• 9503718779 Sujay
  • 9518 752 605 Sadanand
  • clients.tfs@gmail.com
  • साइन इन
  • साइन अप करा
  • Switch English

Thakur Financial Services

  • पहिले पान
  • आमच्या बाबत
  • म्युचुअल फंड
    • ऑनलान गुंतवणूक करा
    • म्युचुअल फंडाबाबत
    • म्युचुअल फंडाचे प्रकार
      • समभाग आधारित
      • कर्जरोखे आधारित
      • करबचतीच्या योजना
    • गुंतवणूक
    • शेअरबाजार
      • भांडवली बाजार
      • फ्युचर्स
      • ऑप्शन
    • डिमॅट खाते
    • उत्पादने
    • सेवा व सुविधा
  • विमा
  • आयकर
  • लेख
  • डाउनलोड
  • म्युच्युअल फंड ऑनलाईन
    • ऑनलान व्यवहार करा
  • संपर्क करा
Mutual Fund Distributor having experience of more than 15 years. Share Market experience of more than 25 years. Author of "Mutual Fund - Swapnapurticha Rajmarg" Marathi book.
Page 3 of 11
« Previous 1 2 3 4 5 … 11 Next »

१४. अनेक क्षेत्रातील सवलतीत असणारे शेअर्स – सौदा करून विकत घ्या

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

१४. अनेक क्षेत्रातील सवलतीत असणारे शेअर्स – सौदा करून विकत घ्या

बाजारात अनेकवेळा काही चांगले शेअर्स अगदी कमी किंमतीमध्ये उपलब्ध असतात, जे सध्या अनेकांचे नावडते झालेले असतात. असे स्टॉक शोधण्याची एक चांगली पद्धत असते.

१) प्रथम असे शेअर्स शोधा कि काही तात्कालिक कारणामुळे ज्यांच्या किंमती कमी झालेल्या असतात व जे स्टॉक विकत घेण्यास बहुतांशी अल्पकालीन गुंतवणूकदार इच्छुक नसतात.

२) वरीलप्रमाणेच तर्क लढवून असे पहा कि एखाद्या कोणत्या क्षेत्रातील बहुतांशी स्टॉक या प्रकारात मोडत आहेत ते पहा. म्हणजेच किंमत कमी झाली आहे व दुर्लक्षित आहेत.

३) आता यातील काही शेअर्स तुम्ही तुमच्या “अवलोकनाच्या यादीत” समाविष्ट करा. हे असे करण्यासाठी खालील घटक विचारात घ्या:

पी/इ रेशो (Price to Earnjng Ratio): यासाठी कमीत कमी १० व जास्तीत जास्त ३० शेअर्स निवडा, ज्यांचा सध्याचा पी/ई ३० च्या जवळपास असला पाहिजे. बरेच वेळा कमी पी/इ असणारा शेअर हा अल्पकालीन गुंतवणूकदार खरेदी करण्यासाठी इच्छुक नसतात, म्हणून दुर्लक्षित असतो. आता अशा शेअर्स बाबत आघाडीचे विश्लेषक काय म्हणतात ते तपासून पहा. यासाठी तुम्ही एखादया चांगल्या मोठ्या ब्रोकरच्या संकेतस्थळावर हि माहिती पाहू शकता. उदा. ICICIDIRECT चे संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊन हे पाहू शकता.

किंमत-विक्री गुणोत्तर (Price to Sales Ratio):  याला PSR असेही संबोधले जाते. ह्याचा वापर स्टॉकचे सूक्ष्म विश्लेषण करण्यासाठी केला जातो. बरेच गुंतवणूकदार ज्या शेअरचा  PSR १ पेक्षा कमी असतो तो गुंतवणुकीसाठी चांगला शेअर मानत असतात. यासाठी मी जास्तीत जास्त 0.5 चा PSR आणि कमीत कमी कोरी जागा सोडून शेअर्स शोधतो. मात्र हे करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे कारण अनेकवेळा कमी PSR असणारे बरेच शेअर्स असू शकतात. याचा वापर करून आपण असे शेअर्स शोधू शकतो कि ज्यांची पूर्वी बरीच जास्त किंमत होती मात्र सध्या काही तात्कालिक कारणामुळे त्या शेअर्सची किंमत कमी झालेली असते.

कमाई मधील वाढीचा दर (Earnings Growth): अशी कंपनी पहा कि जिच्या वार्षिक कमाईचा दर हा २०% पेक्षा जास्त आहे. जर एखादया कंपनीचा Earnings Growth दर हा २०% पेक्षा जास्त व सोबत पी/ई १०% किंवा कमी असेल तर ती गुंतवणुकीची उत्तम संधी असू शकते. याला PEG किंवा PE to Growth रेशो असे म्हटले जाते. हुशार गुंतवणूकदार १ पेक्षा कमी PEG असणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. समजा वरील उदाहरणा प्रमाणे P/E १० / EG २० आहे तर PSR ०.५ होतो.

भांडवलावरील परतावा (Return on Equity): अशा कंपनीचे शेअर्स शोधा कि जे भांडवलावर वार्षिक २०% पेक्षा जास्त परतावा देत असतात. यामुळे तुम्हाला समजू शकते कि तुमच्या गुंतवणुकीवर किती दराने परतावा मिळू शकतो. जेवढा जास्त परतावा तेवढा तो शेअर खरेदी करण्यासाठी चांगला हे समजून जा.

वरीलप्रमाणे सर्व रेशोंचे एकत्रित विश्लेषण करून तुम्ही शेअर्स खरेदीचा योग्य निर्णय करू शकता. हे विश्लेषण करून झाल्यावर निरनिराळ्या आर्थिक संकेतस्थळावर जाऊन संबंधित कंपनीबाबतची माहिती गोळा करा आणि त्यानंतर योग्य किंमतीत शेअर्स खरेदी करा आणि शांत बसा. पैसा आपोआप तुमच्यासाठी काम करू लागेल.

About buy at a bargain in shares read in marathimutualfundmarathi.com
Read more
  • Published in Capital Market
No Comments

१३. गगनाला गवसणी घालणारे शेअर्स – योग्य किंमत कशी ठरवावी

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

१३. गगनाला गवसणी घालणारे शेअर्स – योग्य किंमत कशी ठरवावी?

बरेचवेळा असे  होते कि बाजारात, एखादया शेअरमध्ये तेजी असते तेव्हा प्रत्येकालाच तो शेअर विकत घ्यावयाचा असतो मात्र त्याची असणारी किंमत मात्र जास्त वाटत असते, म्हणून तो घ्यावा कि न घ्यावा हा त्याचा गोंधळ उडालेला असतो. यावेळी काही शेअर्सची किंमत योग्य असते तर काही शेअर्सची किंमत त्याच्या योग्यतेपेक्षा जास्त किंवा कमी असते. आता हे कसे ओळखावे?

एखादया शेअरची किंमत कमी किंवा जास्त असते यासाठी काहीतरी कारण हे असतेच बहुतांशी वेळा ते कारण म्हणजे वाजवीपेक्षा जास्त असणाऱ्या अपेक्षा हेच असते.  गुंतवणूकदाराची अपेक्षा असते कि संबंधित कंपनी हि दोन प्रकाराने आपला फायदा करून देईल: एक म्हणजे महसुलात वाढ आणि दुसरे म्हणजे कमाई मध्ये वाढ या दोन महत्वाच्या अपेक्षा एखादा शेअर खरेदी करताना असतात. यावेळी गुंतवणूकदारसमोरील सर्वात मोठे आव्हान हे असते कि  असे वेगाने वाढणारे शेअर्सच्या मागील कारण काय आहे हे ओळखणे हेच होय.

सातत्याने चांगली कामगीरी करणारे स्टॉक पहा. याचा अर्थ असा नव्हे कि तुम्ही ते फक्त खरेदी करा आणि पहात बसा. तर तुम्ही यातील काही शेअर्स पूर्वीच खरेदी केलेले असतील तर त्यांची कामगिरी नियमितपणे तपासली पाहिजे. आणि जेव्हा या शेअर्सची प्रति शेअर मिळणारे उत्पन्न कमी होते किंवा कमाई  कमी होते तेव्हा ते लगेच विकून मोकळे झाले पाहिजे. आणि जेव्हा त्या शेअर्सची किंमत मोठ्या प्रमाणात कमी होते तेव्हा असे स्टॉक हेरले पाहिजेत आणि ते खरेदी केले पाहिजेत. यासाठी गरज असते ती आत्मसंयमाची. मग तुम्हाला असे वाटते काय कि कंपनी कोणतीच गोष्ट चुकीची करणार नाही आणि तुम्हाला ते शेअर परत खरेदी करण्याची संधीच मिळणार नाही.  जर असे झाले तर ती जगातील एकमेव कंपनी असेल जी कधीच चूक करत नाही. कधी कधी असेही होते कि आपण जेव्हा शेअर खरेदी करतो तेव्हा वर्तमान भाव पातळीपेक्षा तो आपल्याला महाग वाटू शकतो परंतु खरे पाहता ते मूल्य बरेच चांगले असू शकते. दुसऱ्या भाषेत सांगावयाचे झाले तर P/E सध्य पातळीपेक्षा कमी असतो.

आपण ज्या गोष्टींवर ध्यान दिले पाहिजे त्या:

१) प्रत्येक क्षेत्रातील आघाडीची कंपनी/न्या निवडा कि ज्यांनी सातत्याने बाजारात वर्चस्व गाजवलेले आहे. मोठ्या कंपनीला आणखीन मोठे व्हावयाचे असते, कारण त्या जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात तसेच त्या संशोधन आणि विकासावर जास्त पैसे खर्च करू शकतात. एक त्रिकाल बाधित सत्य तुम्हाला माहित असेलच कि पैसा हा नेहमी पैसेवाल्याकडे जातो आणि मोठा माणूसच आणखीन मोठा होत असतो.

२) कंपनीची कमाई प्रत्येक वर्षीच वाढत असली पाहिजे, आणि ती जास्त टक्केवारीत वाढत असली पाहिजे.

३) कंपनीच्या महसुलात सातत्याने वाढ होत असली पाहिजे. आणि वाढ त्या क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या महसुली वाढीच्या दरापेक्षा जास्त दराने होत असली पाहिजे.

४) कंपनीचे व्यवस्थापन मजबूत असले पाहिजे.

५) आणि त्या कंपनीने वाढत्या स्पर्धेला पुरून उरण्याची क्षमता बाळगली असली पाहिजे.

जेव्हा तुम्ही अशी एखादी कंपनी शोधता कि जिच्यामध्ये वरील सर्व गुण सामावलेले आहेत तेव्हा त्या शेअर्सची किंमत कमी असूच शकत नाही. आणि म्हणून जर तो स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये असावा अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमत तो खरेदी करण्यासाठी मोजण्याची तयारी ठेवावीच लागेल. एका अर्थाने तुम्ही त्या कींपनीत प्रवेश करण्याचे मूल्यच देत असता असे समजले पाहिजे. आणि जर तुमच्याकडे संयम असेल तर कदाचित भविष्यात तो स्टॉक तुम्हाला कमी किंमतीत सुद्धा मिळू शकतो.

अशा कंपनीच्या शेअर्समधून मोठ्या प्रमाणावर जर तुम्हाला संपत्ती निर्माण करावयाची असेल तर ते स्टॉक तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये दीर्घ काळासाठी ठेवले पाहिजेत. शक्य असल्यास ते नियमितपणे जास्तीचे खरेदी करत राहिले पाहिजे, यामुळे तुम्ही त्या कंपनीच्या वाढीमध्ये तुम्हालासुद्धा वाढण्याची संधी देत असता. जरी तुम्ही अश्या चांगल्या कंपनीचे थोडे जरी स्टॉक घेऊन ठेवलेत तरी, काही काळाने बोनस आणि स्प्लिट च्या माध्यमातून तुमच्याकडील शेअर्सची संख्या वाढत जाते आणि परत परत तुमचे गुंतवणूक मूल्यसुद्धा वाढत जाते, याप्रकारे तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता. तुम्हाला माहित आहे का इन्फोसिस या कंपनीचे ज्यांनी १० किंवा त्या पटीत शेअर्स पूर्वी घेतले होते आज त्यांच्याकडे त्यांनी घेतलेल्या शेअर्सच्या संख्येत अनेक पटीने वाढ झालेली आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या कम्पनीचे काही शेअर्स खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे काही प्रमाणात मालक होत असता. आणि म्हणूनच एखाद्या कमी भावाच्या कंपनीच्या जास्त शेअर्स पेक्षा एखाद्या मोठ्या व चांगल्या कंपनीचे कमी शेअर्स बाळगणे हे केव्हाही चांगले असते. म्हणून जर तुम्हाला जास्त फायदा व्हावा असे वाटत असेल तर जास्त भावाचे चांगल्या कंपनीचे शेअर्स तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये बाळगले पाहिजेत.

जर तुमच्याकडे असलेल्या शेअरची किंमत सतत वाढत असेल तर ते आणखीन खरेदी करावेत काय?

जर तुम्ही बाळगून असलेल्या शेअर्सची किंमत २०% ते २५% किंवा जास्त जर ८ आठवड्याच्या आत वाढली असेल तर तुम्ही त्या शेअरमध्ये आणखीन खरेदी केली पाहिजे. मात्र त्या स्टॉक मध्ये मजबुती चालूच असली पाहिजे. कारण जेव्हा अशी किंमत वाढू लागते तेव्हा लवकरच त्या कंपंनी बाबत एखादी बातमी येणार असते.

बातमी प्रकाशित झाली कि काय करावे?

एखाद्या कंपनी संबंधित चांगली बातमी टीव्ही, वर्तमान पत्रे इ. माध्यमातून प्रसारित झाली कि लगेच आपल्या कडे असणारे शेअर्स विकून टाकावेत आणि त्यांची किंमत कमी झाली कि तेच स्टॉक परत विकत घेतले पाहिजेत. It is principal that sale on news.

About Sky rocketing stocks read in marathi mutualfundmarathi.com
Read more
  • Published in Capital Market
No Comments

१२. बाजाराची दिशा ओळखा

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

१२. बाजाराची दिशा ओळखा

बाजार कोणत्या दिशेने मार्गक्रमण करत आहे हे वेळीच ओळखता आले पाहिजे.

बाजारात मंदी येण्याचे संकेत आहेत काय?

यासाठी तुम्ही NSE निफ्टी आणि BSE सेन्सेक्स चा चार्ट नियमितपणे बारकाईने पहिला पाहिजे. हा चार्ट पाहत असताना किंमतीतील बदल आणि त्यातील उलाढाल या दोन्ही गोष्टी तपासल्या पाहिजेत. काही वेळा बाजार वर जात असतानासुद्धा काही शेअर्सच्या किंमती कमी होत असतात. यासाठी बाजारातील सरासरीचा अभ्यास करून चालत नाही. जेव्हा मंदी येणार असते तेव्हा अचानक बाजारातील मोठ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये विक्रीची उलाढाल वाढते. जर असा मंदीचा कल दर्शवला जात असेल तर आपल्या पोर्टफोलो मध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारे शेअर्स आपण प्रथम विकले पाहिजीत. जर बाजार आणखीन खाली जाण्याचे संकेत दिसत असतील तर तुमच्याकडील जास्तीत जास्त शेअर्स हे तुम्ही आणखीन वाट न पाहता विकले पाहिजेत. आणि जर बाजार परत सुधारण्याचे संकेत देत नसेल तर तुम्ही सगळेच शेअर्स विकून मोकळे झाले पाहिजे. जर तुम्ही खरेदी केलेला शेअर जर खरेदी किंमतीपेक्षा ८% कमी किंमतीला ट्रेड करत असेल तर तो तुम्ही लगेचच विकून टाकला पाहिजे. मात्र तुम्हाला जर त्या कंपनीबद्दल जबरदस्त विश्वास असेल तर तुम्ही ते शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेऊ शकता आणि शक्य असल्यास प्रत्येक मोठ्या घसरणीनंतर त्यात नियमितपणे खरेदी करतही राहू शकता. मात्र हे सूत्र फक्त आघाडीच्या पहिल्या १०० कंपन्यानाच लागू होते.

बाजार वर जाण्याचे संकेत देत आहे काय?

एकदा का बाजारात फार मोठी मंदी झाली कि बाजार परत उसळी मारण्याचा प्रयत्न करू लागतो. पण हा तेजीचा कल आहे कि नाही हे तुम्ही एक दोन दिवसातील बाजारातील घडामोडींवर ठरवू शकत नाही कारण तो कल फसवा असू शकतो. यासाठी तुम्ही थोडे थांबून बाजारात तेजी सुरु झाल्याची खात्री करून घेतली पाहिजे. जर बाजारातील रॅली सलग ३/४ दिवस सतत मजबुती दाखवत असेल व निफ्टी १% पेक्षा जास्तने सलगपणे बंद होत असेल आणि प्रत्येक दिवशी उलाढाल सुद्धा नियमितपणे वाढत असेल तर समजावे कि बाजारात परत तेजी अवतीर्ण झालेली आहे. जोरदार तेजी हि सलग ६ ते ७ दिवस सतत दिसली तर तो कल खरा मानावा. कधी कधी हा तेजीचा कला खरे पाहतां १० ते १५ दिवसात दर्शवतो, पण असे झाल्यास ती तेजी फसवी असू शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. बाजार कोसळताना तो विक्रीतील जास्त उलाढाल पहिले काही दिवस कायम ठेवतो. जेव्हा बाजारात तेजी सुरु होते तेव्हा एकदम सगळेच शेअर्सच्या किंमती लगेच वाढत नसतात तर प्रथम काही ठराविक शेअर्सच्या किंमती वाढू लागतात व नंतर ती तेजी बाजारात सर्वत्र पसरू लागते. आणि मग सर्वंकष तेजीचा माहौल तयार होतो.

या आघाडीच्या कंपन्यांचा गृहपाठ करून आपल्या यशाची मुहूर्तमेढ रोवू शकतात. शेअर्सची निवड करताना ते शेअर्स कोणत्या किंमतीपासून खाली आलेले आहेत हे पाहून जर त्यांनी योग्य वेळी तेजी सुरु होतानाच खरेदी करणे सुरु केले तर ते मोठा फायदा मिळवू शकतात कारण एकदा का मंदी संपून परत तेजी सुरु झाली कि असे शेअर्स भराभर वर जाऊ लागतात. हि संधी बरेच वेळा म्युच्युअल फंड व्यव्यस्थापक लवकर साधत असतात म्हणून आघाडीच्या म्युच्युअल फंड योजनांचा पोर्टफोलिओ नियमितपणे फॉलो केला पाहिजे. जेव्हा एखादा शेअर त्याच्या नीचांकी स्थरापासून २५% वर जातो तेव्हा तो एक पायरी पूर्ण करतो त्यानंतर तो स्थिर होऊ लागतो. यावेळी बरेच गुंतवणूकदार बाजारात परत प्रवेश करू लागतात. परंतु अनेक छोटे गुंतवणूकदार गुंतवणुकीची चांगली संधी गमावून बसतात. तेजीच्या कालखंडात बरेच छोटे गुंतवणूकदार साधारणपणे १०% नफा झाला कि तो शेअर विकून फायदा मिळवतात मात्र ते पुढे मिळणाऱ्या मोठया फायदयाला यामुळे मुकतात. कारण ते या वेळेला शेअरची दुसरी पायरी समजण्याची चूक करत असतात. खरे पाहता तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात बाजारात उडी मारणारे जास्त लोकं असतात जे नुकसान करून घेत असतात. या चौथ्या स्थरावर कंपनीचा सगळीकडे बराच बोलबाला होऊ लागतो. कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक टीव्ही वर झळकू लागतात आणि सामान्य गुंतवणूकदाराला वाटू लागत कि आपणही या कंपनीचे शेअर्स विकत घेऊन फायदा मिळवू, आणि ते जोराने तो स्टॉक खरेदी करू लागत मात्र यावेळी म्युच्युअल फंड व्यवस्थापक, मोठे व हुशार गुंतवणूकदार त्या शेअर्सची विक्री करू लागतात आणि त्यामुळे काही काळातच त्या शेअरची किंमत कमी होऊ लागते व नव्याने बाजारात आलेले गुंतवणूकदार या सापळ्यात अडकून आपले नुकसान करून घेतात आणि आपल्या नशिबाला दोष देऊन किंवा शेअर बाजाराला जुगार समजून आपले शेअर्स कमी किंमतीला विकून बाहेर पडतात. हे असे ४/५ थरांचे चक्र बाजारात नियमितपणे चालू असते जे गुंतवणूकदार हे वेळीच समजून घेऊ शकतात त्यांना पैसे मिळतात बाकीचे पैसे घालवून बसतात.

बाजारातील मंदीची दिशा कशी ओळखावी?

सामान्यपणे बाजार सरासरी १५% ते २०% किंवा जास्त कोसळला कि समजावे बाजारात मंदीचा कल सुरु झाला आहे.

अस्थिर शेअर्स कधी खरेदी करावेत?

बाजारात जेव्हा अस्थिरता असते तेव्हा योग्य वेळी शेअर्सची खरेदी केली तरच चांगला फायदा अल्प किंवा मध्यम मुदतीत मिळवता येऊ शकतो. जेव्हा एखाद्या चांगल्या कंपनीच्या शेअर्सची किंमत एकदम वाढू लागते तेव्हा तिच्या मागील खरेदीच्या बिंदू पेक्षा ५% जास्त किंमत असताताना तो खरेदी करण्यासाठी रांगा लावू नका. एखादा मोठा शेअर काही दिवसात किंवा काही आठवड्यात २० ते २५% इतकासुद्धा वाढू शकतो मात्र अशा वेळी तो खरेदी केला तर एखादी वाईट बातमी किंवा छोटी मंदी सुद्धा तुम्हाला मोठे नुकसान सोसण्यासाठी कारणीभूत होऊ शकते. अस्थिर शेअर्सच्या बाबतीत हि जोखीम तर जास्तच वाढते.

बाजारातून सावधगिरीचे संकेत

शेअर बाजारातील पूर्वेतिहास पाहता बाजारातील सावधगिरीचे संकेत काही घटनांतून मिळू शकतात. ते कसे ते आता पाहूया. जेव्हा सगळेच गुंतवणूकदार शेअरबाजारात शेअर्स खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात तेव्हा बाजारात तेजीचा कल दिसून येत असतो. अशावेळी ज्यांनी पूर्वी शेअर्स खरेदी केलेले असतात ते त्यांनी घेतलेल्या शेअर्सच्या किंमती आणखीन वाढण्यासाठी वाट पहात असतात. अशावेळी अन्य लोकांनीसुद्धा त्यांनी घेतलेला शेअर घ्यावा यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात. बरेचसे गुंतवणूकदार त्यांच्याकडे असणारे सारे पैसे एकदम गुंतवून मोकळे झालेले असतात. जोपर्यंत इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये सातत्याने गुंतवणुकीचा ओघ सुरु असतो तोपर्यंत सर्व काही आलबेल असते. यावेळी आपण बाजरात नेहमी लक्ष ठेवून राहिले पाहिजे, जेव्हा हा बाजारात सतत येणाऱ्या पैशांचा ओघ कमी होऊ लागतो तेव्हा बाजारातील खरेदी कमी होऊ लागते. यावेळी आपण गुंतवलेले पैसे शेअर्सची विक्री करून बाजारातून काढून घेणे इष्ट असते.

दुसरे म्हणजे आर्थिक किंवा राजकीय परिस्थिती: जेव्हा आर्थिक क्षेत्रात चोहोबाजूनी अस्थिरता असते, मंदीची चाहूल दिसू लागते किंवा देशात जर राजकीय अस्थिरता असेल तर तेव्हा बाजारात एकदम विक्रीचा जोर वाढू लागतो. हा बाजारात बाजारात मोठी मंदी येण्याचा संकेत असू शकतो.

तिसरे म्हणजे, जेव्हा सतत शेअरच्या किंमती वाढत असतात व रोज नवे नवे उच्यांक होत असतात तेव्हा समजावे हे फार काळ टिकू शकणार नाही. मुख्यत्वेकरून आयटी शेअर्सच्या बाबतीत हे जास्त वेळा घडून येत असते. अशावेळी संबंधित शेअर्सच्या किंमती या त्या शेअर्सपासून मिळणाऱ्या उपनांच्या पेक्षा जास्त प्रमाणात वाढत असतात. हि धोक्याची घंटा समजली पाहिजे.  कारण जेव्हा वाजवीपेक्षा शेअरची किंमत वाढू लागते तेव्हा समजावे काहीतरी घोळ आहे.

चवथे म्हणजे, बाजारात मोठ्या प्रमाणावर आयपीओ चा भडीमार होतो. कारण जेव्हा बाजरात मोठी तेजी असते तेव्हा गुंतवणूकदारांकडून आयपीओ आणून भांडवल उभे करणे सोपे असते. यावेळी रोजच बाजार नवीन नवीन विक्रम करत असतो. बाजारात येणाऱ्या जवळपास सर्वच आयपीओना तुफानी प्रतिसाद मिळत असतो. अनेक पटीने आयपीओमध्ये गन तवणूक केली जात असते. हीसुद्धा धोक्याची घंटा असू शकते.  त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर आयपीओ येऊ लागले कि नंतर मंदी येणार असे समजून जावे.

पाचवे म्हणजे, जेव्हा एफआयआय आणि डीआयआय दोघेही मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री करू लागतात तेव्हा बाजारावर  मंदीचे ढग जमू लागले आहेत हे समजावे.

सहावे म्हणजे, जेव्हा मंदीच्या शेवटाला एफआयआय आणि डीआयआय दोघेही मोठ्या प्रमाणावर शेअर्सची खरेदी करू लागले कि समजावे बाजारात मोठी तेजी येणार आहे.



Read about stock market in Marathi. read about share market in marathi. understand mutual funds and share market in Marathi. mutualfundmarathi.comStock Market Directions read in Marathiबाजाराची दिशा ओळखा
Read more
  • Published in Capital Market
No Comments

११. काही महत्वाच्या टिप्स

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

११. काही महत्वाच्या टिप्स

शेअरबाजारा संबंधी काही महत्वाच्या टिप्स

  1. नवीन उत्पादन (प्रॉडक्ट), सेवा (सर्व्हिस) किंवा नेतृत्व (लीडरशिप). जर एखादी कंपनी एखादे अगदी नवीन उतपादन किंवा सेवा बाजारात आणत असेल किंवा एखादी अशी नवीन कल्पना ज्यामुळे अर्थव्यवस्थेत त्या कल्पनेमुळे हलचल निर्माण होणार अशी परिस्थिती उद्भवणार असेल तर याचा त्या कम्पनीच्या बाजारातील शेअरच्या किंमतीवर मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
  2. एखाद्या क्षेत्रातील अग्रगण्य स्टॉक. ज्यावेळी एखाद्या विशिष्ठ क्षेत्रातील कंपन्यांच्या एकूण संख्येपैकी जवळपास ५०% कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढत असतात. अशा वेळी त्या क्षेत्रातिल आघाडीच्या कंपनीच्या कामगिरीकडे लक्ष दिले पाहिजे. आणि यातील काही चांगले शेअर्स खरेदी केले पाहिजेत. अशा वेळी त्या क्षेत्रातील काही कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी असल्याचे पाहून तुम्हाला ते शेअर्स खरेदी करण्याचा मोह होऊ शकतो मात्र तो मोह टाळला पाहिजे आणि चांगली कामगीरी करणाऱ्या कंपन्यांचेच शेअर्स खरेदी केले पाहिजेत.
  3. उत्तम दर्जाच्या संस्थात्मक  कंपन्यांनी प्रायोजित केलेले शेअर्स. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काही स्टॉक असे असले पाहिजेत कि जे काही महत्वाच्या म्युच्युअल फंड  योजनेत घेतलेले असतात. कारण असे शेअर्स हे बाजाराची वरची दिशा दाखवण्यासाठी समर्थ असतात
  4. नवीन उच्चांक. ज्या शेअर्सच्या किंमती उलाढालीतील वाढीसह नवीन नवीन उच्चांक करत असतात ते आणखीन वाढण्याचाच जास्त संभव असतो.
  5. काही असामान्य स्टॉक त्यांच्या किंमतीचे सूत्र बळकट करत असतात आणि त्यानंतर ते त्यांची कामगिरी उंचावत असतात. मात्र यावेळी त्या शेअर्सच्या खरेदी व विक्रीतील उलाढाल सुद्धा सतत वाढत असली पाहिजे.
  6. साकारात्मक बाजार. या काळात तुम्ही नेहमी चांगली कामगिरी करणारे शेअर्सच खरेदी केले पाहिजेत. परंतु जर बाजारात एकूणच मंदी असेल तर तुम्ही घेतलेल्या शेअर्सच्या किंमती सुद्धा कमी होण्याची शक्यता असते. म्हणून बाजारातील चांगले शेअर्स तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. यासाठी आम्ही बाजारातील कल ओळख हा लेख लिहिला आहे तो समजून घेतला पाहिजे.
  7. एक लक्षात ठेवा कि जर एखादा शेअर २५% खाली आला तर तो तेथून ३३% वाढल्यावरच फायद्यात येऊ शकतो आणि जर एखाद्या शेअरची किंमत ५०% कमी झालेली असेल तर तो १००% वाढल्यावरच परत फायद्यात येत असतो.
Read about stock market in Marathi. read about share market in marathi. understand mutual funds and share market in Marathi. mutualfundmarathi.comStock Market Tips read in Marathiशेअर बाजार काही महत्वाच्या टिप्स
Read more
  • Published in Capital Market
No Comments

१०. चांगले शेअर्स घ्या, संख्या महत्वाची नाही

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

१०. चांगले शेअर्स घ्या, संख्या महत्वाची नाही

नियमितपणे गुंतवणूक करत रहा, घाबरून जाऊ नका

माझ्याकडून हीच सर्वात चांगली टीप तुमच्यासाठी आहे. शेअर्स निवडताना काळजी घ्या, पण एकदा का तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचा स्टॉक खरेदी केलात आणि काही कारणाने जर शेअर बाजार खाली आला किंवा गडगडला आणि तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले तर घाबरून जाऊन तो शेअर विकून मोकळे होऊ नका तर अशा वेळी नियमितपणे जमतील तेव्हढे जास्तीचे शेअर्स खरेदी करा. शेअर खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा कि नेहमी चांगल्या कंपनीचेच शेअर्स विकत घ्या ती कंपनी काय निर्माण करते त्याची माहिती घ्या. कंपनी सुरु करणारी व्यक्ती कोण आहे, तिचा पूर्वेतिहास काय आहे. कंपनीचे व्यवस्थापन पारदर्शक आहे का, कंपनीची विक्री प्रत्येक वर्षी वाढणारी आहे कि नाही, बाजारात कंपनीची प्रतिष्ठा काय आहे, पीई नेहमी वाढणारा आहे का इ. कंपनी संबंधित माहिती करून घेऊन शेअर्स खरेदीचा निर्णय घ्या.  एकदा शेअर्स खरेदी करून झाले आणि जर त्याची बाजारातील किंमत कमी झाली तरी घाबरून जाऊ नका कारण शेअर्सच्या मूल्यातील चढ उतार हा शेअर बाजाराचा स्थायी भाव आहे.

शेअरची किंमत कमी किंवा जास्त झाली तरी कंपनी आपले कामकाज चालूच ठेवत असते. जोपर्यंत कंपनीचे प्रवर्तक  त्यांच्या मालकीचे शेअर्स विकत नाहीत तो पर्यंत तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. हा मात्र जर तुम्ही छोट्या आकाराच्या कंपनीचे शेअर्स घेतलेले असतील तर मात्र त्यांचा शेअर्सचा कमी झालेला भाव परत वाढेल कि नाही हे सांगणे अवघड असते. अनेकवेळा शेअर्सच्या किंमती कमी होण्याचे कारण हे भावनेवर आधारित असते आणि असे झाल्यास तो परिणाम तात्पुरता असतो. जर तुम्ही घेतलेल्या शेअर्सची किंमत कमी झाली तर खालील गोष्टी तपासा:

१) शेअर्सची किंमत अचानकपणे कमी होण्याचे कारण काय आहे? त्या कंपनी बाबत काही अफवा पसरली आहे काय? जर अफवा पसरली असेल तर त्याबाबत कंपनीचा खुलासा काय आलेला आहे ते तपासा.  

२) स्टोकनी किंमत कमी झाल्यानंतर त्याबाबत कंपनीचे काही म्हणणे आहे का ते तपासा.

३) त्या कंपनीत काम करणारे अधिकारी शेअर्स खरेदी किंवा विक्री करत आहेत काय?

४) किंमत कमी झालेली असताना कंपनी शेअर्सची पुनर्खरेदी करत आहे काय?


जर कंपनी देत असलेला खुलासा तुम्हाला योग्य वाटला तर तुम्ही समभागांच्या घसरलेल्या किंमतीकडे दुर्लक्ष करणे हेच तुमच्या हिताचे असेल. मात्र काही योग्य कारणामुळे जर शेअर्सचा भाव पडलेला असेल व तो आणखीन खाली जाण्याची शक्यता असेल तर मात्र तुम्ही तो शेअर नुकसानीत सुद्धा विकून आलेल्या पैशातून अन्य चांगल्या कंपनीचा शेअर विकत घेण्याचा विचार केला पाहिजे. मात्र तुमचा कोण्तायी निर्णय हा कंपनी संबधीचा असला पाहिजे आणि तो शेअर्सच्या किंमतीशी करण्याचा प्रयत्न करू नका. कारण जर स्टॉकची किंमत कमी येण्याचे कारण कंपनीच्या उलाढालीशी, नफा कमी होण्याशी निगडित नसेल तर ती किंमत परत वर जाऊ शकेल, आणि मग तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो.

नेहमीच चांगल्या कंपनीचेच शेअर्स खरेदी करा:

बरेचवेळा शेअरबाजारात नवीनच गुंतवणूक करणारी व्यक्ती लवकरात लवकर जास्त पैसे मिळवावेत अशा मानसिकतेची असते. जर तुम्ही नशीबवान असाल तर असे कदाचित घडलंही. परंतु खरे पाहता तेच गुंतवणूकदार श्रीमंत होतात जे चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून ते दीर्घ मुदतीसाठी आपल्या पोर्टफोलिओ मध्ये बाळगून ठेवतात. बरेच लोकं कोणता शेअर स्वस्त आहे असे विचारत असतात. याचे एक कारण असते ते म्हणजे त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसे नसतात मात्र त्यांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये हजारो शेअर्स असावेत असे वाटत असते ज्यायोगे जेव्हा त्या शेअरची किंमत वाढेल तेव्हा त्यांना असे वाटते कीं आपल्याला भरपूर पैसे मिळतील. पण समस्या अशी असते कि असे स्वस्त असणाऱ्या शेअर्सची किंमत कधी वाढतच नाही. आणि यदाकदाचित थोडी वाढली तरी ते विकले जातच नाहीत कारण ते खरेदी करायला कोणीच तयार नसते.

समजा तुमच्याकडे रु.१०००० आहेत व त्यातून हजारो कमी किंमतीचे शेअर्स घेण्याऐवजी तुम्ही जर एखाद्या चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेत तर भविष्यात त्याचे बरेच पैसे होऊ शकतात. याचे एक उदाहरण म्हणजे जर का तुम्ही रु.१०००० चे Infosys चे शेअर्स १९९१ साली खरेदी केले असतेत आणि आजपर्यंत बाळगून ठेवले असतेत तर आज मिळालेले बोनस शेअर्स अधिक स्प्लिट मुळे तुमच्याकडे हजारो शेअर्स झाले असते व आज त्याचे मूल्य काही कोटी रुपये झाले असते.

अर्थात मागील काळात ज्या कंपनीच्या शेअर्सनी असाधारण कामगिरी केली आहे हे समजणे फारच सोपे असते पण असे कोणते शेअर्स भविष्यात भरघोस प्राप्ती करून देऊ शकतील हे सांगणे मात्र कठीण काम असते. म्हणून सर्वात चांगली गोष्ट हि आहे कि तुम्ही एखाद्या तुम्हाला माहित असलेल्या चांगल्या कंपनीचे शेअर्स विकत घ्या आणि विसरून जा. यामुळे काय होईल कि सुरुवातीला शेअर्स खरेदी करताना फक्त तुम्हाला ब्रोकरेज द्यावे लागेल आणि जर तुम्ही घेतलेले शेअर्स जर चालल्या कंपनीचे असतील तर ते भविष्यात चांगली कामगिरी करतीलच आणि जर ते अशी चांगली कामगिरी करत असतील तर ते विकण्याचा विचार तरी का करावयाचा बरे?

तुमच्याकडे असणाऱ्या रु.१०००० चे अनेक स्टॉक घेण्याच्या ऐवजी जरी एखाद्या चांगल्या कंपनीचा उदा. मारुती लिमिटेड चा जरी एक शेअर घेऊन ठेवलात आणि परत तुमच्या कडे जेव्हा पैसे जमतील तेव्हा परत एक जास्तीचा शेअर घेतलात असे दीर्घ मुदतीत करत राहिलात तर २०-२५ वर्षानंतर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य अनेक पटीने वाढलेले तुम्हाला दिसून येईल. मारुती हे एक उदाहरण म्हणून सांगितले आहे, देशांत जवळपास २५० चांगल्या कंपन्या आहेत त्यातील तुम्हाला जी माहित असेल अशा कंपनीच्या शेअर्सची तुम्ही नियमितपणे खरेदी करू शकता.

तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये किती कंपन्यांचे शेअर्स असावेत

अनेक कंपन्यांचे शेअर्स घेण्यापेक्षा काही थोड्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये धारण करणे हे केव्हाही चांगले असते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवणे सोपे होते. तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या पैशांप्रमाणात किती कंपन्यांचे शेअर्स बाळ्गावेत हे खालील टेबल मध्ये मार्गदर्शन म्हणून  पहा:

असणारी रक्कम किती कंपन्यांचे शेअर्स बाळ्गावेत
रु. २०००० पेक्षा कमी १ ते २
रु. २०००० ते ५००००२ ते ३
रु. ५०००० ते २०००००३ ते ५
रु. २००००० ते ५०००००५ ते ७
रु. ५००००० पेक्षा जास्त ७ ते १०

Buy quality stocknumbers are not important read in MarathiRead about stock market in Marathi. read about share market in marathi. understand mutual funds and share market in Marathi. mutualfundmarathi.comचांगले शेअर्स घ्या
Read more
  • Published in Capital Market
No Comments

९. शेअर्सचे प्रकार व विश्लेषण

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

९. शेअर्सचे प्रकार व विश्लेषण

प्रामुख्याने शेअर्स विकत घेताना तीन उद्देश असतात म्हणून शेअर्सचे तीन प्रकारात  वर्गीकरण केले जाऊ शकते ते असे Value (मूल्य), Growth (वाढ), Income (उत्पन्न) आणि यावर आधारित त्यांचे विश्लेषण केले जाते.

Growth Stocks (वृद्धी स्टॉक):

या प्रकारातील शेअर्स खरेदी करताना अशा कंपनीचे शेअर्स खरेदी केले जातात कि ज्या कंपन्यांची विक्री नियमितपणे वाढत रहाण्याची शक्यता असते आणि प्रति शेअर उत्पन्न वाढत असते अश्या कंपनीचे शेअर्स ग्रोथ स्टॉक म्हणून समजले जातात. ह्या प्रकारातील कंपन्या या अन्य कंपन्यांच्या तुलनेत जास्त वेगाने वाढत असतात किंवा त्या क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या तुलनेतही जास्त वेगाने वाढत असतात. या प्रकारातील कंपन्या अतिशय कमी लाभांश देतात किंवा अजिबात देत सुद्धा नाहीत कारण या कंपन्या असा लाभांश देण्यापेक्षा तो पैसा परत व्यवसायात गुंतवणे पसंत करत असतात. आणि म्हणून ज्या लोकांना अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावयाची असेल त्यांनी ती अनेक वर्षांसाठी करण्याची तयारी असेल तरच करावी. कंपनीची निवड करताना त्या कंपनीचे व्यवस्थापन चांगले नामांकित असले पाहिजे. HLL, Nestle, Infosys, Wipro अशा काही नामांकित कंपन्या या प्रकारात गणल्या गेलेल्या आहेत, ज्यांनी गेली वर्ष-नु- वर्षे अनेक वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी नोंदवलेली आहे व गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करून दिलेली आहे. अनेक मोठे गुंतवणूकदार अशा कंपनीत केलेली गुंतवणूक कधी काढत नसतात.


Value Stocks (लपलेले मूल्य असणारे शेअर्स)

बाजारात अशा काही कंपन्या असतात ज्यांच्या शेअर्सचे बाजारमूल्य काही तात्पुरत्या कारणाने कमी झालेले असते किंवा त्यांच्याकडे अन्य गुंतवणुकदारांचे दुर्लक्ष झालेले असते मात्र अशा कंपन्यांकडे एक “लपलेले मूल्य” (hidden value) असते. अशा कंपन्यांच्या स्टॉकचे मूल्य काही खराब/वाईट बातमीमुळे बऱ्याच प्रमाणात कमी झालेले असते. जरी अशा कंपन्यांचे शेअर्सचे बाजार मूल्य कमी झालेले असले तरी त्यांचा व्यवसाय नीटपणे चालू असतो. पूर्वीची कामगिरी चांगली असते. त्या कंपन्यांच्या मालकीची मोठी मालमत्ता, मोक्याच्या ठिकाणी जमीन, इमारत असते, तसेच मोठ्या प्रमाणावर स्टॉक असतो किंवा त्या कंपनीच्या अन्य सहयोगी कंपन्या असतात ज्या उत्तम कामगिरी करत असतात, ज्यामध्ये या कंपनीची शेअर्स मध्ये गुंतवणूक असते. या सर्वांचे मिळून एक चांगले मूल्य असते मात्र ते शेअर्सच्या किंमती मध्ये दिसत नसते. यामुळेच काही हुशार गुंतवणूकदार तसे लपलेले मूल्य असणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स त्याची किंमत कमी झालेली असताना खरेदी करतात आणि बाजाराला त्या कंपनीचे खरे मूल्य समजून येऊन परत शेअर्सची किंमत वाढेपर्यंत ते शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ठेऊन देत असतात. व्हॅल्यू स्टॉक हे असे स्टॉक असतात कीं ज्यांचे मूल्य त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी झालेले असते आणि त्यांचे मूल्य पुढील काही काळात एखादी चांगली बातमी आली कि मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असते. अर्थात जरी या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी झालेल्या असल्या तरी या कंपन्यांचे मूलभूत मूल्य हे मजबूतच असते. हे ठरवताना काही गोष्टी आवर्जून पहिल्या जातात त्या म्हणजे त्यांचा पीइ रेशो हा त्याच्या उच्चतम पातळी पासून किती खाली आलेला आहे, लाभांशाचे उत्पन्न तुलनेने किती प्रमाणात वाढलेले आहे, कंपनीची विक्री पातळी किती प्रमाणात वर खाली झालेली आहे या गोष्टी व्हॅल्यू स्टॉक खरेदी करताना पहिल्या जातात. फ्रँकलिन म्युच्युअल फंड हे धोरण राबवण्यात प्रसिद्ध आहे.

अनेकवेळा ग्रोथ स्टॉक हे सुद्धा काही काळासाठी व्हॅल्यू स्टॉक मध्ये परावर्तित होत असतात.

Income (लाभांश देणारे शेअर्स)शेअर्स खरेदी करताना मुख्य उद्देश हा शेअर्सचे भाव वाढावेत हा असतो. मात्र काही गुंतवणूकदार हे त्यापासून मिळणारा लाभांशचे उत्पन्न मिळावे म्हणून शेअर्स मध्ये गुंतवणूक करत असतात. असे गुंतवणूकदार अशा कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात कि ज्या कंपन्या नियमितपणे जास्त लाभांश देत असतात, त्या साठी त्या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीं जरी जास्त वाढ झाली नाही तरी त्याची त्यांना पर्वा नसते. नियमितपणे जास्त लाभांश मिळावा हाच त्यांचा उद्देश असतो. असे जास्त लाभांश देणारे स्टॉकस हे इन्कम स्टॉक म्हणून समजले जातात. ज्या क्षेत्रातील कंपन्यांची वाढ हि कमी प्रमाणात होत असते अशा कंपन्या मुख्यत्वेकरून जास्त प्रमाणात लाभांश देत असतात.

Read about stock market in Marathi. read about share market in marathi. understand mutual funds and share stock market in Marathi. mutualfundmarathi.comTypes of stocks and analysis read in Marathiशेअर्सचे प्रकार आणि विश्लेषण
Read more
  • Published in Capital Market
No Comments

८. फंडामेंटल विश्लेषण

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

८. फंडामेंटल विश्लेषण

फंडामेंटल विश्लेषण मध्ये सुट्टयाला स्थान नसते हे शास्त्र पारंपरिक मुलभुत विश्लेषणावर आधारित असते. फंडामेंटल विश्लेषणावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती कधीही दलाल स्ट्रीटवर घडणाऱ्या बारीक सारीक घटनांकडे सरळ दुर्लक्ष करत असतात त्याला कोणतेही महत्व देत नाहीत. कारण खालील तीन मूलभूत घटकांकडे विश्लेषण करत असताना पाहत असतात:

अर्थव्यवस्था

उद्योग क्षेत्र

कंपनी

उपरोक्त तिन्ही आयामांची एकत्रितपणे तुलना करणे आवश्यक आहे  कारण या तिन्ही घटकांना तितकेच महत्व असल्यामुळे यातील कोणताही एक घटक वगळून फंडामेंटल विश्लेषण करताच येणार नाही. या विभागात आम्ही आपणास या प्रत्येक घटकाची थोडक्यात माहिती देण्याचा येथे प्रयत्न करत आहोत.

अर्थव्यवस्थेचे विश्लेषण

खालील टेबल मध्ये काही आर्थिक निर्देशक दिलेले आहेत आणि त्यांचा स्टॉक मार्केटवर काय परिणाम होतो ते दुसऱ्या रकान्यात दिलेले आहे.

Sr.No.आर्थिक निर्देशक स्टॉक मार्केटवरील परिणाम
१GNP मध्ये
वाढ
घट

सकारत्मक – चांगला
नकारात्मक – वाईट
२किंमत स्थिती (महागाईचा दर)
स्थिर
वाढणारा

सकारत्मक – चांगला
नकारात्मक – वाईट
३अर्थव्यवस्थेत
तेजी
मंदी

सकारत्मक – चांगला
नकारात्मक – वाईट
४बांधकाम क्षेत्रातील हालचाल व मागणी
या क्षेत्रातील वाढती मागणी
या क्षेत्रातील कमी किंवा घटती मागणी

सकारत्मक – चांगला
नकारात्मक – वाईट
५रोजगार निर्मिती
वाढ होणारा  कालखंड
कमी होणारा कालखंड

सकारत्मक – चांगला
नकारात्मक – वाईट
६मालाची साठेबाजी
महागाई वाढत असताना
मंदीचा कालखंड लांबत असताना

सकारत्मक – चांगला
नकारात्मक – वाईट
७खर्च करण्यासाठी उपलब्ध असणारे उत्पन्न
वाढत राहणारे
कमी होत राहणारे

सकारत्मक – चांगला
नकारात्मक – वाईट
८वैयक्तित बचतीत होणारी
वृद्धी
घट

सकारत्मक – चांगला
नकारात्मक – वाईट
९व्याज दारात होणारी
घट
वाढ

सकारत्मक – चांगला
नकारात्मक – वाईट
१०व्यापाराचा समतोल
सकारात्मक
नकारात्मक

सकारत्मक – चांगला
नकारात्मक – वाईट
११चलन बाजारात रुपयाची ताकद
मजबूत
कमजोर

सकारत्मक – चांगला
नकारात्मक – वाईट
१२कॉर्पोरेट कर आकारणी
कमी
जास्त

सकारत्मक – चांगला
नकारात्मक – वाईट

उद्योगा संबंधित विश्लेषण

प्रत्येक उद्योग क्षेत्राला ४ प्रमुख जीवन चक्रातून मार्गक्रमण करावे लागते

१) सुरुवातीचा काळ

२) वाढीचा किंवा फैलाव होण्याचा कालखंड

३) स्थैर्याचा (परिपक्व) कालखंड

४) उतरती (अधोगती) कळा

प्रत्येक उद्योगासाठी हे गतिशील (डायनॅमिक) कालखंड असतात. प्रत्येकाने गुंतवणुकीचा निर्णय करताना शक्यतो उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात आणि ते न जमल्यास वाढीच्या किंवा फैलाव होण्याच्या (ग्रोथ) कालखंडात गुंतवणूक करावी. आणि जेव्हा परिपक्व किंवा स्थैर्याचा कालखंड असतो तेव्हा आपल्या कडील शेअर्स विकून मोकळे व्हावे. विक्री, नफाक्षमता आणि वृद्धी दर कसा आहे हे तपासले कि सध्या उद्योग जगत कोणत्या कालखंडातून जात आहे हे समजून घेता येते.

उदाहरणार्थ १९८० ते १९९० हे दशक आयटी उद्योगाचा सुरुवातीचा कालखंड होता

१९९१-२००० या कालखंडात आयटी उद्योगाची वेगाने वाटचाल चालू होती व या काळात कंपन्यांच्या मोठी वाढ झाली

वर्ष २००१ पासूनचा कालखंड हा आयटी कंपन्यांच्या स्थैर्याचा मानता येईल

म्हणून ज्यांनी १९८० ते २००० या कालखंडात आयटी  क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली त्यांना सर्वाधिक फायदा झाला.

कंपनीचे विश्लेषण

काही वेळा अशीही परिस्थिती असते कि औद्योगिक क्षेत्र आकर्षक कामगिरी करत असते मात्र त्या क्षेत्रातील काही कंपन्या मात्र चांगली कामगिरी करण्यात अपयशी होत असतात; त्याचप्रमाणे असेही असू शकते कि एखाद दुसरी कंपनी एकूण संबंधित उद्योग क्षेत्रापेक्षा जास्त भरीव कामगिरी दाखवत असतात, जेव्हा त्या क्षेत्रातील अन्य कंपन्या मात्र खराब कामगिरी करत असतात.  म्हणूनच तुम्ही एक गुंतवणूकदार म्हणून कंपनीचे योग्य विश्लेषण करण्यासाठी त्या कंपनीची आर्थिक तसेच अन्य सारे घटकांचा समतोलपणे विचार करूनच गुंतवणुकीचा निर्णय केला पाहिजे. आणि यासाठी महत्वाचे काही घटक खालीलप्रमाणे:

१) कंपनीचा इतिहास आणि व्यवसायाचे स्वरूप काय आहे.

२) कंपनी उत्पादित करीत असलेल्या वस्तू/सेवांची बाजारातील मागणी/पुरवठा यांची ताकद

३) कंपनीचा बाजारातील हिस्सा

४) व्यवस्थापकीय संचालक मंडळात कोण व्यक्ती आहेत

५) पेटन्ट आणि ट्रेडमार्क्स यांचे अंतर्गत व व्यावसायिक मूल्य काय आहे

६) परदेशी सहयोग, भविष्यासाठी त्याची गरज आणि उपलब्धता

७) बाजारात, वर्तमान आणि भविष्यातील स्पर्धात्मक गुणवत्ता

८) भविष्यातील व्यवसायाची योजना आणि प्रकल्प

९) कंपनीची ओळख: ब्लू चिप आहे का, भांडवली आकार: मोठा, माध्यम कि लहान

१०) कंपनीच्या शेअर्सची बाजारातील उलाढाल

११) प्रति शेअर उत्पन्न, त्यात किती वाढ वार्षिक स्वरूपात होत आहे  

१२) विक्री मधील वार्षिक वाढ किती आहे आणि लाभांश नियमितपणे दिला जातो का हे पहिले पाहिजे
 

Read aboutविश्लेषण stock market in Marathi. read about share market in marathi. understand mutual funds and share market in Marathi. mutualfundmarathi.comStock Market Fundamental Analysis read in Marathiफंडामेंटल
Read more
  • Published in Capital Market
No Comments

पूट ऑप्शन

Thursday, 27 December 2018 by Sadanand Thakur

हा लेख व ऑप्शन संबधी अन्य लेख येथे लवकरच दिसू लागतील, भेट देत राहा

Put Options read in MarathiRead about stock market in Marathi. read about share market in marathi. understand mutual funds and share market in Marathi. mutualfundmarathi.comपुट ऑप्शन
Read more
  • Published in Options
No Comments

कॉल ऑप्शन

Thursday, 27 December 2018 by Sadanand Thakur

हा लेख व ऑप्शन संबधी अन्य लेख येथे लवकरच दिसू लागतील, भेट देत राहा

Call Options read in MarathiRead about stock market in Marathi. read about share market in marathi. understand mutual funds and share market in Marathi. Learn about stock/share market in Marathi. mutualfundmarathi.comकॉल ऑप्शन
Read more
  • Published in Options
No Comments

ऑप्शनची तोंडओळख

Thursday, 27 December 2018 by Sadanand Thakur

हा लेख व ऑप्शन संबधी अन्य लेख येथे लवकरच दिसू लागतील, भेट देत राहा.

About Options read in MarathiRead about stock market in Marathi. read about share market in marathi. understand mutual funds and share market in Marathi. Learn about stock/share market in Marathi. mutualfundmarathi.comऑप्शन
Read more
  • Published in Options
No Comments
Page 3 of 11
« Previous 1 2 3 4 5 … 11 Next »
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

अनिवार्य सूचना (Disclaimers)

www.mutualfundmarathi.comया वेबसाईटची निर्मिती हि मराठी भाषिकांना त्यांचे मातृभाषेत म्युचुअल फंड व शेअरबाजाराची माहिती मिळावी म्हणून तयार केलेली आहे. या वेबसाईटची मालकी हि सदानंद ठाकूर याची असून येथील मजकूर पूर्व परवानगीशिवाय अन्यत्र पोस्ट करू नये. Thakur Financial Services ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस ARN-46061 व्दारे म्युचुअल फंड वितरक म्हणून AMFI व अनेक AMC सोबत रजिस्टर आहे. या संकेतस्थळावर दिलेली माहिती, फायनान्शियल प्लानिंग सुविधा, कॅलक्यूलेटर व अन्य सुविधा हि तुमच्या म्हणजे या संकेतस्थळाला भेट देणार्यांच्या माहितीसाठी त्यांनी स्वत: उपयोगात आणण्यासाठी आहे. आम्ही यासाठी कोणतीही फी किवा अन्य कोणतेही मानधन आकारत नाही. ह्याचा वापर करून केलेली गुंतवणूक तसेच परिणाम देईल असा आमचा दावा नाही. म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते. मागील कामगिरी तशीच राहील अथवा राहणार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा. (Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risk, read all scheme related documents carefully. Past performance of the scheme may or may not sustain in future).

Design & Powered By S.N Enterprises

TOP
×