• 9503718779 Sujay
  • 9518 752 605 Sadanand
  • clients.tfs@gmail.com
  • साइन इन
  • साइन अप करा
  • Switch English

Thakur Financial Services

  • पहिले पान
  • आमच्या बाबत
  • म्युचुअल फंड
    • ऑनलान गुंतवणूक करा
    • म्युचुअल फंडाबाबत
    • म्युचुअल फंडाचे प्रकार
      • समभाग आधारित
      • कर्जरोखे आधारित
      • करबचतीच्या योजना
    • गुंतवणूक
    • शेअरबाजार
      • भांडवली बाजार
      • फ्युचर्स
      • ऑप्शन
    • डिमॅट खाते
    • उत्पादने
    • सेवा व सुविधा
  • विमा
  • आयकर
  • लेख
  • डाउनलोड
  • म्युच्युअल फंड ऑनलाईन
    • ऑनलान व्यवहार करा
  • संपर्क करा
Mutual Fund Distributor having experience of more than 15 years. Share Market experience of more than 25 years. Author of "Mutual Fund - Swapnapurticha Rajmarg" Marathi book.
Page 7 of 11
« Previous 1 … 5 6 7 8 9 … 11 Next »

KYC

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

KYCअर्थात ग्राहकाला ओळखून घेणेः

म्युच्युअल फंडात अनैतिक मार्गाने मिळवलेला काळा पैसा गुंतवला जावू नये म्हणून Prevention of Money Laundering Act 2002 अंतर्गत व SEBI चे मार्गदर्शक तत्त्वांनुसार म्युच्युअल फंडाचे कोणतेही योजनेत गुंतवणूक करणा-या व्यक्ती अथवा संस्थला KYC ची पूर्तता करून देणे अनिवार्य आहे. हि प्रतिक्रिया एकदाच करावी लागते व गुंतवणूकदाराला Central Depository Services (India) Ltd. (CDSL) मार्फत एक सर्टिफिकेट प्रदान केले जाते ज्याचा वापर कोणत्याही प्रकारचे गुंतवणुकींसाठी होतो तसेच याची प्रत जोडल्यावर अन्य कागदपत्रे द्यावी लागत नाहीत म्हणून KYC करून घेणे गुंतवणूकदाराचे फायद्याचेच आहे.

वैयक्तिक स्वरूपात व्यक्तिगत KYC ची पूर्तता करून देणेसाठी लागणारी कागद पत्रेः 

  • फोटो.
  • राहणेच्या पत्त्याचा पुरावा – आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, बॅंक पासबुक (फोटो असणारे) यापैकी काहीही एकाची सत्य प्रत.
  • पॅन कार्ड.
  • ओळखीबाबत पुरावा – पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, बॅंक पासबुक (फोटो असणारे) यापैकी काहीही एकाची सत्य प्रत.

संस्थात्मक KYC ची पूर्तता करून देणेसाठी लागणारी कागद पत्रेः हिंदू अविभक्त कुटुंबासाठीः

  • पॅन कार्ड. सर्वांनाच आवश्यक
  • डिक्लरेशन डिड
  • बॅक खाते पुस्तक/उतारा नजिकचे कळतील.
  • कंपनी/बॉडी कॉर्पोरेट
  • इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट
  • मेमोरेंडम व आर्टिकल ऑफ असोसिएशन
  • सह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या

भागिदारी संस्थाः

  • पॅन कार्ड. सर्वांनाच आवश्यक
  • भागिदारी पत्र
  • भागिदारी पत्राचे नोंदणी दाखला
  • गुंतवणूक करण्याबाबतचे अधिकार पत्र
  • सह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या

ट्रस्ट, फाउंडेशन, एनजीओ, चॅरिटेबल बॉडीज

  • पॅन कार्ड. सर्वांनाच आवश्यक
  • नोंदणी दाखला
  • ट्रस्ट डिड
  • गुंतवणूक करण्याबाबतचे अधिकार पत्र
  • सह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या
Read more
  • Published in About Mutual Fund
No Comments

संज्ञा व तपशिल

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

म्युच्युअल फंड कंपनी तिचे योजनेची संपूर्ण माहिती (Offer Document) योजना सुरु करतनाच जाहिर करते गुंतवणूक करताना प्रत्येक गुंतवणूकदाराने ते वाचून समजून उमजून गुंतवणूकदाराने गुंतवणूक करावी म्हणजे नंतर पश्चातापाची वेळ येत नाही.  त्या माहिती पत्रकात (Offer Document) काही संज्ञा वापरल्या जातात त्या इंग्रजी आद्याक्षरानुसार खाली दिल्या असून त्याचा थोडक्यात अर्थ तपशिलामधे दिला आहे.  जिज्ञासूनी याचा जरुर वापर करावा.

संज्ञातपशिल
AccountStatementखाते उतारा – प्रत्येक व्यवहाराची तपशिवार नोंद प्रत्येक व्यवहारानंतर गुंतवणूकदाराला याव्दारे कळविला जातो – जसे की खरेदि, विक्रि, डिव्हीडंड, बोनस इ.
Ajusted NAVसर्व भार, खर्च वजा जाता एका युनिटचे निव्वळ मुल्य
Annual Reportवार्षीक अहवाल
AnnualzedReturnsनिव्वळ वार्षीक परतावा
Asset Allocationगुंतवणूकीचा विगतवार तपशिल
AMCम्युचलफंडाचे व्यवस्थापन करणारी कंपनी
Average Costवेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या किंमतिला खरेदि केलेल्या युनिटसची सरासरी किंमत
Balance Fundअशी योजना की ज्यामधे ठरावीक प्रमाणात शेअर बाजारात व ठरावीक प्रमाणात कर्जरोख्यात गुंतवणूक केली जाते.  तुलनात्मकदॄष्ट्या कमी जोखमिची योजना.
Bear Marketमंदिचा काळ – जेव्हा बाजारात विक्रिचा जोर असतो
Benchmarkयोजनेची तुलना करण्यासाठी – जसे की बॅंकिंग फंडाची तुलना बॅंक इंडेक्सचे परताव्या बरोबर केली जाते.
Betaबेटा जेवढा जास्त तेवढा मुल्यामधे जास्त चढ उतार व बेटा जेवढा कमी तेवढा कमी चढ उतार
Bondकर्ज रोखा – ठरावीक तारखेला ठरावीक व्याज दराने कर्जावू घेतलेली रक्कम परत करण्याचा वायदा असलेला पेपर
Bonusजादा दिली जाणारी युनिटस बोनस युनिट नंतर युनिटसची संख्या वाढते पण प्रती युनिट किंमतही कमी होते.
Brokerम्युचल फंड कंपनीकडे नोंदलेला मध्यस्थ – जो कंपनीच्या योजनांची माहिति गुंतवणूक दाराला देवून फंडाचे वतीने गुंतवणूक जमा करतो व सल्लहि देतो उदा. ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस.
BSE Indexमुंबई स्टॉक एक्सचेंज – ३० कंपन्याचे किमतिवर आधारलेला असतो ज्याचे चढ उताराने बाजाराची दिशा समजण्यास मदत होते.
Bull Marketतेजीचा कालखंड – यावेळी गुंतवणूकदारांचा कल खरेदिकडे असतो.
Capital Gainभांडवली मुल्यात झालेली वाढ – एक वर्षाचे आत विक्रि केल्यास अल्प मुदतिचा भांडवली नफा समजला जातो ज्यावर इंकम टॅक्स प्रचलित दराने भरावा लागतो सध्या १५% आहे – एक वर्षानंतर विक्रि केल्यास दिर्घ मुदतिचा भांडवली नफा समजला जातो सध्या इंकम टॅक्स लागु नाही.मात्र अनिवासि भारतियाना दोन्हवर टॅक्स भरावा लागतो
CDसर्टिफिकेट आफ डिपॉझीट – हे फक्त शेड्यूल्ड बॅंका ९१ दिवस ते १२ महिन्याचे मुदतीसाठी जारी करतात व DFI १ ते ३ वर्षासाठी जारी करतात. एक प्रकारचे विना तारण वचन पत्र असते (Promissory Note).
Close-EndedSchemeनिश्चित मुदत असणारी मुदतबंद योजना – २ ते १५ वर्ष कालावधिची असते.  योजनेच्या सुरुवातिचे ठराविक काळातच यांत गुंतवणूक करता येते त्यानंतर युनिटसची खरेदि-विक्री फक्त नोंदविलेल्या स्टॉक एक्सचेंज व्दाराच करता येते.
CPकमर्शिअल पेपर – चालू भांडवलाची गरज भागविण्यासाठी लहान मोठे उद्योजक जारी करतात – विनातारण असतात – कमी किंमतीला विकले जाते – गरजेच्या निकडिनुसार मुल्य ठरते व मुदत साधारणपणे ३ महिने ते १ वर्षाची असते – मुदतीअंती पूर्ण किंमतिला पुनः खरेदि करावयाचे असते.
Compliance Officerगुंतवणूकदारांच्या विविध कायदेशीर समस्या सोडविण्यासाठी AMC याची नेमणूक करते.
CDSCContingent Deferred Sales Charge – हा एक प्रकारचा ठरावीक काळापूर्वी पैसे काढल्यास लागणारा निर्गमन आकार आहे.
Corpusसर्व गुंतवणूकदारानी मिळून एका योजनेत गुंतवलेली एकूण रक्कम.
COC/TCCost of Churning/Turnover Cost – शेअर्सच्या प्रत्येक खरेदि-विक्री वर होणारा खर्च जसे की कमिशन, कस्टोडियन फी, रजिस्ट्रेशन फी, टॅक्स इ.  जेवढेवेळा व्यवहार करावे तेवढेवेळ हे खर्च करावे लागतात कधी कधी तर हे खर्च होणारा नफाही खाउन जातात आणि म्हणूनच टायमिंग चुकल्यामुळे सर्व सामान्य गुंतवणूकदार फक्त दलालांसाठी काम करतो व स्वतः मात्र नुकसान सोसतो. फंड मॅनेजर मात्र हा खर्च कमी करण्याची काळजी घेत असतात.
Custodianह्यांचे ताब्यात योजनेची सर्व मालमत्ता, शेअर्स, रोखे इ. सांभाळण्यासाठी असते.
Cutoff Timeप्रत्येक योजनेच्या खरेदि व विक्री साठी दिवसाची ठरवलेली वेळ या वेळे पुर्वी युनिटची खरेदि व विक्री केल्यास त्या दिवसाच्या NAV ने व्यवहार पुरे केले जातात व या वेळेनंतर केल्यास दुस-या दिवशीच्या NAV ने व्यवहार पुरे केले जातात.
संज्ञातपशिल
Debt/Income Fundsअशा योजना की ज्यामधिल गुंतवणूक हि कर्जरोखे, बॉंड, ट्रेझरी बिल्स, सीडी व सीपी ज्यावर ठराविक व्याजाचे उत्पन्न असते अश्या सिक्युरिटिज मध्येच गुंतवणूक केली जाते.
Discount
जेव्हा एखादे योजनेच्या एका युनिटचे बाजारमुल्य हे त्याच्या NAV पेंक्षा कमी असते तेव्हा डिस्काउंट मधे व्यवहार चालू असतात.
Diversificationम्युचल फंड योजनेची गुंतवणूक हि एकाच वेळी अनेक कंपन्यांचे शेअर्स मधे किंवा सिक्युरिटीज मधे केली जाते त्याला डायर्व्हसिफिकेशन म्हटले जाते ज्यामुळे जोखिम कमी होते.
Dividend Distribution TaxDebt योजना अथवा ज्या योजनेत ५०% पेक्षा जास्त गुंतवणूक कर्ज रोखे वगैरे Debt Securities मधे गुंतवले जातात अशा वेळी गुंतवणूकदाराना डिव्हीडंडचे वाटप करण्यापूर्वी जो टॅक्स भरावा लागतो त्याला Divident Distribution Tax म्हणतात.  सद्या याचा दर १०% + १०% सरचार्ज असा आहे.
Dividend Frequencyएका ठरावीक काळात किती वेळा डिव्हीडंड दिला हे समजते.
Dividend Historyयोजना सुरु झाल्यापासून किती वेळा डिव्हिडंड दिल्याचा इतिहास.
Dividendper unitप्रती युनिट डिव्हिडंड रुपयात.
Dividend PlanDividend Plan या योजनेत जेव्हा अतिरिक्त निधी उपलब्ध होतो तेव्हा डिव्हिडंड जाहिर केला जातो. हा करमुक्त असतो.
Dividend Payoutहा पर्याय स्वीकारला असता जेव्हा डिव्हिडंड जाहिर केला जातो तेव्हा तो गुंतवणूकदाला रोखीत चेकने अदा केला जातो.
Dividend Reinvestmentहा पर्याय स्वीकारला असता जेव्हा डिव्हिडंड जाहिर केला जातो तेव्हा तो त्याच योजनेत परत गुंतवला जातो व त्याबद्दल जादा युनिट दिली जातात.
Dividend Warrantsयाद्वारे डिव्हिडंडचे वाटप केले जाते.
Dividend Yieldडिव्हिडंडची प्रती युनिट टक्केवारी समजते.
Dow Jones Indexअमेरिकन इंडेक्स चे नांव.
Entry Load
गुंतवणूक करताना आकारला जातो यातूनच आमचे सारखे ब्रोकरना कमिशन मिळते. 
ELSSEquity Linked Savings Schemes या योजनेत केलेली गुंतवणूक हि इंकम टॅक्स मधिल कलम ८०-सी खाली रु. एक लाखा पर्यंत वजावटीसाठी पात्र असते. हा पर्याय या सवलती साठी सर्वोत्तम आहे. तीन वर्षे काढता येत नाहीत.
Ex-Bonus NAVबोनस देउन झाल्यानंतरची NAV.
Ex-Dividend Dateडिव्हिडंड ज्या तारखेला देण्याचे जाहिर होते ती तारिख.
Exit Load६ त १२ महिन्यां पूर्वी अथवा योजनेत जाहिर केल्याप्रमाणे मुदतिपूर्वी पैसे काढल्यास लागू होतो. 
Expense Ratioयोजना चालविण्यासाठी येणारे खर्चाची टक्केवारी.
Floating rate Bondsअर्थसंस्था व मोठे उद्योगसमुह ३ ते ५ वर्ष मुदतिचे कर्ज रोखे विक्रीसाठी काढतात त्याना Floating Rate Bonds म्हणतात.
Face Value
गुंतवणूकीचे दर्शनी मुल्य.
Fund Management Costयोजना चालवण्यासाठी AMC घेत असलेली फी.
Fund Manager
योजनेचे गुंतवणूकीचे व्यवस्थापन करण्यासाठी AMC ने नेमलेली तज्ञ व्यक्ती.
Gilt/Government Securitiesसरकारी कर्जरोखे.
Global Fundsया योनतेत सर्व जगातिल कंपन्यांचे शेअर्स मधे गुंतवणूक केली जाते.
Gilt Fundsया योजनेत फक्त सरकारी कर्ज रोख्यातच गुंतवणूक केली जाते. पूर्ण पणे सुरक्षीत गुंतवणूक.
Growth Schemeया योजनेचे उदिष्ट दिर्घ मुदतित भांडवली वॄध्दी करुन देणे हे असते.  मुल्यात बाजाराप्रमाणे चढ उतार होत असतो.
संज्ञातपशिल
Income/Debt Fundया योजनेमध्ये निश्चित उत्पनाचे सिक्युरिटीज मधे गुंतवणूक केली जाते व म्हणून अत्यंत कमी जोखिम.
Index Fundsया योजने अंतर्गत योजनेच्या उदिष्टांनुसार एका विसिष्ठ बाजाराचे इंडेक्सच्याच शेअर्स मधेच गुंतवणूक केली जाते.
Indexationभांडवली नफ्यावरील टॅक्स काढण्यासाठी वापरतात.
Inflationमहागाईमुळे होणारे चलनाचे अवमुल्यन.
Inflation Riskमहागाईमुळे होणारे मालमत्तेचे अवमुल्यन.
Investment Objective
योजनेचे गुंतवणूकीचे उदिष्ठ याचे बाहेर फंड मॅनेजरना गुंतवणूक करता येत नाही.
Investment Strategyयोजनेची गुंतवणूकिची मार्गदर्शक तत्वे.
Launch Dateयोजना गुंतवणूकिसाठी खुली होण्याची तारिख.
Liquid Funds/Money Market Fundsया प्रकारचे योजनेत कमी कालावधीचे सिक्युरिटीजमधेच गुंतवणूक केली जाते.  २ दिवसापासून १५ दिवसापर्यंतच गुतवणूक करणेसाठी उत्तम पर्याय.
Liquidityतरलता. म्युचल फंडाकडे काहि खर्चासाठी व गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी ठेवली जाणारी रोख रक्कम.
Lock In Periodठरावीक मुदतिपूर्वी पैसे काढता येत नाहीत. प्रमुख्याने टॅक्स बचतिच्या ELSS Schemes.
Management Expense Ratioयोजना चालवण्यासाठी येणारा खर्चाचे प्रमाण हे योजनेत जमा असणारे एकूण रकमेवर अवलंबून असते व यावर AMFI व SEBI च्या मर्यादा असतात.
Market Riskबाजार भावांचे चढ उताराची जोखिम.
Market Capitalizationएखादे कंपनीचे भांडवलाचे निव्वळ बाजारमुल्य.
Money Marketअल्प कालावधीचे सिक्युरिटीजचा बाजार.
Net Asset Value (NAV)एका युनिटचे निव्वळ मालमत्ता मुल्य. जे रोज बदलत असते व ज्याचे आधारे नवीन गुंतवणूक करता येते तसेच पैसेहि काढता येतात.
Nifty५० कंपन्यांचा समुह ज्यांचे शेअर्स NSE (National Stock Exchange) वर नोंदविलेले असतात.
No Load Schemeया प्रकारचे योजनेत गुंतवणूक करताना तसेच बाहेर पडताना कोणताही चार्ज आकारला जात नाही.
Nomineeवारस. ज्याला गुंतवणूकिदाराचे पश्चात पैसे मिळण्याचा हक्क असतो.
संज्ञातपशिल
Offer Documentor Prospectusकोणतीहि नविन योजना सुरु करताना सेबीचे मार्गदर्शक तत्वानुसार म्युचल फंड कंपनीला Offer document or Prospectus जाहिर करणे बंधनकारक असून या मधे योजनेची सर्व माहिति, गुंतवणूकीचे उदिष्ठ, गुंतवणूकीच्या मर्यादा, देण्यात येणा-या सेवा, गुंतवणूकिची मार्गदर्शक तत्वे इ. सर्व बाबींचा उल्लेख केलेला असतो जेणे करुन आपण जेथे पैसे गुंतवित आहोत त्याची पूर्ण माहिति व्हावी व हि माहिति व्यवस्थीतपणे गुंतवणूकदाराना करुन देणे व त्यांचे गुंतवणूकिचे उदिष्टांनुसार योजना त्याना सुचविणे हे आमचेसारखे मध्यस्थांचे काम असते व त्यासाठीच आम्हाला कमिशन मिळते निव्वळ फॉर्म भरण्यासाठी न्हवे आणि म्हणुनच कोणामार्फत गुंतवणूक करावी हे ज्याचे त्याने ठरवावे.  सर्व्हिस व सल्ला हा सुध्दा अत्यंत महत्वाचा असतो. पैसे कोणीतरी सांगतो म्हणून गुंतवू नका तर ज्याला ह्यातल समजत त्याचे मार्फत गुंतवणूक केलीत तर तुमचाच फायदा होईल. आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात यावर तुमचा विश्वास असेलच.
Open Ended Schemesथोडक्यात सांगायचे तर या योजना तुमचे बॅंकेतीत बचत खात्याप्रमाणे असतात.
Opening NAVयोजना सुरु होतानाचे बाजारमुल्य. NAV.
Premium
एका युनिटचे बाजारमुल्य हे NAV पेंक्षा जास्त असते.
Performanceकामगिरीचे मुल्यांकन.
Portfolioगुंतवणूकीचा विगतवार तपशिल.
Prospectusज्यामधे योजनेची व AMC पुर्ण माहिति देउन गुंतवणूक करण्याचे आवाहान केले जाते.
Ratingयोजनेच्या कामगिरीचे मुल्यांकन करण्याची पध्दत.
Redemption of Unitsआपले जवळील युनिटस म्युचल फंडाला परत करुन पैसे काढून घेण्याची मागणी करणे.
Repurchaseगुंतवणूकदाराची युनिटस योजना पैसे देवून विकत घेते अथवा गुंतवणूकदार युनिटस परत करुन पैशाची मागणी करतो.
Repurchase Priceनिर्गमन आकार वजा करु फंड पुनर्खरेदिची NAV जाहिर करतो त्या किंमतिने गुंतवणूकदाराला पैसे दिले जातात.
Recurring Investment Facilityदरमहा अथवा तिन महिन्यानी ठराविक तारखेला गुंतवणूक करण्याचि सुविधा.
Recurring Withdrawal Facilityनियमित दरमहा अथवा तिन महिन्यानी ठराविक तारखेला गुंतवणूकीपैकी काही ठराविक रक्कम काढून घेण्याची सुविधा.
Redemption Feeयोजनेतून पैसे काढून घेताना लावला जाणारा आकार.
Redemption Priceपैसे काढून घेण्यासाठी जाहिर केली जाणारी NAV.
संज्ञातपशिल
Sale Priceगुंतवणूकदाराने युनिटस खरेदि करण्यासाठी जाहिर केली जाणारी NAV.
Scheme Objectiveयाद्वारे योजनेचे गुंतवणूक उदिष्ठ जाहिर केले जाते जेणेकरुन योजनेची गुंतवणूक कोणकोणत्याप्रकारच्या सिक्यरिटिजमध्ये व कितीकिती प्रमाणात केली जाईल याचीही माहिती यात दिली जाते.
Sector Allocationवेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात केल्या जाणारे गुंतवणूकिचा क्षेत्रनिहाय तपशिल.
Sector Fundविशिष्ठ उद्योग क्षेत्रातच केल्या जाणारे गुंतवणूकिची योजना.
Systematic Investment Plan (SIP)ज्याना एकरकमि गुंतवणूक करणे शक्य नाहि त्यांचेसाठी दरमहा अथवा तिमाहि ठराविक तारखेला पुढिल तारखेचे आगावू चेक देउन, अथवा ECS किंवा बॅंकेचे खात्यातून परःस्पर पैसे वळते करुन देण्याची गुंतवणूक सुविधा.  यामधे दरमहा रु. ५०० एवढ्या कमी रकमेनेहि खाते सुरु करता येते. या योजनेत बाजार चढ उतारामुळे सरासरीचा फायदा होतो.  हि योजना गुंतवणूकिसाठी सर्वोत्तम मानली जाते. तरुणपणी दिर्घमुदतिसाठी ह्या योजनेद्वारे गुंतवणूक सुरु केल्यास जीवनातिल अनेक गरजा भागणे शक्य होउ शकते.
Systematic Transfer Plan (STP)एका योजनेत (शक्यतो डेब्ट योजनेत) एक रकमि गुंतवणूक करुन दरमहा अथवा तिमाहि एका ठराविक तारखेला ठराविक रक्कम दुस-या योजनेत (शक्यतो इक्वीटि योजनेत) वर्ग करण्याची सुविधा जेणेकरुन एक रकमि गुंतवणूक करुनहि सरासरिचा फायदा घेता येतो.
Systematic Withdrawal Plan (SWP)एकदाच एक रकमि गुंतवणूक करुन दरमहा अथवा तिमाहि एका ठराविक तारखेला ठराविक रक्कम काढून घेण्याची सुविधा नियमित उत्पन्न मिळवू पहाणा-यांसाठी उपयुक्त योजना.
Total Asset Under Managementएका ठराविक तारखेला फंडाकडे असणा-या एकूण गुंतवणूकीचे बाजारमुल्य.
Trust
दुस-या व्यक्तिची मालमत्ता त्यांचे भल्यासाठी सांभाळण्यासठी स्थापन करण्यात आलेली कायदेशिर व्यवस्था.
Trusteeम्युचल फंड योजनेची जाहिर करण्यात येणारी NAV बरोबर जाहिर केली जाते कि नाहि तसेच योजनेचे व्यवस्थापन तसेच योजनेची मालमत्ता सुरक्षीतपणे राखली जाते कि नाहि यावर नियमित देखरेख ठेवण्यासाठी अधिकारप्राप्त व्यक्ति अथवा व्यक्तिंचा समुह.
संज्ञातपशिल
Unitएक युनिट म्हणजे  म्युचल फंड योजनेत गुंतवलेला एक शेअर ज्याचे दर्शनी मुल्य हे सर्वसाधारणपणे रु.१० असते.
Unit Holderअशी व्यक्ति ज्याचेकडे युनिटसची मालकी असते.
Value 
Stock
असा शेअर कि ज्याचे बाजारमुल्य Price to Earning Ratio पेंक्षा अथवा पुस्तकि मुल्यापेंक्षा कमी असते.
Yield from Dividendडिव्हिडंड पासून आपले गुंतवणूकिशी टक्केवारित मिळणारे प्रत्यक्ष उत्पन्न.
Read more
  • Published in About Mutual Fund
No Comments

शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत एक पाहा़णी

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत एक पाहा़णी

सर्वसामान्य जनतेने म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे आकर्षक माध्यम म्हणून स्वीकारले आहे व त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.  महत्त्वाचे कारण म्हणजे सुलभता व पारदर्शकता. त्याचप्रमाणे, एखाद्याकडे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे भांडवल नसते, तर कोणाकडे भरपूर भांडवल आहे परंतु पुरेसा वेळ नाही अथवा पुरेसा अभ्यास व चिकित्सक दृष्टी यांचा अभाव असतो. अशा सर्वांसाठीच म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे आकर्षक माध्यम बनले आहे.  बरं यात गुंतवणूक करण्यासाठी फार मोठे भांडवलही लागत नाही. एकवेळ गुंतवणूक रुपये ५००० पासूनही करता येते अथवा दरमहा रुपये ५०० भरूनही गुंतवणूक करता येते. त्याचप्रमाणे बँकांचे व्याजदर हेही आकर्षक राहिलेले नाहीत कारण ते ३.५% ते ८% एवढेच आहेत. शिवाय बँकेचे व्याजावर इन्कम टॅक्सही लागू असतो.  तसेच महागाईही दरवर्षी साधारणपणे ४% तरी वाढतच असते. हे जगन्मान्य सत्य आहे की शेअर बाजारात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली असता त्यातून संपत्ती निर्माण होण्याची ताकद असते. फक्त तिचे व्यवस्थापन तज्ज्ञ व्यक्तींद्वारे होणे गरजेचे असते.  बँक असो अथवा पोष्ट असो, त्यातील गुंतवणूक ही निश्चितच सुरक्षित असते. मात्र त्या गुंतवणुकीत,दरवर्षी वाढणार्‍या महागाईचा विचार करता, दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्याची ताकद मात्र नसते.  प्रत्येकजण अपरिमित कष्ट करून पैसे मिळवत असतो पण हेही लक्षात ठेवले पाहिजे की पैसा हासुद्धा पैसे निर्माण करू शकतो. पाहिजे असते ते थोडेसे नियोजन. There is no reward without risk. 

अर्थात भरपूर पैसे मिळवावयाचे तर थोडा धोका हा स्वीकारावाच लागतो, पण तो धोका म्हणजे जुगार असू नये. 

अमेरिकेत सन २००३मध्ये एक पाहा़णी करण्यात आली. जर एक डॉलर सन १८०२ साली चार वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवला असता तर दरवर्षी वाढणारी महागाई विचारात घेतल्यानंतर सन २००३मध्ये त्या १ डॉलर गुंतवणुकीची खरी किंमत काय झाली असती ह्या प्रश्नावर केलेल्या सदर पाहणीत मिळालेले उत्तर खालीलप्रमाणे होते.

गुंतवणुकीचा पर्याय२०१ वर्षांनंतरगुंतवणुकीचे खरे मुल्य
सोने१.३९ डॉलर
ट्रेझरी बिल३०१ डॉलर
ट्रेझरी बाँड१,०७२ डॉलर्स
शेअर बाजार५,९७,४८५ डॉलर्स
  • Source: Jeremy Siegle, The Future for Investorsशेअर बाजारासंबधी गुंतवणुकितून दिर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्याची ताकद असते हे ऐतिहासीक सत्य आहे.
  • शेअर बाजारासंबंधीत गुंतवणूकीतून मिळालेला परतावा हा निश्चित उत्पन्न देणारे गुंतवणूक सादनातून मिळालेल्या उत्पन्नाचे 550 पटीने जास्त मिळालेला आहे. (Treasury Bonds).
Read more
  • Published in Articles
No Comments

आपला गुंतवणूक सल्लागार

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

आपल्या गुंतवणूक सल्लागाराचे मुल्यवर्धित सेवेबाबत आपण समाधानी आहात काय?

या महत्वाचे प्रश्र्नाकडे बरेचसे गुंतवणूकदार गांभीर्याने पहात नाहीत त्यांचे दृष्टीने महत्वाचे असते कि ते रोख्यात, म्युच्युअल फंडात, विम्यात कि बँकेचे कायम निधीत गुंतवणूक करतायत आपण ज्याचे मार्फत गुंतवणूक करत आहोत या गोष्टीला ते दुय्यम महत्व देतात आणि या मुळेच बरेच वेळा गुंतवणूकीचा निर्णय चुकीचा घेतला जाऊ शकतो.  बहुतेक गुंतवणूकदारांचे परीचयातीलच एखादी व्यक्ती गुंतवणूक प्रतिनीधी म्हणून फावल्या वेळेतील व्यवसाय करत असते आणि एखाद्या दिवशी तो गुंतवणूकदाराला भेटतो योजनेची अर्धी-मुर्धी माहीती देतो, यासाठी बहुदा तो ज्याकंपनीचे तो प्रतिनीधीत्व करत असेल त्या कंपनीचे नवीनच नियुक्त झालेल्या सेल्स मँनेजरला बरोबर घेऊन येतो आणि गुंतवणूकदार त्या तथाकथीत गुंतवणूकदार सल्लागारामार्फत आपण कष्टाने मिळविलेला पैसा गुंतवून मोकळा होतो.

काही काळानंतर केव्हातरी गुंतवणूकदाराला त्याचा एखादा मित्र किंवा परिचीत भेटतो सांगतो की मी एका चांगल्या गुंतवणूकदार सल्लागाराला भेटून माझ्या गुंतवणूकीचे नियोजन जाणीव पुर्वक केले व आज मी माझे गुंतवणूकीबाबत पुर्णत; नि:शंक व समाधानी आहे तेव्हा तो त्याने केलेल्या गुंतवणूकीचे मुल्य काय झाले हे पहाण्यासाठी आपल्या परिचीत गुंतवणूक प्रतिनीधीशी संपर्क साधतो तर त्याला उत्तर मिळते कि एक तर त्याने तो फावल्या वेळेतील व्यवसाय बंद केला आहे किंवा मी नंतर पाहून सांगतो, साहेबाना विचारून सांगतो किंवा असेच काहीतरी. एक अर्ज भरुन देणे, आवश्यक ती कागदपत्रे व चेक जोडून ते संबधीत कंपनीत पोहोचविणे आणि स्वत:चे कमिशनचा चेक खात्यात जमा झाला कि मौज करणे म्हणजे काही गुंतवणूक सल्लागार होता येत नाही.

काही तथाकथीत प्रतिनीधी विमा एजंट किंवा म्युच्युअल फंड वितरक म्हणून फक्त बाजारात येणा-या नविन योजनांचे अर्ज गुंतवणूकदाराला नेमाने देणे व योजनेचे फॉर्म भरुन ते संबधीत ठिकाणी पोहोचविणे एवढेच काम करत असतात.  त्यांचेकडे ते विकत असलेल्या योजनांची अत्यंत त्रोटक माहीती असते. बाजारातील सर्व घडामोडींबाबत ते अनभिज्ञ असतात.

खरे पहाता गुंतवणूक सल्लागाराकडे बाजारात उपलब्ध असणारे सा-याच गुंतवणूक पर्यांची अद्यावत माहिती असणे हे सद्याचे अस्थीर आर्थीक वातावरणातच नव्हे तर नेहमीच अत्यावश्यक आहे.  दरवर्षीच होणारे व्याजदरातील तसेच कररचनेतील बदलांमुळे या सर्वच बदलांची दखल घेऊन गुंतवणूकदाराला कोणताही पुर्वग्रह न ठेवता नि:पक्षपातीपणे गुंतवणूकीचा सल्ला मिळणे हा गुंतवणूकदाराचा हक्कच आहे.

गुंतवणूकदाराला त्याच्याकडील गुंतवणूकीसाठी असणारी अतिरीक्त रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणे अत्यावश्यक असते व त्यासाठी योग्य गुंतवणूक सल्लागारच गुंतवणूकदाराला या बाबतचा निर्णय घेण्यास योग्य ती मदत करु शकतो आणि त्यासाठी गुंतवणूक सल्लागाराला पुर्णत: व्यावसाईक, अभ्यासू एवढेच असून चालत नाही तर त्याला त्याचे निर्णय ठामपणे व कोणत्याही पुर्वग्रह विरहीत दृष्टीकोन ठेऊन घेता आलेच पाहिजेत.

तुमचे गुंतवणूक सल्लागाराबाबत खालील प्रश्र्न स्वत:लाच विचारुन तुम्ही तुम्ही तुमचा निर्णय करु शकता: 

1)तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे आवश्यक ती शैक्षणीक पात्रता आहे का?

जेव्हा आपण म्युचअल फंड योजना, जीवन विमा, रोखे किंवा अन्यत्र गुंतवणूक करु इच्छीता तेव्हा त्याबाबत तुमचे वतीने निर्णय घेण्यासाठी तुमचा गुंतवणूक सल्लागार पुरेसा सक्षम आहे काय?

2)तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे पुरेशी माहिती आहे काय?

इंटरनेटच्या वापरामुळे व दुरदर्शन वरील निरनीराळ्या वृत्त व आर्थिक वाहीन्यांमुळे तसेच वर्तमान पत्रे व निरनीराळ्या नियतकालीकांमुळे आजकाल गुंतवणूक विषयासंबंधी माहिती आपणापर्यंत सहजपणे व नियमितपणे आपणा सर्वांपर्यंत पोहोचत असते.

तर अशा एजंटसोबत काम चालू ठेवायचे का याचा निर्णय करण्याची वेळ आली आहे.

इथेच खरी गोम आहे कि या माध्यमातूनच गुंतवणूकदाराला बरेच वेळा एजंट पेंक्षा अधिक माहिती उपलब्ध होत असते.  जर तुम्हाला असे आढळून आले कि तुमचे एजंट पेंक्षा तुम्हालाच जास्त माहिती आहे किंवा त्याला जे याबाबत माहित असावयास हवे ते त्याला माहितच नाही

3)तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे पुरेसा अनुभव आहे काय?

शिक्षणा बरोबरच किंबहूना अनुभव हा महत्वाचा घटक आहे. तुमचा एजंट तुमचे सारख्याच अनेक गुंतवणूकदाराना या पुर्वीपासून नियमीत सेवा देत असेल व जर तो पुर्णवेळ गुंतवणूक सल्लागार म्हणूनच काम करत असेल तरच तो अनुभवाने परिपुर्ण समजता येईल.

4)तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता आहे काय?

तुमचा गुंतवणूक सल्लागार मागील कामगिरी, अस्थीरता, जोखीम व परतावा यातील गोष्टींची माहिती न देता तुम्हाला एकच योजना अथवा एकाच कंपनीच्या एकाच प्रकारचे गुंतवणूकीचे साधनात गुंतवणूक करावयास वारंवार सुचवत असेल तर त्यात त्याचा वैयक्तीक फायदा विचारात घेत असण्याची अधिक शक्यता असते.  जेव्हा तो तुम्हाला एखादे गुंतवणूकीचे माध्यम सुचवितो तेव्ह त्याला त्या योजनेच्या ब-या व वाईट बाबींबद्दल प्रश्र्न विचारुन तुमची खात्री करून घ्या तसेच त्या योजनेला पर्यायी योजनेत गुंतवणूक का करू नये याचे तो योग्य उत्तर देऊ शकतो का याची पडताळणी जरूत करा.  गुंतवणूकीचा सल्ला हा नेहमीच पुर्वग्रह विरहीत दृष्टीकोन ठेऊन व स्वतंत्रपणे विचार करून व फायद्याबरोबरच जोखीमीची माहिती सांगूनच दिला गेला पाहिजे.

5)तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे आवश्यक त्या सर्व अद्यावत सोयी सुविधा आहेत का?

तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे स्वत:चे कार्यालय, प्रशिक्षीत व पुरेसा कर्मचारी वर्ग,  आवश्यक ती सर्व सॉप्टवेअर्स नसतील तो तुम्हाला  हवी सेवा हव्या त्या वेळी देऊ शकत नाही.  आवश्यक वेळी रक्कम काढावयाची झाल्यास अशा परिस्थितीत विलंब होण्याचीच अधिक शक्यता असते. हे सारे अंतिमत: तुमच्या हिताचे नसते.  गुंतवणूकीचा व्यवसाय हा एक डायनँमीक व्यवसाय आहे कि जो एकाच तराजूत तोलता येत नाही आणि याची जाणीव तुमचे सल्लागाराकडे आहे याची खात्री करा.

6)तुमचा गुंतवणूक सल्लागार तुम्हाला कोणकोणत्या मुल्यवर्धीत सेवा देऊ शकतो हे गुंतवणूक करण्या पुर्वीच जाणून घेतलेत का?

तुमचा अर्ज व धनादेश योग्य ठिकाणी पोहोचवील्यानंतरच गुंतवणूक सल्लागाराचे खरे काम सुरू होते.  जर आपणास कोणत्याही कारणाने गुंतवणूकीचा खाते उतारा तुमचे पर्यंत पोहोचू शकला नाही तर तो तुम्हाला हव्या त्या क्षणी देण्याची सुविधा तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे असणे आवश्यक आहे, तसेच जर गुंतवणूक म्युच्युअल फंडासारखे शेअर बाजारसंबंधीत जोखीमीचे अधिन असेल तर तो देत असलेल्या सल्याला व देत असलेल्या मुल्यवर्धीत सेवेला फारच महत्व आहे.  तसेच तुमचे गुंतवणूकीवर लक्ष ठेवणे हे तुमचे काम आहेच पण तुमचे बरोबरच तुमचा गुंतवणूक सल्लागार सुध्दा या कामी जर तुम्हाला मदत करत असेल तर ते तुम्हाला अधीकच लाभदायकच असेल.

विचार करा तुम्ही निवडलेला गुंतवणूक सल्लागार वरीलसारखा तर नाही ना? आणि म्हणूनच तुम्ही स्वत:लाच प्रश्र्न विचारा कि मी माझ्या सद्याचे गुंतवणूक सल्लागाराकडूनच गुंतवणूक करत राहणे योग्य होईल का? आणि जर याचे उत्तर समाधानकारक नसेल तर तुमचे गुंतवणूक सल्लागार बदलण्याची वेळ आली आहे.

Read more
  • Published in Articles
No Comments

पतसंस्था व सोसायटी

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

पतसंस्था, क्रेडिट सोसायटी, सार्वजनीक ट्रस्ट, सहकारी गृहनिर्माण संस्था  अशा प्रकारचे संस्थाकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यायोग्य रक्कम असते.  मात्र अशा संस्था या सर्वसाधारणपणे बँकेच्या ठेवींमध्ये अल्प वा दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असतात.  या ठेवींवर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार कधी कमी तर कधी जास्त व्याज मिळत असते. मात्र मिळणारे व्याज हे आयकराच्या स्लँब नुसार करपात्र असते. अशा संस्थाचे गुंतवणूकीचे सर्वात महत्वाचे उदिष्ट हे परताव्यापेक्षा सुरक्षीततेवर जास्त असते आणि अशा संस्थांकडे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे असतात जे सुरक्षीत ठेवणे हे ह्या संस्थाचे कर्तव्यच असते. यापैकी पतसंस्था हि सहकारी निबंधकाच्या नियंत्रणाखाली येत असल्यामुळे जर सहकारी निबंधकाची परवानगी असेल तरच अशा संस्था म्युच्यअल फंडाच्या समभाग आधारीत योजनेत गुंतवणूक करु शकतात.  मात्र सध्या त्याना अशी परवानगी नाही मात्र या संस्था म्युच्यअल फंडाच्या कर्जरोखे आधारीत योजनेत गुंतवणूक करु शकतात मात्र अशी गुंतवणूक हि नॉन एसएलआर गुंतवणूकीतच धरली जाते.  ट्रस्ट व सहकारी गृहनिर्माण संस्था मात्र त्यांची जोखीम स्विकारण्याची तयारी असल्यास म्युच्यअल फंडाच समभाग आधारीत तसेच अन्य कोणत्याही योजनेत गुंतवणूक करु शकतात.

म्युच्युअल फंडात गुंतवणूकीमध्ये बाजाराची जोखिम अंतर्भुत असल्यामुळे ट्रस्ट सारखे संस्थात्मक गुंतवणूकदार त्यापासून दुर रहाणेच पसंत करतात.  परंतु वस्तूस्थिती हि आहे कि जर म्युच्युअल फंडाच्या सर्वच योजनेत शअर बाजाराची जोखीम नसते पैकी लिक्वीड स्किममध्ये केलेल्या गुंतवणूकीमध्ये अशा प्रकारची शेअर बाजाराची कोणतीही जोखीम तर नसतेच, परत कर्जरोखे आधारीत अन्य योजनेत किमान व्याज दराच्या बदलाची व क्रेडिट रेटिंगची जी जोखीम असते ती सुध्दा लिक्वीड फंडात नगण्य स्वरुपाचीच असते. कारण या योजनेत जमा होणारी रक्कम हि प्रामुख्याने मनीमार्केट मध्ये जास्तीत जास्त ९१ दिवसाच्या मुदतीच्या निश्र्चित उत्पन्न देणा-या उच्च पतदर्जा असणा-या सिक्युरिटीजमध्येच केली जाते, त्यामुळे अशा योजनेत जोखीम जवळपास शुन्य असते.

लिक्वीड फंडात अगदी अल्प काळासाठी म्हणजे २ ते ४ दिवस ते कितीही काळासाठी गुंतवणूक करता येते. अगदी दर शुक्रवारी पैसे गुंतवून, लगेचच पैसे काढण्याचीही सुचना देता येते, पैसे सोमवारी (कामकाजाच्या दुस-या दिवशी) दुपारी १२ वाजेपर्यंत आपल्या बँक खात्यात जमा होतात.  मिळणारा परतावा हा मात्र ४ दिवसांचा मिळतो कारण अशा योजनेत हिस्टॉरीकल एनएव्ही मिळण्याची सुवीधा असल्यामुळे जरी शुक्रवारी (दुपारी २.३० पर्यंत) गुंतवणूक केली तरी एनएव्ही मात्र गुरुवारची मिळत असते व पैसे रविवारच्या एनएव्हीने परत केले जातात. इतिहासात आजपर्यंत तरी लिक्विड फंडाची एनएव्ही कमी झाल्याचे उदाहरण नाही. म्हणूनच जर का आपण ह्या सुवीधेचा वापर प्रत्येक आठवडा अखेर त्याचप्रमाणे वर्षातील सर्व बँक सुट्यांच्या दिवसांपुरती जरी वापरली तरी मिळणारे उत्पन्न हे जास्तीचेच असते.

तसेच ज्या संस्था वा व्यक्ती उच्च उत्पन्न गटात मोडतात व ज्याना एकूण ३२.४४५% आयकर भरावा लागतो अशानी जर या योजनेत गुंतवणूक डिव्हीडंड पेआऊट या पर्यायाखाली केली तर आयकरात ७.९५% बचत होते, कारण डिव्हीडंड डिस्ट्रीबुशन टँक्सची आकारणी करण्याची पध्दत वेगळी आहे.

लिक्वीड फंड योजनांची मागील कामगीरी जर का आपण पाहिली तर असे दिसून येते कि गेल्या एक वर्षात अशा योजनेतून ८% ते  ९% एवढा वार्षीक परतावा मिळालेला आहे. 

जर का आपण ३ वर्षे किंवा जास्तकाळ या योजनेत पैसे गुंतवून ठेवले तर इंडेक्सेशनचाही फायदा घेऊन होणा-या नफ्यावर फक्त १०% लॉंग टर्म भरावा लागतो  इंडेक्सेशन हे महागीईशी निगडीत असल्यामुळे सध्याचा महागाईचा दर (जवळपास ६%) विचारात घेतल्यास जवळपास काहीच कर भरावा लागत नाही. म्हणूनच ज्याना एक वर्षाच्या मुदत ठेवीत पैसे ठेवावयाचे असतील त्यांच्यासाठी हि योजना अतीशय फायदेशीर तर होतेच वर गरज लागल्यास केव्हाही पैसे मिळू शकतात.

हि योजना चँरिटेबल ट्रस्ट, पतसंस्था,संस्थात्मक गुंतवणूकदार, उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती यांचेसाठी सर्वोत्तम अशी आहे.

मूळ गुंतवणूक लिक्विड योजनेत गुंतवून एकदाच कॅपिटल अॅप्रीशिएशन सिस्टीमॅटिक ट्रान्स्फर व्दारे मुदलात वाढणारी रक्कम मात्र नियमित दररोज, साप्ताहिक, मासिक अथवा त्रैमासिक तत्वावर एखाद्या इक्विटी किंवा बॅलन्सड योजनेत वर्ग करण्याची सूचना दिली तर जोखीम फक्त मिळणारे फायद्यापुरतीच मर्यादित राहील.

लिक्वीड फंडाव्यतरीक्त डेब्ट फंडाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत मात्र या योजनेत व्याजाचे दर बदलाची तसेच पतमापन दर्जाबदलाची जोखीम असते, ती लिक्वीड फंड योजनेत जवळपास शून्य असते.

या योजनेत गुंतवणूकीचे महत्वाचे फायदे:

१)     चांगला परतावा.

२)     एंट्री व एक्झीट लोड नाही.

३)     कमी एक्सपेन्स रेशो.

४)     मुदत नाही म्हणून पैसे केव्हाही काढता येतात.

५)     बँक ठेवीत पैसे ठरावीक मुदतीसाठी अडकून पडतात तसे या योजनेत अडकून पडत नाहीत.

६)     एकदा का खाते उघडले कि ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी पिन मिळते, तिचा वापर करुन हवे तेव्हा पैसे गुंतवता, काढता येतात.

७)     पैसे काढण्याची सुचना दुपारी २.३० पुर्वी, कोणत्याही कामकाजाच्या दिवशी दिली असता, कामकाजाच्या दुस-या दिवशी आपल्या खात्यात पैसे जमा होतात.

८)     असे खाते उघडण्यासाठी आम्ही मदत करतो.

एफएमपी (फिक्सड् मँच्युरिटी प्लान)

चँरिटेबल ट्रस्ट, पतसंस्था, संस्थात्मक गुंतवणूकदार, उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती ज्या एक ठरावीक काळासाठी गुंतवणूक करु इच्छीतात त्यांचेसाठी एफएमपी (फिक्सड् मँच्युरिटी प्लान) हा एक अतीशय फायदेशीर गुंतवणूक पर्याय आहे. या प्रकारच्या योजनेत ९१ दिवस ते ३ वर्षापर्यंत गुंतवणूक करण्याची सुवीधा असते.

या योजनेत गुंतवणूकीचे महत्वाचे फायदे:

१)     लिक्वीड फंडाप्रमाणेच जवळपास शून्य जोखीम.

२)     योजनेत जमा झालेले पैसे जेवढ्या काळाची एफएमपी असेल तेवढ्याच काळाच्या कमर्शीअल पेपर्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझीटस्, कर्जरोखे अशा निश्र्चित उत्पन्न देणा-या पर्यायातच केली जाते, ज्यांचा व्याजाचा दर अगोदरच ठरलेला असतो.

३)     अशा योजनेत एक वर्षापेक्षा कमी काळासाठी गुंतवणूक केली तर लिक्वीड फंडाप्रमाणेच कर बचतीचा फायदा होतो.

४)     मात्र जर गुंतवणूकीचा कालावधी ३ वर्षा पेक्षा जास्त असेल तर इंडेक्सेशनचाही फायदा घेऊन फक्त १०.१% लॉंगटर्म कँपिटल गेन टँक्स भरावा लागेल, म्हणजेच सुमारे २२.२% पर्यंत करबचत होते.

५)     अशा योजना शेअर बाजारात नोंदवल्या जातात, त्यामुळे आवश्यक तर पैसे केव्हाही काढता येतात.

६)     अशा योजनेत केलेल्या गुंतवणूक तारण ठेऊन काही बँका कर्जही देतात.

७)     अशा योजना अगदी थोड्या काळासाठीच गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात. 

Read more
  • Published in Articles
No Comments

बचत खाते

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

बँकेच्या बचत व चालू खात्याचा वापर करुन अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी.

प्र. १: माझ्या सेव्हिंग बँक खात्यात काही रक्कम जमा आहे, ते पैसे मला केव्हाही काढता येतात मात्र त्यावर मला फक्त ४% दराने व्याज मिळते, मला या पेक्षा जास्त उत्पन्न मिळावे अशी इच्छा आहे तर मी काय करावे?

उत्तर: तुमच्या समोर दोन पर्याय आहेत:

१)      जर तुम्हाला कोणतीही जोखीम न स्विकारता जास्त उत्पन्न हवे असेल व सोबत केव्हाही पैसे काढण्याची सुविधा पण हवी असेल तर आपण तुमच्या नेट बँकींगचा वापर करुन म्युच्युअल फंडाचे लिक्वीड स्किम मध्ये ऑनलाईन पैसे गुंतवा. पैसे जेव्हा हवे असतील तेव्हा पैसे काढण्याची सुचना ऑनलाईन द्या. दुस-या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. अशा प्रकारचे योजनेतून सर्वसाधारणपणे ६% ते ९% एनएव्ही फरकाचे उत्पन्न तुम्हाला व्याजाचे दरानुसार मिळू शकते. जर तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणूक करत असाल तर iPIN च्या पर्यायाला टिक करावयास मात्र विसरु नका ज्यामुळे तुम्हाला इंटरनेटवरुन व्यवहार करण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होईल. अशा प्रकारचे योजनेत किमान रुपये दहा हजार गुंतवता येतात.

२)      जर तुमची शेअर बाजाराची जोखीम स्विकारण्याची तयारी असेल व काही काळ थांबण्याची सुध्दा तयारी असेल मात्र जर आपणास शेअर बाजाराचे ज्ञान नसेल तर म्युच्युअल फंडाचे समभाग योजनेत (Equity Scheme) गुंतवणूक करा. मात्र सर्व रक्कम एकदाच न गुंतवता, शेअर बाजार ज्या ज्या वेळी खाली येतो त्या प्रत्येक वेळी थोडी – थोडी रक्कम गुंतवा व शेअर बाजार ज्यावेळी वर जातो व तुमच्या गुंतवणूकीवर तुम्हाला अपेक्षीत उत्पन्न मिळालेले असेल तेव्हा पैसे काढून घेण्याची सुचना ऑनलाईन द्या. पाचव्या दिवशी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. उदा. दुपारचा एक वाजला आहे आज शेअर बाजार २०० अंकानी घसरला आहे व तुमच्या बचत खात्यात रु.२५०००/- शिल्लक आहेत, तुम्ही त्यापैकी रु.५०००/- आज गुंतवा, परत जेव्हा बाजार १०० ते २०० अंकानी खाली येईल तेव्हा परत रु.५००० गुंतवा असे करत रहा नंतर जेव्हा बाजारात तेजी येईल व तुमच्या गुंतवणूकीचे मुल्य तुमच्या अपेक्षेनुसार वाढलेले असेल तेव्हा पैसे काढून घ्या. असे नियमीतपणे करत राहून तुम्ही थोडे अधिक पैसे मिळवू शकता. जर दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची असेल तर SIP (Systematic Investment Plan) व्दारे दर महा ठरावीक रक्कम १५ ते २० वर्षे नियमीत गुंतवत रहा.

प्र.२:  मी व्यावसाईक (व्यापारी, उद्योजक,कारखानदार,पतसंस्था इत्यादी) असून माझे बँकेत करंट अकाउंटचे खाते आहे. ज्यावर मला कोणतेही व्याज मिळत नाहि. शनिवार व रविवारी माझ्या चालू खात्यात पैसे पडून असतात ज्यावर मला काहीच उत्पन्न मिळत नाही, मला या शिलकेवर काही उत्पन्न मिळण्यासाठी मी काय करावे?

उत्तर: अतीशय चांगला व महत्वाचा प्रश्न आहे. शुक्रवारी (तसेच प्रत्येक बँकेच्या सुटीच्या आदल्या दिवशी) दुपारी २.०० वाजण्यापुर्वी तुमच्या करंट अकाउंट मध्ये असणारे पैसे तुमच्या नेट बँकींगचा वापर करुन म्युच्युअल फंडाचे लिक्वीड स्किम अकाउंटमध्ये ऑनलाईन पैसे गुंतवा (यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्यातून १.०० वाजे पर्यंत पैसे ट्रान्सफर करणे इष्ट होते), म्हणजे तुम्हाला आदल्या दिवशीची म्हणजेच गुरुवारची एनएव्ही मिळेल व त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजण्यापुर्वी पैसे काढण्याची सुचना ऑनलाईन द्या (शक्यतो हि सुचना गुंतवणूक करुन झाली कि लगेचच द्या. पैसे सोमवारी दुपारी १२.०० वाजेपर्यंत तुमच्या करंट अकाउंट मध्ये जमा होतील. तुम्हाला रवीवारची एनएव्हीने पैसे मिळतील म्हणजेच गुरुवार ते रवीवार या दरम्यानच्या एनएव्ही फरकाइतके जादा उत्पन्न तुम्हाला मिळेल. अशा प्रकारच्या योजनेतून सर्वसाधारणपणे ६% ते ९% एनएव्ही फरकाचे उत्पन्न तुम्हाला व्याजाचे दरानुसार मिळू शकते. जर वर्षभर तुम्ही याप्रकारे या सुवीधेचा वापर केलात तर वर्षातील एकूण १०४ शनिवार, रवीवार + १५ सुट्या असे मिळून ११९ दिवसाचे उत्पन्न तुम्ही जादा मिळवू शकता. उदा. सर्वसाधारणपणे तुमच्या खात्यात जर का रु.१० लाख रुपये शिल्लक रहात असतील व तुम्ही हि सुवीधा वापरली तर वर्षात तुम्हाला रु.१९५०० ते रु.२९००० या दरम्याने जास्तीचे उत्पन्न मिळेल व हा लाभ मिळवण्यासाठी एकदा म्युच्युअल फंडाचे खाते उघडल्यावर प्रत्येक वेळी गुंतवणूक करणे व सोबतच पैसे काढण्याची सुचना देण्यासाठी फार तर ५ ते १० मिनीटेच वेऴ द्यावा लागेल. या सुवीधेचा अवश्य फायदा घ्या.

प्र. लिक्वीड फंडात केलेली गुंतवणूक किती जोखीमीची असते?

उत्तर: लिक्वीड फंडातील गुंतवणूक हि मनी मार्केट मध्ये व अल्प मुदतीच्या कर्जरोख्यात केली जात असते त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेत व्याज दराचे फरकाची व पत दर्जाच्या बदलाची जोखीम असते जी अत्यल्प म्हणजेच नगण्य स्वरुपाची असते. अशा योजनेतून सर्वसाधारणपणे वार्षीक ६% ते ९% दरम्याने उत्पन्न मिळते, जे व्याजदराच्या बदलावर अवलंबून असते. सध्या व्याजदर वाढलेला असल्यामुळे जास्त उत्पन्न मिळत आहे.

प्र. बँकेच्या मुदत ठेवींसाठी काही पर्यायी योजना म्युच्युअल फंडाच्या असतात का? व अशा योजनांचा काय फायदा असतो?

उत्तर: बँक ठेवींवर मिळणारे व्याज हे करपात्र उत्पन्नात मोडते व बँक टिडिएस कापूनच व्याजाची रक्कम तुमच्या हाती देत असते. म्युच्युअल फंडामध्ये Fixed Maturity Plans (ठरावीक काळाच्या मुदतबंद योजना) असतात, अशा योजनेत ३० दिवसांपासून ३ वर्षाचे मुदतीसाठी गुंतवणूक करण्याची सुवीधा असते. सर्वसाधारणपणे या योजनांतून मिळणारे उत्पन्न हे बँक व्याजापेक्षा थोडे अधिक असते. महत्वाचा फायदा म्हणजे (१) टिडिएस कापला जात नाही (२) मिळणारे उत्पन्नांवर इंडेक्ससेशनव्दारे कर आकारणी करण्याची सुवीधा आहे ज्यामुळे कर बचत होते.

Read more
  • Published in Debt Funds
No Comments

एटिएम

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

सेव्हिंग बँक खाते व चालु खाते (Savings Bank & Current A/c) यांच्यासाठी उत्तम पर्याय – पैसे केव्हाही काढण्याची सुविधा तुमच्या बँक खात्याप्रामाणेच उपलब्ध आहे

सध्या तुम्हाला मिळतात

सेव्हिंग बँक खात्यावर ४% द.सा.द.शे.

करंट अकाउंटवर 0% द.सा.द.शे.

रिलायन्स म्युच्युअल फंड हाऊस तुमच्यासाठी घेऊन आली  आहे एक योजना जी आहे तुमच्या बचत/चालू खात्याला एक अतिशय उत्तम पर्याय. तसेच जसे कि तुमच्या बचत/चालू खात्यातून तुम्ही केव्हाही पैसे काढू शकता तसेच केव्हाही पैसे काढण्याची सुवीधा या योजनेत उपलब्ध आहे.

Past Performance:

In last one year this scheme has given returns @ 8.25% to 8.80% 

यासाठी तुम्हाला एवढेच करावयास हवे कि जसे तुम्ही बँकेत खाते उघडता तसेच रिलायन्स म्युच्युअल फंडाकडे Reliance Liquid Fund Treasury Plan किंवा Reliance Money Manager Fund या दोन पैकी कोणत्याही योजनेत खाते सुरु करावे लागेल.

या योजनेपासून मिळणारे फायदे:

  • तुम्ही जेव्हा वरीलपैकी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवून खाते उघडता तेव्हा तुम्हाला व्हिसा एटिएम कार्ड (VISA ATM Card) पुर्णत: मोफत मिळते.
  • हे एटिएम कार्ड वापरुन तुम्ही कोणत्याही बँकेच्या एटिएम सेंटरमधून केव्हाही २४/७/३६५ पैसे काढू शकता, व यासाठी तुम्हाला कोणताही अतिरिक्त आकार द्यावा लागत नाही.
  • हे कार्ड वापरुन तुम्ही भारतात तसेच परदेशातही खरेदी करु शकता, म्हणजेच तुमच्या बँक डेबीट कार्डासारखीच हि सुवीधा आहे.
  • एकदा खाते उघडल्यावर जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या सेव्हिंग बँक खात्यात पैसे भराल तेव्हा ते पैसे लगेचच वरील योजनेत ट्रान्सफर केलेत तर हि सुवीधा आपण कायमस्वरुपी वापरु शकता. नोकरी करणा-या व्यक्तीनी त्याच्या पगाराची रक्कम जेव्हा त्यांचे बँक खात्यात जमा होते त्यानंतच्या (२, १०, १८ व २८ यापैकी) तारखेची एसआयपी या योजनेत केली तर ते या योजनेचा लाभ कायमस्वरुपी घेऊ शकतील. पगारापैकी किती रक्कम गुंतवली जावी हे तुमचे तुम्ही ठरवा मात्र एसआयपीची मासीक रक्कम किमान रु.२०००/- हवी, जास्त तुम्ही कितीही गुंतवू शकता. तसेच या योजनेत नेट बँकींगचा वापर करुन ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याची सुवीधासुध्दा उपलब्ध आहे. तसेच ट्रान्झँक्शन स्लिप भरुन सही करुन व सोबत चेक जोडून आपच्याकडे अथव रिलायन्स म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही सर्हिस सेंटर मध्ये पाठवूनही तुम्ही वेळोवेळी या योजनेत पैसे भरु शकता.
  • टिडिएस् कापला जात नाही.
  • कोणतेही छुपे चार्जेस नाहीत.
  • किमान रु.५,०००/- (रुपये पांच हजार मात्र) भरुन तुम्ही या योजनेत खाते उघडू शकता.
  • तसेच तुम्ही या योजनेत केव्हाही व कितीही काळासाठी गुंतवणूक करु शकता, अगदी दोन दिवसांसाठी सुध्दा कारण हि ओपन एंडेड योजना असून हिची एनएव्ही रोजच्या रोजच बदलत असते.

हि योजना फक्त रहिवाशी भारतीयांसाठीच उपलब्ध आहे.

Read more
  • Published in Debt Funds
No Comments

एफएमपी

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

फिक्सड् मँच्युरिटी प्लान – एफएमपी

फिक्सड् मँच्युरिटी प्लान्स हे निश्र्चित कालावधी योजना (Close Ended Income Schemes) या प्रकारच्या योजनेत गणल्या जातात यांच्या मुदतपुर्तीचा कालावधी अगोदरच जाहिर केला जातो. या योजनेत योजना जाहिर केलेल्या कालावधीतच (New Fund Offer period – NFO) गुंतवणूक करता येते. चँरिटेबल ट्रस्ट, पतसंस्था, संस्थात्मक गुंतवणूकदार, उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदार जे एक ठरावीक काळासाठी गुंतवणूक करु इच्छीतात त्यांचेसाठी एफएमपी हा एक अतीशय फायदेशीर गुंतवणूक पर्याय आहे. या प्रकारच्या योजनेत ९१ दिवस त ३ वर्षापर्यंत गुंतवणूक करण्याची सुवीधा असते. योजनेत जमा झालेले पैसे जेवढ्या काळाची एफएमपी असेल तेवढ्याच काळाच्या कमर्शीअल पेपर्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझीटस्, कर्जरोखे अशा निश्र्चित उत्पन्न देणा-या पर्यायातच केली जाते, ज्यांचा व्याजाचा दर अगोदरच ठरलेला असतो, त्यामुळे जोखीम जवळपास शून्य असते. जर गुंतवणूकीचा कालावधी ३६६ दिवसांपेक्षा जास्त असेल तर (नवीन येणा-या डायरेक्ट टँक्स कोड नुसार) फक्त १०% लॉंगटर्म कँपिटल गेन टँक्स भरावा लागेल, म्हणजेच सुमारे २२% करबचत होते. अशा योजना अगदी थोड्या काळासाठीच गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात, म्हणून  आम्हाला संपर्क करा.

बँक एफडी ला हा सर्वोत्तम पर्याय आहे. किमान गुंतवणूक रु. १०००० जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवता येते.

Read more
  • Published in Debt Funds
No Comments

मासीक उत्पन्न योजना

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

मासिक उत्पन्न योजना (MIP Schemes)

या प्रकारच्या योजनेचे उदिष्ठ  प्रामुख्याने नियमीत दरमहा लाभांश देण्याचे असते. या प्रकारच्या योजनेतील गुंतवणूक ७५% ते ९०% सरकारी व खाजगी कंपन्याच्या कर्जरोख्यात व दिर्घ, अल्प मुदतीच्या बँक ठेवी, व्यापारी पेपर आदी नियमीत ठरावीक दराने उत्पन्न देणा-या साधनात केली जाते व शेअर बाजाराचाही फायदा मिळून भांडवली मुल्यवृध्दी व्हावी म्हणून १०% ते २५% रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते. नियमीत उत्पन्न मिळवू पहाणा-यांसाठी या योजना चांगल्या असतात.  मात्र अशा प्रकारच्या योजनेत व्याजाचे चढ उताराचा परिणाम होत असतो. व्याजदर जेव्हा वाढत जात असतात तेव्हा यातील गुंतवणूक केलेल्या कर्जरोख्यांचे मुल्य कमी होते व जेव्हा व्याजदर कमी असतात तेव्हा त्यांचे मुल्य वाढते. तसेच शेअर बाजाराच्या चढ उतारांचाही परिणाम या योजनांवर होत असतो. 

Read more
  • Published in Debt Funds
No Comments

मध्यम मुदतीसाठी

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

ध्यम ते दिर्घ मुदतीसाठी कर्जरोखे आधारीत (Bond Fund) योजना:

या प्रकारच्या योजनेतील संपुर्ण रक्कम हि दिर्घ मुदतीच्या सरकारी व खाजगी कंपन्यांच्या कर्जरोख्यात व मनी मार्केटमध्ये गुंतवली जाते, ज्यावर ठरावीक दराने व्याजाचे उत्पन्न मिळते. अशा योजनेत व्याजाच्या चढ उताराची व पतदर्जाच्या बदलाची जोखीम असते. व्याजाचे दर कमी झाले कि दिर्घ मुदतीच्या कर्जरोख्यांची किंमत वाढते व व्याजाचे दर वाढले की दिर्घ मुदतीच्या कर्जरोख्यांची किंमत कमी होते. ज्याना शेअर बाजाराची जोखीम घेण्याची इच्छा नसेल मात्र पैसे केव्हाही काढण्याची सुवीधा व बँकेपेक्षा थोडे जास्त उत्पन्न मिळावे अशी इच्छा असेल अशा व्यक्तींनी या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करावी. सध्या अशा योजनेत चांगले उत्पन्न मिळत आहे. 3 वर्षापेक्षा जास्त काळासाठी गुंतवणूक केली असता आयकरात बचत होते. टिडिएस कापला जात नाही. इंडेक्सेशनचा फायदा मिळतो.

Read more
  • Published in Debt Funds
No Comments
Page 7 of 11
« Previous 1 … 5 6 7 8 9 … 11 Next »
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10

अनिवार्य सूचना (Disclaimers)

www.mutualfundmarathi.comया वेबसाईटची निर्मिती हि मराठी भाषिकांना त्यांचे मातृभाषेत म्युचुअल फंड व शेअरबाजाराची माहिती मिळावी म्हणून तयार केलेली आहे. या वेबसाईटची मालकी हि सदानंद ठाकूर याची असून येथील मजकूर पूर्व परवानगीशिवाय अन्यत्र पोस्ट करू नये. Thakur Financial Services ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस ARN-46061 व्दारे म्युचुअल फंड वितरक म्हणून AMFI व अनेक AMC सोबत रजिस्टर आहे. या संकेतस्थळावर दिलेली माहिती, फायनान्शियल प्लानिंग सुविधा, कॅलक्यूलेटर व अन्य सुविधा हि तुमच्या म्हणजे या संकेतस्थळाला भेट देणार्यांच्या माहितीसाठी त्यांनी स्वत: उपयोगात आणण्यासाठी आहे. आम्ही यासाठी कोणतीही फी किवा अन्य कोणतेही मानधन आकारत नाही. ह्याचा वापर करून केलेली गुंतवणूक तसेच परिणाम देईल असा आमचा दावा नाही. म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते. मागील कामगिरी तशीच राहील अथवा राहणार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा. (Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risk, read all scheme related documents carefully. Past performance of the scheme may or may not sustain in future).

Design & Powered By S.N Enterprises

TOP
×