युअल फंडचे विविध प्रकार

म्युच्युअल फंडाच्या वेगवेळ्या स्कीम्स मध्ये आपण गुंतवणूक करू शकता. एकदाका आपणाला स्कीम्सचे प्रकार समजले की आपल्या गुंतवणुकीचे उद्दिष्टांनुसार, तुमच्या आवश्यकता, आर्थिक स्थिती, जोखीम घेण्याची क्षमता आणि अपेक्षित परतावा यानुसार स्कीमांची निवड करणे सोपं जातं. संरचना आधारित स्कीम तीन प्रकारच्या असतात. 

ओपन-एंडेड योजना

ओपन-एंडेड योजनेला मुदत पूर्तता कालावधी नसतो. यामध्ये त्यादिवसाच्या NAV (गुंतवणुकीसाठी एका युनिटचे मूल्य) चे आधारे केव्हाही खरेदी व विक्री करता येते आणि म्हणूनच ही सर्वोत्तम म्हणावयास हरकत नाही.

क्लोज-एंडेड स्कीम्स

मुदत बंद योजना या सर्वसाधारणपणे ३ वर्षे मुदतीच्या असतात. मात्र काही योजनांचा कालावधी ३ वर्षांपेक्षा अधिक मुदतीच्याही असू शकतो. या योजना त्यांचे आरंभाच्या दरम्यानेच गुंतवणुकीसाठी खुल्या असतात त्यांमध्ये मुदतपुर्तीपूर्वी परत गुंतवणूक करता येत नाही बहुतांशी योजना या मुदतपूर्तीनंतर ओपन-एंडेड स्कीम मध्ये परावर्तित होतात. यातील काही योजना स्टॉक एक्सचेंजवर नोंदविल्या जातात आणि योजना ज्या स्टॉक एक्सचेंजवर नोंदली असेल तेथेच त्यांची खरेदी-विक्री कंपन्यांचे शेअर्सप्रमाणे करता येते.

इंटरवल स्कीम

याप्रकारची योजना ही ओपन-एंडेड व क्लोज-एंडेड योजनांचे मिश्रण असते. या योजना ठराविक कालावधीत विक्री आणि पुनर्खरेदीसाठी खुल्या असतात.



म्युच्युअल फंडामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करता येते:

१)      समभाग आधारीत योजना: या प्रकारच्या योजनेत शेअर बाजाराची जोखीम अंतर्भुत असते व म्हणूनच अशा योजनेत शक्यतो एसआयपी (सिस्टिमँटीक इन्व्हेस्टमेंट प्लान) व्दारे नियमीत दिर्घकाळासाठी गुंतवणूक करावी. दिर्घकाळ म्हणजे किमान ५ वर्षे ते २० वर्षे नियमीत गुंतवणूक केली असता रुपी कॉस्ट अँव्हरेजींग व चक्रवाढीचा फायदा मिळतो व आकर्षक उत्पन्न प्राप्त होते. या प्रकारात 

लार्ज कँप (मोठ्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते), 

मिड कँप (मध्यम आकाराच्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते), 

स्मॉल कँप (लहान कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते), 

लार्ज व मिड कँप ( मोठ्या व मध्यम आकाराच्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते),

मिड व स्मॉल कँप (मध्यम व लहान आकाराच्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते),

मल्टी कँप (मोठ्या,मध्यम व लहान आकाराच्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते),

बँलन्सड (कंपन्याच्या शेअर्समध्ये व कर्जरोख्यात गुंतवणूक करुन समतोल राखला जातो), 

सेक्टोरल(एकाच क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते) आदी विविध प्रकारच्या व कमी जास्त जोखमीच्या योजना असतात. आपल्या जोखीम स्विकारण्याच्या व गुंतवणूक कालावधीनुसार योजना निवडावी. (म्युच्युअल फंड व गुंतवणूक या विभागात याची सविस्तर माहिती दिलेली आहे).या प्रकारातील चांगल्या योजना निवडीसाठी,चांगल्या योजना या विभागाला भेट द्या.

वरील सर्व समभाग आधारित योजनांची विस्तृत माहिती याच संकेतस्थळावर दिलेली आहे ती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

२)     डेब्ट फंड योजना (कर्जरोखे आधारीत): या प्रकारच्या योजनेत विविध योजना असतात. या प्रकारच्या योजनेत शेअर बाजाराची जोखीम नसल्यामुळे यातील काही योजनेत अत्यल्प काळासाठी गुंतवणूक करता येते. सर्वसाधारणपणे अशा योजनेतून मिळणारा परतावा हा तेवढ्याच कालावधीच्या बँक ठेवींपेंक्षा जास्त मिळण्याचीच शक्यता असते. या प्रकारात 

लिक्वीड योजना (अल्प मुदतीच्या कर्जरोख्यात व मनी मार्केट सिक्युरिटीज ज्यांची मुदत ९१ दिवसांपेक्षा कमी आहे व ज्यावर ठरावीक दराने उत्पन्न मिळते अशा साधनात गुंतवणूक केली जाते), 

इंकम योजना (सरकारी व कंपन्यांच्या कर्जरोख्यात गुंतवणूक केली जाते –व्याज दर बदलाचा प्रभाव पडतो),

मन्थली इंकम प्लान (७५ ते ८०% रक्कम दिर्घ मुदतीच्या सरकारी व कंपन्यांच्या कर्जरोख्यात व उर्वरीत २० ते २५% रक्कम शेअर बाजारात गुंतवले जातात व नियमीत दरमहा/त्रैमासिक डिव्हिडंड दिला जातो), 

फिक्सड मँच्युरीटी प्लान अर्थात निश्चीत तारखेला पुर्ण होणारी योजना (जेवढ्या दिवसाची योजना असेल तेवढ्या दिवसाच्याच सरकारी व कंपन्यांच्या कर्जरोख्यात गुंतवणूक केली जाते – या योजनेत जवळपास जोखीम नसते), इ. अनेक प्रकारच्या योजना गुंतवणूकदाराच्या गरजेप्रमाणे असतात.

उद्दिष्ट आधारीत योजना सहा प्रकारच्या असतात

ग्रोथ योजना

ग्रोथ योजना हि मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी भांडवली वाढ देऊन आशादायक परतावा मिळण्यासाठी केली जाते. यातील मोठा हिस्सा शेअर बाजारात गुंतविला जातो. त्यामुळे त्यांचे किंमतींत छोट्या कालावधीत जरी घट झाली तरी दीर्घ कालावधीत या योजना चांगलाच परतावा देतात. तरुण व्यक्ती ज्या जास्त जोखीम स्वीकारू शकतात त्यांचेसाठी हा योग्य पर्याय आहे.

इन्कम योजना

या योजनांमध्ये बॉंडस् व कॉर्पोरेट डिबेंचर्ससारख्या निश्चित उत्पन्न देणा-या सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक केली जाते. यातीला परतावे हे स्थिर आणि कमी जोखिमेचे असतात. जर तुम्ही निवृत्त व्यक्ती असाल किंवा तुम्हाला भांडवली स्थैर्य हवे असेल अथवा जर तुम्हाला नियमित व स्थिर परतावे हवे असतील इन्कम योजना स्वीकारा.

बॅलन्सड योजना

नावाप्रमाणेच या योजनेखाली काही सुनिश्चित प्रमाणात शेअरमार्केटमधे व निश्चित इन्कम सिक्युरिटीजमधे गुंतवणूक केली जाते. हि योजना म्हणजे ग्रोथ व इन्कम स्कीमांचा सुवर्णमध्य आहे. निव्वळ इक्विटी योजनांचे तुलनेत यात कमी जोखीम असते.

लिक्विड स्कीम्स

तुम्हाला जर फारच थोड्या कालावधीसाठी गुंतवणूक करावयाची असेल हि योजना चांगली आहे हिच्यामध्ये अगदी २ दिवसासाठीसुद्धा गुंतवणूक केली जाते. या योजनेत मनी मार्केट ट्रेझरी बिल्स, सर्टिफिकेट आफ डिपॉझिट, कमर्शिअल पेपर आणि सरकारी रोख्यात अशा सुरक्षित पण कमी कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते. बॅंकेतील बचत व चालू खाते ज्यावर फारच कमी व्याज मिळते अथवा अजिबात व्याज मिळत नाही त्यापेक्षा या योजनेत गुंतवणूक केली असता साधारणपणे ६ ते ७ टक्के वार्षिक दराने या योजनेत परतावा मिळतो.

गिल्ट फंड

हे फंड खासकरुन शून्य क्रेडिट जोखीम असणा-या सरकारी रोख्यात गुंतवणूक करतात. तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक करावयाची असेल या योजनेत करा.

टॅक्स सेव्हिंग स्कीम्स

या योजनेअंतर्गत केलेली गुंतवणूक इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम ८०-सी खाली रुपये १००००० (रुपये एक लाख मात्र) पर्यंत एकूण उत्पन्नातून वजावटीला प्राप्त असते. यात केलेली गुंतवणूक जर इन्कम टॅक्स वजावटीसाठी केली असेल तर ३ वर्ष काढता येत नाही. कर बचतीसाठी हा उत्तम पर्याय आहे. युलीपमधे कर बचतीसाठी गुंतवणूक करण्या ऐवजी हा पर्याय वापरणे शहाणपणाचे असते.

विशेष योजना

इंडेक्स फंडस्

या योजना विशिष्ट इंडेक्समधील समान क्षमतेच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात. त्या विशिष्ट इंडेक्सचा पोर्टफोलिओ अशा योजनेत परावर्तित होतो.

सेक्टर स्पेसिफिक फंडस्

विशिष्ट उद्दोग किंवा क्षेत्रात गुंतवणूक केली जाते. उदा. बॅंकींग क्षेत्र अथवा आयटी क्षेत्र इ. या फंडातील परतावे हे त्या क्षेत्रातील उद्दोगातील कामगिरीवर अवलंबून असतात त्यामुळे या फंडात जास्त जोखीम असते व गुंतवणूकदाराला नियमित लक्ष ठेवावे लागते शेअर बाजारात जाणकारी असणा-यानीच अशा योजनेत गुंतवणूक करणे लाभदायक होऊ शकते.

सर्वसामान्य गुंतवणूकदाराने हे फंड टाळणेच इष्ट. सर्वसामान्य गुंतवणूकदाराने डायव्हर्सिफाइड ओपन-एंडेड स्कीम मध्येच शक्यतो गुंतवणूक करावी हेच उत्तम. 

Read more
  • Published in About Mutual Fund
No Comments

गुंतवणुकीसाठी पर्याय

Saturday, 22 December 2018 by Sadanand Thakur

म्युचुअल फंडातील सर्व प्रकारातील योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी तीन पर्याय उपलब्ध असतात

  • वृद्धी पर्याय (Growth Option): या पर्यायात केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य बाजारातील काळानुसार रोजच्या रोज बदलत असते. ज्या व्यक्तींना दीर्घ मुदतीत चांगली संपत्ती निर्माण करावयाची असेल किंवा काही वर्षांनंतर कोणतेतरी उदिष्ठ पूर्ण करण्यासाठी रक्कम तयार करावयाची असेल उदा. मुलांचे शिक्षण, विवाह, रिटायरमेंट इ. त्यासाठी हा पर्याय उत्तम मानला जातो. पैसे केव्हाही काढण्याची सुविधा उपलब्ध असते.
  • लाभांश पुनर्गुंतवणूक (Dividend Reinvestment): या पर्यायात योजनेमध्ये नियमितपणे प्रॉफिट बुकिंग केले जाते व ज्या ज्या वेळेला योजनेमध्ये अतिरिक्त रक्कम जमा असेल त्या त्या वेळेला युनिटधारकांना प्रति युनिट ठराविक दराने लाभांश दिला जातो. मात्र लाभांश पुनर्गुंतवणूक (Dividend Reinvestment) हा पर्याय निवडला असेल तर हा लाभांश योजनेत परत गुंतवला जातो. या पर्यायापेक्षा वृद्धी पर्याय घेणे केव्हाही चांगले असते. मात्र जर एखाद्या व्यक्तीने काही काळ निरनिराळ्या साधनात गुंतवणूक करून काही रक्कम जमा केलेली असेल व त्या गुंतवणुकीवर काही ठरविक काळाने नियमित उत्पन्न मळावे अशी इच्छा असेल तर त्यांनी या प्रकारे गुंतवणूक करण्यास हरकत नाही. कारण म्युच्युअल फंड योजनेतून दिला जाणारा लाभांश हा प्रति युनिट दिला जात असल्यामुळे या पर्यायामुळे तुमची युनिट्स वाढत जातात तुम्हाला नंतर तुमच्या गुंतवणुकीवर जास्त दराने लाभांश मिळू शकतो.

लाभांश पेआऊट: या पर्यायात योजनेमध्ये नियमितपणे प्रॉफिट बुकिंग केले जाते व ज्या ज्या वेळेला योजनेमध्ये अतिरिक्त रक्कम जमा असेल त्या त्या वेळेला युनिटधारकांना प्रति युनिट ठराविक दराने लाभांश दिला जातो. असा लाभांश दिला जातानाच प्रचलित दराने लाभांश वितरण कर कापून लाभांशाची रक्कम दिली जात असल्याने गुंतवणूकदाराच्या हातात मिळणारी रक्कम हि करमुक्त असते.  ज्यांना आपल्या गुंतवणुकीवर नियमितपणे रिटर्न्स मिळावेत असे वाटते अशा व्यक्तींनी हा पर्याय गुंतवणूक करताना घ्यावा. गेले अडीच तीन वर्षे म्युच्युअल फंडाच्या काही संतुलित प्रकारातील योजनेतून नियमित दर महिना किंवा त्रैमासिक लाभांश दिला जातो. ज्यांना नियमित प्रति महिना आपल्या गुंतवणुकीवर पेन्शन प्रमाणे रक्कम मिळावी असे वाटते अशा व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे म्युच्युअल फंडाच्या  कोणत्याही योजनेत नियमितपणे लाभांश दिला जाईलच याची खात्री दिलेली नसते. जर बाजारात मोठी मंदी आली तर काही काळ म्हणजे परत तेजी येऊन योजनेमध्ये अतिरिक्त रक्कम जमा होईपर्यंत लाभांश देणे खंडित होऊ शकते, अशा वेळी कदाचित ६-७ महिने लाभांश देणे खंडित होऊ शकते.

Read more
  • Published in About Mutual Fund
No Comments

गुंतवणुकीचे पर्याय

Saturday, 22 December 2018 by Sadanand Thakur

गुंतवणुकीचे पर्याय

एक रकमी गुंतवणुक

म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत तुम्ही एक रकमी किंवा एसआयपी माध्यमातूनही गुंतवणूक करू शकता. समभाग आधारित योजनेत शेअर बाजाराची जोखीम अंतर्भुत असते व म्हणूनच अशा योजनेत दिर्घकाळ म्हणजे किमान ५ वर्षे ते २० वर्षे कालावधीसाठी गुंतवणूक करावी. या प्रकारचे योजनेतील निधीपैकी किमान ८०% व जास्तीत जास्त १००% रक्कम ही निरनिराळ्या कंपन्याचे शेअर्स मध्ये गुंतवली जाते व उर्वरित रक्कम ही निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनात बाजाराचे काळाप्रमाणे गुंतवली जाते. म्युचुअल फंडाच्या ओपन एन्डेड योजनेत केव्हाही पैसे गुंतवता येतात किंवा काढूनही घेण्याची सुविधा उपलब्ध असते.  गुंतवणूक करताना वृद्धी व लाभांश असे दोन पर्याय उपलब्ध असतात. लाभांश मध्ये पे-आउट व पुनर्गुंतवणूक असे दोन पर्याय असतात, तुमच्या गरजेनुसार याची निवड करावी. आपण एक रकमी करतना प्रथम खाते सुरु कताना किमान रु.५००० व जास्तीत जास्त कीतीही रक्कम गुंतवता येते, एकदा खाते उघडून झाले कि नंतर योजनेच्या नियमानुसार किमान रु.५०० ते रु.१००० अश्याप्रकारे कितीही वेळा कितीही रक्कम गुंतवता येते. त्याचप्रमाणे पैसे काढताना किमान रु.१००० किंवा संपूर्ण रक्कम अशी केव्हाही काढता येते. थोडक्यात सांगावयाचे झाले तर बँकेच्या बचत खात्याप्रमाणे म्युचुअल फंडाच्या कोणत्याही ओपन एन्डेड योजनेत पैसे भारता किंवा काढता येतात. फरक एवढाच असतो कि म्युचुअल फंडाच्या योजनेतील गुंतवणुकीचे मूल्य रोजच बाजारातील चढ उतारानुसार कमी जास्त होत असते. मात्र एक गोष्ट लक्षात ठ ठेवली पाहिजे कि दीर्घ मुदतीत शेअरबाजार हा वाढतच असतो. म्हणून दीर्घ मुदतीत सर्वाधिक फायदा मिळतो, अल्प मुदतीत मात्र मोठा नफा किंवा मोठे नुकसानही होऊ शकते.

एक रकमी गुंतवणूक कोणी करावी?

ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी अतिरिक्त रक्कम असेल व ती किमान ५ वर्षे किंवा अधिक काळ आपल्याला लागणार नसेल अशा कोणत्याही व्याकीने म्युचुअल फंडात गुंतवणूक करावी. मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेची पूर्ण माहिती करून घ्यावी. बाजारात मोठी मंदी आली तर किती प्रमाणत नुकसान होऊ शकते तेही समजून घेतले पाहिजे. जर मंदी आली तर तुमची २ ते ३ वर्षे थांबण्याची तयारी असली पाहिजे. म्युचुअल फंडाच्या योजनेतून सर्वसाधारणपणे जो महागाईचा वार्षिक सरासरी दर असतो त्यात देशाच्या जी.डी.पी.च्या वार्षिक वाढीचा सरासरी दर मिळवला असता जी संख्या येते तेवढा तरी परतावा मिळत असतो. आपल्या देशात स्वातंत्र्यापासून पाहिल्यास महागाईचा दर हा ७% आहे आणि सध्या जी.डी.पी.चा दर ७% आहे म्हणूनच म्युचुअल फंडाच्या समभाग आधारित योजनेतून सरासरी वार्षिक १४% किंवा अधिक दराने परतावा मिळू शकतो. म्हणूनच जेव्हा केव्हा गुंतवलेले पैसे काढावयाचे असतील तर किमान वार्षिक १४% चक्रवाढ दराने परतावा मिळत असेल तेव्हाच पैसे काढणे योग्य होते. ज्यांनी १९९५ साली म्युचुअल फंडाचे योजनेत एक रकमी रु.एक लाख गुंतवले होते त्याचे १० ऑक्टोबर २०१८ रोजीचे मूल्य रु.४० लाख ते रु.एक कोटी चाळीस लाख एवढे, योजनेच्या स्वरूपानुसार व योजनेतील जोखीमिनुसार, झालेले आहे. मात्र अशी एक रकमी गुंतवणूक गुंतवणूक ही दीर्घ मुदतीसाठीच करावी. थोडक्यात एकरकमी गुंतवणूक करून त्यात जसे जमेल तशी नियमितपणे काही रक्कम दीर्घकाळ गुंतवणूक करत राहिले तर एक मोठी संपत्ती निर्माण करता येऊ शकते.

याचप्रमाणे ज्या व्यक्तींना निवृतीनंतर किंवा अन्य कोणत्याही कारणाने एक रकमी रक्कम मिळते व त्या रकमेवर जर तुम्हाला दर महिना/त्रैमासिक/वार्षिक स्वरुपात नियमित पैसे मिळावे असे वाटत असते त्यांनी एक रकमी गुंतवणूक करून लाभांश पे-आउट हा पर्याय स्वीकारून गुंतवणूक करावी.

एस.आय.पी. माध्यमातून नियमितपणे गुंतवणूक करणे

समभाग आधारित कोणत्याही योजनेत नियमित स्वरुपात दर महीना किंवा त्रैमासिक दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणे हा संपत्ती निर्माण करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.  नियमितपणे गुंतवणूक केल्यामुळे बाजारात तेजी असतानाही गुंतवणूक केली जाते तसेच जेव्हा मंदी असते तेव्हाही गुंतवणूक सुरु राहते, यामुळे सरासरीचा फायदा मिळतो. उदा. ज्यांनी गेले २० वर्षे नियमित दर महीना रु.१०,०००/- (रुपये दहा हजार मात्र) गुंतवणूक केली आहे त्यांची एकूण गुंतवलेली रक्कम झाली रु.२४ लाख, व दि.१० ऑक्टोबर २०१८  चे मूल्य आहे किमान रु.४ कोटी व जास्तीत जास्त आहे रु.८ कोटी. समभाग आधारित योजनेतून मिळणारा परतावा हा योजनेच्या स्वरूपानुसार बदलता असतो. मात्र सर्वसाधारणपणे समभाग आधारित योजनेतून गेल्या २०-२५ वर्षात वार्षिक चक्रवाढ २०% ते २५% दराने परतावा मिळालेला आहे. मात्र आपण गुंतवणूक करताना हा परतावा साधारण १५% वार्षिक चक्रवाढ दराने मिळू शकेल अशा अपेक्षेने गुंतवणूक करावी. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेची सर्व माहीती पूर्णपणे समजून घ्यावी, आपले वय, उप्तन्नाचे साधन, जोखीम स्वीकारण्याची तयारी इ. बाबी नुसार योजनेची निवड करावी व गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठीच करावी. सर्वसाधारणपणे गुंतवणुकीचा कालावधी हा किमान ५ वर्षे किंवा जास्त असावा. जेवढा कालावधी जास्त तेव्हढा चक्रवाढ पद्धतीने मिळणारा फायदा जास्त असतो.

Read more
  • Published in About Mutual Fund
No Comments

म्युचुअल फंडाचे वेगवेगळे प्रकार

Saturday, 22 December 2018 by Sadanand Thakur

म्युचुअल फंडाचे वेगवेगळे प्रकार

तुम्हाला किती काळासाठी पैसे गुंतवायचे आहेत, किती जोखीम तुम्ही स्वीकारू शकता या गोष्टींवर अवलंबून तुम्ही म्युचुअल फंडाची योजना निवडली पाहिजे.

म्युचुअल फंडामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या योजना असतात :

१)    ओपेन एन्डेड:अशा प्रकारच्या योजनेत केव्हाही गुंतवणूक करता येते त्याचप्रमाणे केव्हाही पैसे काढता येतात.

२)    क्लोज एन्डेड:अशा प्रकारच्या योजनेतती योजना ज्यावेळी जाहीर होते,तेव्हाच कोणत्या तारखेपर्यंत गुंतवणूक करता येईल हे जाहीर केले जाते व त्या तारखेपर्यंतच गुंतवणूक करता येते. या योजनेतील पैसे मुदत संपल्यावर थेट आपल्या बँक खात्यात जमा होतात.

योजनांचे प्रकार

१)    समभाग आधारित योजना :यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॅाल कॅप, मल्टी कॅप, बॅलन्सड, क्षेत्रीय व विशिष्ट उद्देश आधारित योजना असतात. अशा प्रकारच्या योजनेतील काही ठराविक प्रमाणातील रक्कम हि शेअर बाजारात व उर्वरित निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनात गुंतवली जाते. अशा योजनेत शेअर बाजारातील चढ उतारांची जोखीम अंतर्भूत असते. मात्र अशी जोखीम असते म्हणूनच अशा योजनेतून सर्वाधिक परतावा ( योजनेच्या स्वरूपानुसार वार्षिक सरासरी १२% ते ३०% पर्यंत ) गेल्या दोनशे वर्षात मिळालेला आहे. अशा प्रकारच्या योजना या दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्यासठी सर्वोत्तम मानल्या जातात. या प्रकारच्या योजनेतून मिळणारा परतावा हा एक वर्षापेक्षा जास्त काळ गुंतवणूक केल्यास पूर्णपणे करमुक्त असतो. या प्रकारच्या योजनेत ग्रोथ व लाभांश असे दोन पर्याय उपलब्ध असतात. काही योजनेत मासिक लाभांश दिला जातो, तर काही योजनेत त्रैमासिक  /वार्षिक तत्वावर लाभांश दिला जातो. मिळणारा लाभांश पूर्णपणे करमुक्त असतो.

२)    बॅलन्सड(संतुलित ) योजना: या प्रकारातील योजनेतील पैशांची गुंतवणूक हि सामान्यतः किमान ६५% शेअर बाजारात व उर्वरित ३५% हि निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनात केली जाते.मात्र जर शेअर बाजारात तेजी असेल तर हेच प्रमाण निधी व्यवस्थापक ८५% पर्यंत वाढवू शकतो, ज्यामुळे गुंतवणूकदाराला शेअर बाजारातील तेजीचा फायदा मिळून जास्त परतावा मिळू शकतो. जर शेअर बाजारात मंदीचा कल असेल, तर शेअर बाजारातील गुंतवणूक तो ६५% पर्यंत कमी करू शकतो. ज्यामुळे निश्चित उत्त्पन्न देणाऱ्या साधनातून जास्त परतावा मिळेल व शेअर बाजारातून होणारे नुकसान थोडे भरून निघू शकेल. म्हणूनच या योजनेला संतुलित योजना म्हंटले जाते.गेल्या 20 वर्षातील अशा योजनेचा परतावा पाहिल्यास तो लार्ज कॅप योजनेतील परताव्यापेक्षाही जास्तच मिळालेला दिसून येतो. अशा योजनेतून दीर्घ मुदतीत १२% ते १५% दराने परतावा मिळू शकतो. या प्रकारातील योजनेत गुंतवणूकदाराला वृद्धी व लाभांश असे पर्याय उपलब्ध असतात. अशा प्रकारातील अनेक योजना गेले काही वर्षे नियमित दरमहा लाभांश देत आहेत. काही योजनांचा वार्षिक लाभांश गुंतवणुकीवर सरासरी 11% ते १२% दराने नियमित मिळत आहे. य व्यतिरिक्त दीर्घ मुदतीत मुद्दलसुद्धा काही पटीत वाढलेले आहे. या योजनेतून मिळणारा सर्व प्रकारचा हा आयकर मुक्त असतो.

३)    बॅलन्सड अॅडव्हॅंटेज योजना : या प्रकारातील निधी, हा शेअर बाजार व निश्चित उत्त्पन्न देणाऱ्या साधनात ठराविक प्रमाणात गुंतवला जातो, जो तेजीच्या काळात जास्तीत जास्त ८५% एवढा असू शकतो व `मंदीच्या काळात तो ३०% पर्यंत कमी केला जाऊ शक्रो. परत या योजनेतील शेअर्स व बाँड मधील प्रमाण हे रोजच्या रोज नियंत्रित केले जाते म्हणजे जर शेअर बाजार वाढला व जास्त फायदा झाला तर तो बाँड मध्ये वर्ग केला जातो व उलट जर शेअर बाजारात  तोटा झाला तर डेट मधील गुंतवणूक कमी करून ती शेअर बाजारात वर्ग केली जाते. या योजनेतील जोखीम हि फारच कमी असते. या प्रकारातील योजनेतून १०% ते १२% चा वार्षिक परतावा अपेक्षिला जावू शकतो. हि योजना ३ ते ५ वर्षाच्या बँक ठेवींसाठी उत्तम पर्याय मानली जाते. पैसे केव्हाही काढता येतात. या प्रकारातील योजनत गुंतवणूकदाराला वृद्धी व लाभांश असे पर्याय उपलब्ध असतात. या योजनेतून मिळणारा सर्व प्रकारचा परतावा हा आयकर मुक्त असतो.

४)    कर्जरोखे आधारित योजना: या प्रकारातील योजनेतील पैसे पूर्णपणे हे निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनात गुंतवले जातात, यामुळे अशा  प्रकारच्या योजनेत मुद्दल कमी होण्याचे प्रमाण जवळपास नसते. या प्रकारच्या योजनेतील पैसे शेअर बाजारात गुंतवले जात नसल्यामुळे शेअर बाजाराचे चढ उतारांची जोखीम नसते. ज्यांना शेअर बाजारात गुंतवणूक  करण्याची भीती वाटते मात्र बँकेच्या व्याजापेक्षा जास्त परतावा मिळावा असे वाटते त्यांचेसाठी या योजना उत्तम पर्याय मानल्या जात्तात. या योजनेत व्याज दरातील फरकानुसार मिळणारा परतावा बदलत असतो. जर आर. बी. आय. ने व्याज दारात वाढ केली तर मिळणारा परतावा कमी होतो व जर व्याज दरात कपात केली तर मिळणारा परतावा वाढतो. याचप्रमाणे या योजनेत क्रेडीट रेटिंग्जमधील बदल पर्ताव्यावर परिणाम करतात. जर एखादा ऋणको अवसानीत गेला तर परतावा कमी होऊ शकतो.

Read more
  • Published in About Mutual Fund
No Comments

म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यामुळे मिळणारे लाभ

Saturday, 22 December 2018 by Sadanand Thakur

तुम्हाला तज्ञांचे मार्गदर्शन मिळतं

प्रत्येक म्युचुअल फंड हाउस त्यांचे फंड व्यवस्थापनेसाठी अनेक फंड मॅनेजर सर्व फंड मॅनेजरला साहाय्य करण्यासाठी रिसर्च टीम व व्यावसायिक तज्ञ यांची नेमणूक करत असतात जे तुमच्यासाठी सतत आर्थिक बाजार पेठेवर लक्ष ठेऊन असतात. ते विविध क्षेत्रातील आणि कंपन्यांमधील मार्केटचा कल व भावी संभाव्यता यांच संशोधन नियमित पणे करत असतात. आपले रिसर्च रिपोर्ट, संबंधित स्कीमचे फंड मॅनेजरला सादर करत असतात त्या नंतर संबंधित फंड मॅनेजर जे तुलनात्मक अभ्यास करून गुंतवणुकीचा अंतिम निर्णय घेत असतात या तज्ञांमुळे गुंतवणुकीचा योग्य निर्णय घेता येत असतो. तसं तुम्हाला एकट्याने करणे कठीण होत आणि म्हणूनच ९०% पेक्षा जास्त गुंतणूकदार शेअर मार्केट मध्ये नुकसान सोसत असताना म्युचुअल फंडाचे नियमित गुंतवणुकदार मात्र दीर्घ मुदतीत मोठा लाभ मिळवीत असतात.

कमीजोखीम

म्युचुअल फंडाची खासियत म्हणजे त्यात गुंतवणुकीच्या अनेक संधी मिळतात. सामान्यपणे एकाच सिक्युरिटीतील गुंतवणूक ती कंपनी किती चांगला किंवा वाईट व्यवसाय करते यावर अवलंबून असते.पण म्युचुअल फंडात तुम्ही रुपये ५००० गुंतवा अथवा रुपये ५००००० गुंतवा त्यातील थोडी थोडी रक्कम वेगवेगळ्या अनेक कंपन्याच्या शेअर्स मध्ये गुंतविली जात असते. जेणेकरून तुमच्या गुंतवणुकीची जोखीम कमी होते.

तुम्हाला आवश्यक तेव्हा पैसे काढून घेण्याची सुविधा असते.

ओपेन एन्डेड म्युचुअल फंड योजना या बँकेच्या बचत खात्याप्रमाणे चालविता येत असतात म्हणजेच यात केव्हाही पैसे भरता येतात व केव्हाही काढता येतात. क्लोज एन्डेड (बंद योजना) केलेली गुंतवणूक काढण्यावर मात्र काही निर्बंध असतात आणि म्हणूनच बऱ्याच तज्ञांशी सहमत होताना आम्ही सुद्धा ओपेन एन्डेड म्युचुअल फंड स्कीम्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत असतो.

कमीत कमी खर्च

तुम्ही इतर अनेक गुंतवणूकदारांसोबत गुंतवणूक करत असल्यामुळे तुम्हाला तुलनात्मक दृष्ट्या गुंतवणुकीचा खर्च कमी येतो. जर तुम्ही एकट्याने गुंतवणूक केली असती, तर हा खर्च वाढला असता म्हणुनच भांडवली बाजारात थेट गुंतवणुकीपेक्षा म्युच्यअल फंडात गुंतवणूक करायला कमी खर्च येतो.

पारदर्शकता

जमीन जुमल्यातीलगुंतवणुकीत जे शक्य होत नाही ते यात शक्य होते. यात गुंतवणुकीचे मुल्य रोजच्या रोज जाणून घेता येते, शिवाय ठरविक काळानंतर बहुदा प्रत्येक महिन्याच्या अखेरीला सर्वच फंड घराणी त्यांची फॅक्टशीट प्रकाशित करत असतात, जिच्या आधारे तुम्ही म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक कोण कोणत्या कंपन्यांच्या समभागामध्ये गुंतवली आहे हे समजते. तसेच फंड मॅनेजरचे धोरणही तुम्ही ठराविक कालावधी नंतर जाणून घेऊ शकता.

कमीत कमी इन्कमटॅक्स

इक़्विटी म्युचुअल फंडावरील मिळणारे लाभांश हे पूर्णतः कर मुक्त असतात. शिवाय इक़्विटी म्य्चुअल फंडात केलेली गुंतवणूक एक वर्षानंतर काढली असता रु. एक लाखांपर्यंत मिळणारा फायदा हापूर्णतः कर मुक्त असतो.  आणि जर होणारा फायदा हा रु.एक लाखांपेक्षा जास्त असेल तरच १०% दारांना दीर्घ मुदतीचा भांडवली उत्पन्न कर भरावा लागतो. हि सुधारणा २०१८ च्या देशाचा आर्थिक बजेटमध्ये केलेली आहे. हा कर जेव्हा आपण गुंतवलेले पैसे काढून घेणार त्या वर्षीच भरावा लागतो त्यामुळे दरवर्षी हा कर भरावा लागत नाही.  टी.डी.एस.प्रमाणे मुळातून कर कपात केली जात नाही.

सेबी व अँफीचे नियंत्रण

सर्व म्युचुअल फंड हे Security & Exchange Board of India (सेबी) आणि Association of Mutual Fund Of India (AMFI) कडे नोंदणीकृत असतात आणि गुंतवणूक दारांचे हित सांभाळणाऱ्या तरतुदी व नियमानुसार काम करत असतात. सेबीकडून स्टॅाक एक्सचेंज आणि त्यांच्या सह्चालकांवर नियंत्रण तर ठेवले जातेच शिवाय चुकीच्या सह्चालनावर दंड ठोठावून, सिक्युरिटी मार्केट व सिक्युरिटी व्यवहारातील भ्रष्टाचारला पायबंद घालते.

Read more
  • Published in About Mutual Fund
No Comments

शेअर बाजार संबंधी योजनेत गुंतवणूक का करावी?

Saturday, 22 December 2018 by Sadanand Thakur

शेअर बाजारात जोखीम निश्चितच असते पण तिचा प्रभाव आपल्या मूळ गुंतवणुकीवर काही काळासाठीच  पडत असतो, दीर्घ काळात मात्र गुंतवणुकीतून भरपूर फायदाच होत असतो कारण दीर्घ मुदतीत बाजारात तेजी येतच असते. अर्थशास्त्राचा एक नियम आहे ज्याची किंमत वर जाते ती काही काळानंतर खाली येतेच आणि खाली आलेली किंमत परत वर जातेच.हे चक्र सतत चालू असते.

मुंबई स्टॅाक एक्सचेंजचा सेन्सेक्स वर्ष १९७९ मध्ये १०० पॅाइंट ने सुरु झाला होता./ आज तो जवळपास ३५३७२ आहे म्हणजेच गेल्या ३७/३८ वर्षापूर्वी जर का तुम्ही १०० रुपये सेन्सेक्स मध्ये गुंतवले असते तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य ३५३७२ एवढे झाले असते . खालील टेबल पहा :

YearOpenHighLowClose
1979 118.76
1980 148.25
1981 227.72
1982 235.83
1983 252.92
1984 271.87
1985 527.36
1986 524.45
1987 442.17
1988 666.26
1989 778.64
1990 1048.29
19911027.381955.29 1908.85
1992 4546.58 2615.37
19932617.783459.07 3346.06
19943436.874643.31 3926.9
19953910.163946.66 3110.49
19963114.084131.222713.123085.2
19973096.654605.413096.653658.98
19983658.344322.002741.223055.41
19993064.955150.993042.255005.82
20005209.546150.693491.553972.12
20013990.654462.112594.873262.33
20023262.013758.272828.483377.28
20033383.855920.762904.445838.96
20045872.486617.154227.56602.69
20056626.499442.986069.339397.93
20069422.4914035.38799.0113786.91
200713827.7720498.1112316.120286.99
200820325.2721203.777697.399647.31
20099720.5517530.948047.1717464.81
201017473.4521108.6415651.9920509.09
201120621.6120664.815135.8615454.92
201215534.6719612.1815358.0219426.71
201319513.4521483.7417448.7121170.68
201421222.1928822.3719963.1227499.42
201527485.7730024.7424833.5426117.54
201626101.5029077.2822494.6126626.46
201726711.1534137.9726447.0634056.83
201834059.9937533.532483.8437494.4

वरील टेबलवरून तुमच्या लक्षात येईल की १०० अंकांनी १९७९ मध्ये सुरु झालेला सेन्सेक्स २०१८ च्या जुलै मध्ये ३७४९४ पर्यंत वाढत गेला, मात्र हा प्रवास एकाच वरच्या (तेजीच्या ) दिशेने झालेला नसून तो वर खाली होत या टप्प्यावर पोहोचला आहे. त्याचा प्रवास पहा, १९९२ मध्ये ४५४६ पर्यंत वर गेला, येथे हर्षद मेह्ताचा घोटाळा उघड झाला व त्याच वर्षी तो १५०० अंकापर्यंत खाली आला, पण त्याच वर्षात परत तो २६१५ अंकापर्यंत वर चढला, पुढे २००० साली तो ६१५० पर्यंत वाढला यानंतर आय.टी. कंपन्यांचा फुगा सगळ्या जगातच फुटला आणि २००१ साली तो २५९४ पर्यंत खाली आला, तेथून जानेवारी २००८ मध्ये तो २१००० ची पातळी तोडून वर गेला इथे अमेरीकेत सबप्राइमचे संकट उभे ठाकले व तो ७६९७ पर्यंत खाली आला पण पुढील वर्षीच तो १७५३० पर्यंत वर गेला. दोन वर्षांपूर्वी तो  २९०००पर होऊन गेला होता परत २२००० पर्यंत खाली येऊन आता तो ३७५०० पार झालेला आहे. यातून एक गोष्ट समजून येईल की मंदी हि फार कमी काळासाठी (एक वर्ष किंवा कमी) असते व नंतर येणारी तेजी ही दीर्घ काळासाठी (३ ते ५ वर्षे) असते.

learn mutual fundlearn share marketmutual funds in marathishare market in marathiम्युच्युअल फंडम्युच्युअल फंड समजून घ्याशेअरबाजार मराठीशेअरबाजार शिका
Read more
  • Published in About Mutual Fund
1 Comment
Page 2 of 2
« Previous 1 2
  • 1
  • 2

अनिवार्य सूचना (Disclaimers)

www.mutualfundmarathi.comया वेबसाईटची निर्मिती हि मराठी भाषिकांना त्यांचे मातृभाषेत म्युचुअल फंड व शेअरबाजाराची माहिती मिळावी म्हणून तयार केलेली आहे. या वेबसाईटची मालकी हि सदानंद ठाकूर याची असून येथील मजकूर पूर्व परवानगीशिवाय अन्यत्र पोस्ट करू नये. Thakur Financial Services ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस ARN-46061 व्दारे म्युचुअल फंड वितरक म्हणून AMFI व अनेक AMC सोबत रजिस्टर आहे. या संकेतस्थळावर दिलेली माहिती, फायनान्शियल प्लानिंग सुविधा, कॅलक्यूलेटर व अन्य सुविधा हि तुमच्या म्हणजे या संकेतस्थळाला भेट देणार्यांच्या माहितीसाठी त्यांनी स्वत: उपयोगात आणण्यासाठी आहे. आम्ही यासाठी कोणतीही फी किवा अन्य कोणतेही मानधन आकारत नाही. ह्याचा वापर करून केलेली गुंतवणूक तसेच परिणाम देईल असा आमचा दावा नाही. म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते. मागील कामगिरी तशीच राहील अथवा राहणार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा. (Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risk, read all scheme related documents carefully. Past performance of the scheme may or may not sustain in future).

Design & Powered By S.N Enterprises

TOP
×