• 9503718779 Sujay
  • 9518 752 605 Sadanand
  • clients.tfs@gmail.com
  • साइन इन
  • साइन अप करा
  • Switch English

Thakur Financial Services

  • पहिले पान
  • आमच्या बाबत
  • म्युचुअल फंड
    • ऑनलान गुंतवणूक करा
    • म्युचुअल फंडाबाबत
    • म्युचुअल फंडाचे प्रकार
      • समभाग आधारित
      • कर्जरोखे आधारित
      • करबचतीच्या योजना
    • गुंतवणूक
    • शेअरबाजार
      • भांडवली बाजार
      • फ्युचर्स
      • ऑप्शन
    • डिमॅट खाते
    • उत्पादने
    • सेवा व सुविधा
  • विमा
  • आयकर
  • लेख
  • डाउनलोड
  • म्युच्युअल फंड ऑनलाईन
    • ऑनलान व्यवहार करा
  • संपर्क करा
Mutual Fund Distributor having experience of more than 15 years. Share Market experience of more than 25 years. Author of "Mutual Fund - Swapnapurticha Rajmarg" Marathi book.
Page 6 of 11
« Previous 1 … 4 5 6 7 8 … 11 Next »

गुंतवणूक कशी करावी?

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

सध्याचे परिस्थितीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी?

जर आपण अवलोकन केले तर असे दिसून येते कि गेल्या  दिड वर्षात सेन्सेक्स १८००० पासून जवळपास २९००० पर्यत वर गेलेला आहे अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यात काय फायदा असा विचार अनेकांच्या मनात येत असतो. बाजार १५ हजार असताना गुंतवणूक केली  असती तर बरे झाले असते मग गुंतवणूक यात करावी कि नाही असे वाटणे सहाजीकच आहे. पण ज्याना दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची आहे त्यानी ती केव्हाही सुरु करावी असा नियम आहे. 

अर्थशास्त्राच्या नियमानुसार कोणत्याही वस्तुची किंमत जेव्हा वर जाते तेव्हा ती परत खाली येतेच व परत जेव्हा खाली येते तेव्हा ती नंतर परत वर जातेच. जेव्हा सर्वच लोकांना एखादी वस्तू काहि कारणाने महाग होईल असे वाटू लागते तेव्हा बरेच लोकं ती वस्तू खरेदी करण्यासाठी उताविळ होतात व त्या वस्तूची किंमत वाढू लागते या उलट जेव्हा सर्वानाच वाटू लागते कि आता आपणाजवळ असणारी वस्तूची किंमत कमी होणार आहे व ते सारेच ती विकण्याच्या मागे लागतात व किंमत कमी होऊ लागते. अर्थशास्त्राचा दुसरा नियम हा वस्तूची किंमत हि वस्तूच्या मागणी व उपलब्धतेवर अवलंबून असते, जेव्हा बाजारात एखाद्या वस्तुची उपलब्धता कमी असते व तिची मागणी जास्त असते तेव्हा तीची किंमत वाढते व उपलब्धता जास्त झाली व मागणी कमी झाली कि किंमत कमी होते. हे चक्र अव्याहतपणे चालूच असते, आणि म्हणूनच शेअर बाजारातही कधी तेजी असते तर कधी मंदी असते.  मात्र कधीही कायम तेजी अथवा मंदी रहात नाही, राहूच शकत नाही. मात्र सध्या जर आपणास एक रकमी गुंतवणूक करावयाची असेल तर आपण ती रक्कम म्युच्युअल फंडाच्या–लिक्वीड योजनेत गुंतवावी (या योजनेतील गुंतवणूक हि प्रामुख्याने ९० दिवसांचे निश्र्चित उत्पन्न देणा-या गुंतवणूक साधनात केली जात असते) –  

या योजनेत सध्या व्याजदर चढे असल्यामुळे वार्षीक सरासरी ८.५% ते ९% च्या दरम्याने परतावा मिळत आहे व तेथून एसटीपी (सिस्टीमँटीक ट्रान्सफर प्लान) व्दारे डायव्हर्सिफाईड इक्वीटी योजनेत साप्ताहीक तत्वावर वर्ग करण्याचा पर्याय निवडावा, मुदत साधारणपणे ३ ते ५ वर्षाची असावी. याचा फायदा असा होतो कि लिक्वीड फंड योजनेतील गुंतवणूकीवर तुम्हाला ८.५०% ते ९% दराने परतावा मिळत राहील व एसटिपीव्दारे बाजाराच्या सर्वच स्तरावर तुमची गुंतवणूक होत राहिल्यामुळे दिर्घ मुदती तुम्हाला फारच आकर्षक परतावा मिळू शकेल. 

दुसरे म्हणजे या परिस्थितीत एसआयपी (सिस्टिमँटीक इंन्व्हेस्टमेंट प्लान) माध्यमातून दर महा ठरावीक तारखेला दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत रहाणे, यातही तुम्ही साप्ताहिक गुंतवणूकीचा पर्याय निवडू शकता. तुमच्या बँकेच्या बचत खात्यात पैसे शिल्लक ठेवलेत कि झाले. तुमच्या मासिक उत्पन्नातील काही भाग तुम्ही या प्रकारे गुंतवून जेव्हा बाजारात परत तेजी येईल तेव्हा आकर्षक परतावा मिळवू शकाल.

थोडक्यात नियमीत गुंतवणूक, दिर्घ मुदत, थोडा संयम व आपल्या गुंतवणूकीच्या निर्णयाची ठामपणे अंमलबजावणी याव्दारे तुम्ही भविष्यात चांगले उत्पन्न मिळवू शकाल.

तुमच्या गरजेप्रमाणे सर्वप्रकारच्या योजनाम्युच्युअल फंडात असतात. समभाग आधारित योजनेत शेअर बाजाराची जोखीम असते तर कर्ज रोखे आधारित योजनेत शेअर बाजाराची जोखीम नसते मात्र व्याजाचे चढ उताराची व पत मानांकनाची जोखीम असते,  मात्र हि जोखीम लिक्विड फंड योजनेत सर्वात कमी, म्हणजे नाहीचे बरोबरच, असते. म्युचुअल फंड योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन तज्ञ फंड मॅनेजर्स करत असतात हा सर्वात मोठा फायदा असतो.

Learn how to investmutualfundmarathi.comRead how to invest in MarathiServices offered by Thakur Financial Servicesstock/share market in MarathiUnderstand how to invest in Marathi
Read more
  • Published in About Mutual Fund
2 Comments

गुंतवणुकिचे व्यवस्थापन

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

गुंतवणुकीचे व्यवस्थापनः

तसं पाहिले असता म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर्स हे आपल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करतच असतात त्यामुळे आपल्याला काही वेगळे व्यवस्थापन करण्याची गरज नसते. मात्र म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर्सवरती योजनेच्या उद्दिष्टांचे बंधन असते व एका मर्यादेबाहेर त्यांना खरेदी-विक्री करता येत नाही आणि म्हणूनच मार्केट जेव्हा मोठ्या प्रमाणात कोसळते तेव्हा NAV सुद्धा कमी होते. वर्ष २००८ मध्ये शेअर बाजार २१ हजार ते ७५०० पर्यंत कोसळला होता मात्र तो तसा एकाच दिवशी कोसळला नव्हता तर तो टप्या टप्प्याने खाली आला होता. आपल्याला त्यामागचे जागतिक मंदी, अमेरिकेत झालेला सबप्रईमचा घोटाळा, परदेशात दिवाळखोरित निघालेल्या अनेक आर्थिक संस्था इ. कारणे ज्यावेळी आपल्याला समजली त्यावेळी ज्यांनी आपली गुंतवणूक निष्क्रियपणे पाहत न बसता एक तर काढून घेतली अथवा म्युच्युअल फंडचे डेब्टस फंडात वर्ग केली व मार्केट जसं जसं खाली येत गेले त्या त्या वेळी पुनःर्गुंतवणूक केली अथवा डेब्टस फंडातून इक्विटी फंडात वर्ग केली त्यांना मात्र फायदाच झाला.

सर्वोत्तम पर्याय म्हणजे नियमीत दरमहा गुंतवणूक करत रहाणे व जर आपण दरमहा रु.२०००० पेक्षा जास्त करणार असाल तर अँटो डेबीटचे ४ फॉर्म भरुन महिन्यात साधारणपणे ७-८ दिवसाचे फरकाने ४ वेळा गुंतवणूक करावी, अशी गुंतवणूक केली असता सरासरीचा सर्वोत्तम फायदा मिळतो.  माझा अनुभव आहे कि अशा प्रकारे गुंतवणूक करत राहील्यास १० वर्षात एखादे वर्ष सोडल्यास उर्वरीत ९ वर्षे चांगला फायदा होतो.

जर एकरकमी गुंतवणूक करावयाची असेल तर प्रथमत: म्युच्युअल फंडाचे कर्जरोखे (Debt Fund Scheme) आधारीत योजनेत गुंतवणूक करुन तेथुन नियमीत वर्ग योजनेव्दारा (Systematic Transfer Plan) समभाग योजनेत दर आठवडा तत्वावर वर्ग करावी जेणे करुन वरील प्रमाणे नियमीत गुंतवणूकीचाच लाभ मिळतो.

साधारणपणे ८/१० वर्षात एका मोठ्या मंदीचे व एका मोठ्या तेजीचे बाजारात आवर्तन होत असते, अर्थात असा काही नियम नाही.  मात्र गेले अनेक दशके याप्रमाणे घटना घडलेल्या आहेत. माझा अनुभव असे सांगतो कि जर का बाजारातून सलग ४/५ वर्षे दर साल दर शेकडा जर का २०% पेक्षा जास्त परतावा मिळाला तर नंतरचे वर्षात एक मंदी येते व बाजारात बऱ्यापैकी करेक्शन येते.  जर का असा परतावा तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर मिळाला तर एक तर पैसे काढून घ्यावेत अथवा त्याच फंडाचे लिक्विड योजनेत पैसे वर्ग करून तेथून सिस्टीमॅटीक ट्रान्स्फर प्लान चा वापर करून परत काही ठराविक कालावधीत रक्कम परत मूळ योजनेत आणावी. यामुळे काय होईल कि जर बाजार खाली आला तर झालेला फायदा कायम राहून त्यात जास्त भर पडेल. जर बाजार वर गेला तर फक्त फायद्यातच नुकसान होईल, झालेल्या फायद्यात नुकसान होण्यापेक्षा हे केव्हाही चांगले.

अर्थात जर का आपण नियमितपणे गुंतवणूक करत असाल व आपण वर्षांचा नव्हे तर काही दशकांचा, दोन दशके, तीन दशके असा आपले गुंतवणुकीचा कालावधी ठरवलेला असेल तर तुम्ही काहीच न करता, फक्त नियमितपणे गुंतवणूक करत राहणेच तुमच्या फायद्याचे होईल. कारण सारासरीमध्ये बाजारातील चढ उतारावर मात करण्याची फार मोठी ताकद असते.

Learn managing investmentmutualfundmarathi.comRead about managing investment in Marathiread managing investment in MarathiServices offered by Thakur Financial Servicesstock/share market in MarathiUnderstand managing investment in Marathi
Read more
  • Published in About Mutual Fund
No Comments

गुंतवणुक कोण करु शकतं?

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

म्युच्युअल फंडात कोण गुंतवणूक करू शकतं?

भारतातील स्थानिक जे खालिलप्रमाणेः

  • भारतात राहणारे भारतीय व्यक्ती/HUF
  • भारतीय कंपन्या वा भागिदारी संस्था
  • भारतीय ट्रस्ट / चॅरिटेबल संस्था बॅंका व आर्थिक संस्था
  • नॉन बॅंकींग फायनान्शिअल कंपनीज
  • इन्शुरन्स कंपनीज
  • प्रॉव्हिडंड फंड
  • म्युच्युअल फंड कंपन्या

अनिवासीः

अनिवासी भारतीय आणि मूळ भारतीय वंशाच्या व्यक्ती ओव्हरसिज कॉर्पोरेट बॉडीज

परदेशी संस्थाः

फॉरेन इंस्टिट्युशनल इंनव्हेस्टर्स जे सेबी कडे नोंदणीकृत आहेत

about who can invest trade in shares/ why should invest in shares market in Marathiread who can invest in share market in Marathi. understand who can invest mutual funds and share market in MarathiWho can invest in shares market read in Marathi
Read more
  • Published in About Mutual Fund
No Comments

गुंतवणुक का करावी?

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

म्युच्युअल फंडात गुंतवणूक का व कशी करावी?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी? उत्तर अगदी सोपं आहे, कारण अतिरिक्त संपत्ती निर्माण करण्यासाठी. फक्त एकच गोष्ट लक्षात असूद्या की, समभाग संबधीत म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करताना ही गुंतवणूक फक्त दीर्घ मुदतीसाठी असावी.   अल्पमुदतीत नफा किंवा नुकसान मोठ्याप्रमाणात होण्याची शक्यता अधिक असते दीर्घ मुदतीत एक तरी नफ्याची चांगली संधी उपलब्ध होण्याची शक्यता अधिक असते. अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची असल्यास डेट फंड योजनेत गुंतवणूक करावी. 

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदेः

अत्यल्प खर्च. तज्ञ फंड मॅनेजर्स तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करतात. पारदर्शकता. गुंतवणुकीची किंमत रोजच्या रोज कळते. तरलता – पैसे केव्हाही काढता येतात – ज्यामुळे अपेक्षीत भांडवलवॄद्धी झाली असता किंवा गरज असेल तेव्हा पैसे काढता येतात. देशाच्या ग्रोईंग आर्थिक व्यवस्थात सहभाची संधी. जगाच्या तुलनेत भारतीय अर्थ व्यवस्था वेगाने वाढत आहे. गुंतवणूक अनेक कंपन्यांच्या शेअर्शमध्ये गुंतविली जात असल्यामुळे मर्यादित जोखीम. इक्विटी लिंक सेव्हींग स्कीम मध्ये गुंवणूक करून आयकर कलम ८०-सी खाली मूळ उत्पन्नात वजावट मिळण्याची सुविधा. गुंतवणूक केल्यादिवसापासून एक वर्षानंतर पैसे काढले असता परतावा करमुक्त असतो.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे तोटेः

आपले नियंत्रण नसते. नफा किंवा नुकसान शेअर बाजारातील चढउतारावर अवलंबून असते. निश्चित परतावा माहीत नसतो. आता दीर्घ मुदत म्हणजे किती हे व्यक्तीसापेक्ष वेगवेगळे असू शकते. तरी किमान ३ ते १० वर्षे थांबण्याची तयारी असणे सर्वोत्तम म्हणता येईल. नियमित ठरावीक मुदतीने एकाच चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करितं राहणे फारच उत्तम. ठरावीक मुदत ही शक्यतो दर महा, दर तीन महिन्यांनी अथवा वार्षिक आपल्या सोयीने ठरवता येते. या मध्ये सरासरीचा फायदा मिळतो कारण आपण मार्केट वर असताना तसेच खाली असताना (जेव्हा आपल्या गुंतवणुकीपोटी जास्त युनिट प्राप्त होतात व सरासरी होते). आणखीन एक उत्तम पर्याय म्हणजे ज्याला शक्य असेल त्याने मार्केट प्रत्येक वेळी ३०० ते ५०० पॉंईंटने खाली येते त्या प्रत्येक वेळी गुंतवणूक करावी यामध्ये फारच मोठा फायदा मार्केट मध्ये तेजी आल्यावर होण्याची शक्यता असते.

गुंतवणूकदाराला मिळणारा फायदा.

१)      म्युच्युअल फंड हे गुंतवणूकीचे प्रभावी माध्यम आहे.

२)      प्रत्येकाच्या गरजेनुसार म्युच्युअल फंडाच्या विविध योजना गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात.

३)      म्युच्युअल फंडात जास्त जोखमीच्या तसेच जवळपास अजिबात जोखीम नसणा-याही योजना असतात.

४)      म्युच्युअल फंडाच्या कर बचतीच्याही योजना असून यातून आयकर कलम ८०-सी अंतर्गत सुट मिळते.

५)      म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर एक वर्षानंतर मिळणारा सर्व फायदा करमुक्त असतो.

६)      म्युच्युअल फंडाच्या डेब्ट योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर एक वर्षानंतर मिळणा-या उत्पन्नावर इंडेक्ससेशनचा फायदा घेऊन कर बचत करता येते.

७)      म्युच्युअल फंडात दिर्घकाळासाठी नियमीत दरमहा गुंतवणूक केली असता फार चांगला फायदा मिळण्याची शक्यता असते.

८)      तज्ञ व्यक्ती त्याच्या गुंतवणूकीची काळजी घेतात.

९)      शेअर बाजारातील दिर्घकालीन वाढीचा फायदा मिळतो.

१०)   नियमीत बचतीची सवय लागते.

११)   भविष्यातील आर्थीक गरजा भागवल्या जातात.

१२)   संपत्ती निर्माण होते.

१३)   त्याच्या गुंतवणूकीचा तपशील केव्हाही ऑनलाईन पहाता येतो.

१४)   केव्हाही पैसे काढण्याची सुवीधा असल्यामुळे गरजेला केव्हाही पैसे मिळू शकतात.

१५)   म्युच्युअल फंडाच्या योजनेत केलेल्या गुंतवणूकीतून कोणतीही कपात केली जात नसल्यामुळे संपुर्ण रक्कम गुंतवणूकीलाच जाते.

१६)   रिलायन्स, बिर्ला व आयसीआयसीआय या म्युच्युअल फंडाच्या योजनेत एसआयपी इंशुरन्सची सुवीधा घेता येते ज्यामुळे रु.२० लाखापर्यंत मोफत विमा मिळू शकतो ज्यासाठी कोणताही आकार (चार्जेस) लागत नाही, ह्यासाठीचा खर्च म्युच्युअल फंड कंपनी त्यांचे फायद्यातून सोसते.

about why should one invest trade in shares/ why should one invest in shares market in Marathiread why should one invest in share market in Marathi. understand why should one invest mutual funds and share market in MarathiWhy should one invest in shares market read in Marathi
Read more
  • Published in Investment
No Comments

नियमित गुंतवणूक फायदे

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP):

 हा एक बॅंकेचे रिकरींग डिपॉझिटला अतिशय चांगला पर्याय आहे. तसेच ज्या व्यक्ती पिग्मिमध्ये गुंतवणूक करतात त्यांनाही हा चांगला पर्याय आहे. नियमित ठरावीक मुदतीने एकाच चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करीत राहणे फारच उत्तम. ठरावीक मुदत ही शक्यतो दर महा, दर तीन महिन्यांनी अथवा वार्षिक आपल्या सोयीने ठरवता येते. या मध्ये सरासरीचा फायदा मिळतो कारण आपण मार्केट वर असताना तसेच खाली असताना (जेव्हा आपल्या गुंतवणुकीपोटी जास्त युनिट प्राप्त होतात व सरासरी होते) गुंतवणूक करत रहातो ज्यामुळे सरासरीचा लाभ मिळतो.

गेल्या २० ते २२ वर्षात या प्रकारे केलेल्या गुंतवणुकीवर अत्यंत आकर्षक परतावा मिळालेला आहे जो कि वार्षिक २२% चक्रवाढ दराने मिळालेला आहे, मात्र आपण गुंतवणूक करताना वार्षिक १५% दराने परतावा मिळेल असे समजून दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी.  बाजारात ठरविक अंतराने मोठी तेजी व पाठोपाठ मोठी मंदी येत असते व हे चक्र अव्याहत चालूच असते.  या प्रकारे गुंतवणुक दीर्घ काळ करत राहिले असता बाजारातील जोखीम जवळपास नष्ट होऊन जाते. म्युचुअल फंडाचे जवळपास सर्वच योजनेत एस.आय.पी. करता येते, मात्र आपल्या जोखीम स्वीकारण्याचे तयारीनुसार व किती काळ आपण गुंतवणूक करणार आहोत यानुसार योजना निवडावी.  तरुण व्यक्तीने शक्यतो मल्टी कॅप योजनेत व मिड कॅप योजनेत गुंतवणूक करावी, मध्यम वयाचे व्यक्तीने लार्ज कॅप योजनेत, बॅलन्सड योजनेत गुंतवणूक करावी, कर बचतीसाठी ELSS योजनेत एस.आय.पी. करावी.

Learn about benefits of regular investingRead about benefits of regular investing in MarathiServices offered by Thakur Financial Servicesstock/share market in Marathi. mutualfundmarathi.comunderstand benefits of regular investing in Marathi
Read more
  • Published in Investment
No Comments

एस.आय.पी.

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

Systematic Investment Plan (SIP) म्हणजेच नियमीत केलेली गुंतवणुक:

आपली स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला हा एकच जन्म आहे. गुंतवणुकीचे निर्णय महत्त्वाचे आहेत आहेत कारण आपली स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला त्या निर्णयांचीच मदत होते. Systematice Investment Plan (SIP)म्हणजेच नियमीत केलेली गुंतवणुक प्लँन दरमहा रुपये 500/- इतक्या कमी रकमेने सुरु करता येतो. म्हणूनच हि योजना म्हणजे काही कालावधीत संपत्ती निर्माण कारण्यासाठी तुम्हाला मदत करणारे आर्थिक नियोजनाचे एक सर्वोत्तम साधन आहे.

Systematic Investment Plan (SIP)म्हणजेच नियमीत केलेली गुंतवणुक प्लँन हे एक गुंतवणुक तंत्र असून त्याद्वारे तुमच्या पसंतीच्या म्युचल फंड योजनांमधून लहान लहान रकमा गुंतवून तुम्हाला भविष्यासाठी तरतुद करता येते. या योजनेद्वारे खात्री होते की गुंतवणूकदाराची गुंतवणूक शिस्तबद्ध रीतीने होत राहील आणि त्यामुळे आपली आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी तो योग्य मार्गावर राहील. शिवाय गु्तवणूकीसाठी आयुष्यात लवकर सुरुवात केल्याने दोन शक्तिशाली गुंतवणूक धोरणांचा लाभ घेता येतो : रुपयाच्या किंमतीची सरासरी आणि चक्रवाढीची शक्ति. त्यामुळे चलनवाढ आणि चढत्या किंमती अशी स्थिती असताना दीर्घकालीन गुंतवणूक क्षितीज तुम्हाला संपत्ती निर्माणासाठी आणि उद्याची तरतुद करण्यासाठी मदतच करील.

SIP चे फायदे:

1) गुंतवणुकीचा शिस्तबद्ध पर्याय.

2) रुपयाचे किंमतीचे सरासरीचा फायदा मिळतो.

3) साधी, सोपी, सोयीची आणि लक्ष ठेवण्यास सुलभ अशी योजना.

4) चक्रवाढीचे लाभ.

एक मात्र लक्षात ठेवा म्युचल फंडात पैसे गुंतवताना दीर्घ काळासाठीच करा. शॉर्ट टर्म मध्ये काहीही होऊ शकते पण दीर्घ मुदतीत फायदाच होतो. दीर्घ मुदत म्हणजे किमान ५ ते १५ वर्ष. सर्वोत्तम पर्याय दरमहा नियमित गुंतवणूक पर्याय निवडणे व पुढील तारखेचे चेक अथवा आटो डेबीट फॉर्म भरून देणे. गुंतवणूक शक्यतो काही दशकांसाठीच नियमितपणे करावी.

दरवर्षी आपले पगाराचे किंवा व्यवसायातील उत्पन्न हे वाढतच असते म्हणून आपली एस.आय.पी.ची मासिक गुंतवणूक सुद्धा दरवर्षी १०% ते २५% या प्रमाणात वाढवावी. हल्ली बहुतांशी फंड हाउसेस स्टेप अप एस.आय.पी. हा पर्याय फॉर्म भरतानाच देत असतात ज्यात दर सहा महिन्यांनी अथवा वार्षिक रु.५०० किंवा पाचशेच्या पटीत आपली गुंतवणूक वाढवण्याची सुविधा देतात, याचा प्रत्येक नवीन एस.आय.पी. सुरु करताना प्रत्येक गुंतवणूकदाराने वापर अवश्य करावा.

Read more
  • Published in Investment
No Comments

एकदाच रक्कम गुंतवून दर महा पैसे काढणे

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

एकदाच एकरकमी गुंतवणू करुन नियमीत दर महा पैसे काढण्याचे उदाहरण:

म्युच्युअल फंडात एकरकमी रक्कम ठेऊन दरमहा ठरावीक रक्कम काढण्याची सुविधा आहे. या पर्यायालाSystematic Withdrawal Plan(एस.डब्ल्यू.पी.) असे म्हणतात.

हा पर्याय ज्याना नियमीत दर महा उत्पन्न हवे आहे त्यांचेसाठी अतिशय चांगला आहे मात्र रक्कम गुंतवताना ती किमान 10 वर्षासाठी तरी गुंतवावी व सुरुवातीला दर महा 1% म्हणजेच वार्षीक 12% दराने पैसे काढण्यास सुरूवात करावी व प्रत्येक वर्षानंतर आपल्या गुंतवणूकीचे मुल्य तपासून यात आवश्यक तर बदल करावा याचा फायदा हा होतो कि दिर्घ मुदतीत मुदलात भरीव वाढ होते व जस जशी महागाई वाढत जाईल तस तशी आपल्या गरजेनुसार दर महा काढावयाचे रकमेत वाढ करता येऊ शकते जेणे करून महागाईशी सामना करणे सुलभ होईल.

मी मात्र Systematic Withdrawal Plan (एस.डब्ल्यू.पी.) पेक्षा डिव्हिडंड पे आउट या पर्यायाला जास्त पसंती देतो कारण एस.डब्लू.पी. मध्ये आपली युनिट्स कमी करून आपणास पैसे दिले जातात त्यामुळे कधी न कधी तरी आपली युनिट्स संपतातच, तेजीचे कालखंडात हा पर्याय प्रभावी ठरतो, कारण कमी युनिट्स खर्ची पडतात, मात्र मंदीचे कालखंडात जेव्हा जास्त युनिट्स खर्ची पडतात तेव्हा हा पर्याय चांगला ठरत नाही.  मात्र जर का आपण डिव्हिडंड पे आउट हा पर्याय निवडला तर आपली युनिट्स कधीच कमी होत नाहीत, कारण आपल्याला जो डिव्हिडंड मिळतो तो प्रती युनिट ठराविक पैसे/रुपये या स्वरुपात मिळतो.

आपली मिळालेली युनिट्स कायम रहातात, मुद्दलाचे मूल्य बाजाराचे चढ उतारानुसार कमी जास्त होते. जर आपले उदिष्ठ दीर्घ मुदतीचे असेल तर हा पर्याय फारच फायदेशीर ठरतो. म्युचुअल फंडाच्या समभाग आधारित  बहुसंख्य योजना वर्षातून एकदा डिव्हिडंड देतात व त्याचे सरासरी वार्षिक प्रमाण १०% ते १२% असे गुंतवणुकीवर पडते. मात्र काही योजना हल्ली मासिक डिव्हिडंड देतात, त्यापैकी HDFC Prudence Fund हि एक हायब्रीड प्रकारातील  योजना असून जानेवारी २०१६ पासून दर महा प्रती युनिट ३० पैसे या दराने डिव्हिडंड देत आहे.  हि योजना सन १९९८ पासून नियमित दर वर्षी डिव्हिडंड देत असून तेव्हापासूनचा सरासरी डिव्हिडंड ची रक्कम आपल्या गुंतवणुकीवर १३% पडलेली आहे. सध्या मिळणारे डिव्हिडंड चे मासिक उत्पन्न गुंतवणुकीवर सरासरी १% पेक्षा जास्त प्रतिमाह म्हणजेच वार्षिक १३% पेक्षा अधिक मिळत आहे. परत डिव्हिडंड पासून मिळणारे उत्पन्न वार्षिक रु.१० लाखापर्यंत करमुक्त असते. ज्यांना नियमिती दर महिना उत्पन्न हवे असेल त्यांनी या योजनेत अवश्य गुंतवणूक करावी.  ज्यांना वार्षिक डिव्हिडंड चालणार असेल त्यांनी अन्य योजनांची निवड केली तरी चालेल. ज्यांनी HDFC Prudence Fund या योजनेत सन १९९६ साली रु.१० लाख गुंतवले होते त्यांना एप्रिल २०१६ पर्यंत एकूण रु.६० लाख एव्हढा करमुक्त डिव्हिडंड मिळालेला असून मूळ गुंतवणुकीचे मूल्य २४ एप्रिल २०१६ रोजी रु.२८ लाखांपेक्षा जास्त आहे. अशा योजनेत किमान १० वर्षे किवा अधिक काळासाठी गुंतवणूक करावी. आपल्याकडे असणारे एकूण रकमेपैकी साधारण ४०% रक्कम अश्या योजनेत गुंतवावेत व बाकी रक्कम सुरक्षित साधनातच गुंतवावी.

Read more
  • Published in Investment
No Comments

एक रकमी गुंतवणुक

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

एकरकमी गुंवणूक कोणी करावी?

ज्याचेकडे सद्दस्थीतीत एकदाच एकरकमी गुंतवणूक करण्याची क्षमता आहे. अचानक धनलाभ झाला असता अतिरिक्त असणारी रक्कम दीर्घ मुदतीसाठी गुंतवावी. मात्र अशी गुंतवणूकीत बाजाराची जोखीम जास्त येते, यास्तव अशी गुंतवणूक करताना जी रक्कम आपणाला पुढील किमान 5 वर्षे तरी लागणार नाही एवढीच रक्कम गुंतवावी.  चांगला व अपेक्षी फायदा झाला झाला असता जास्त मोहाला बळी न पडता रक्कम काढून घ्यावी अथवा 15 ते 20 वर्ष विसरुन जाता आले पाहिजे.

एक रकमी गुंतवणूक करताना खालील पर्य़ायाचा विचार अवश्य करा जेणे करुन मुद्दल तर सुरक्षीत राहील व मुद्दलावर मिळणा-या परताव्यासंबधीत गुंतवणूकी परतीच शेअर बाजाराची जोखिम राहील. (खालील पैकीडिव्हीडंड ट्रान्सफर योजनाहा पर्याय निवडून मासीक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करावी).

मासीक उत्पन्न योजना(Monthly Income Plan – MIP)

ज्यांना दरमहा करमुक्त उत्पन्न हवे आहे त्यांनी या प्रकारचे डेट फंड योजनेत गुंतवणूक करावी.  या योजनेत सर्वसाधारणपणे 80% गुंतवणूक हि निश्चित उत्पन्न देणा-या गुंतवणूक प्रकारात जसे कि सरकारी कर्ज रोखे, कंपन्यांचे कर्ज रोखे, मनी मार्केट इ. प्रकारचे पेपर्समध्ये केली जाते, ज्याची मुदत 1 ते 7 वर्षे असते असेच पेपर्स गुंतवणूकीसाठी निवडले जातात, जेणेकरुन व्याजदराचे बदलाचा कमीत-कमी परिणाम होतो.  उर्वरीत 20% रक्कम हि समभाग व समभाग संबंधीत गुंतवणूक प्रकारात केली जाते.  या योजनेत गुंतवणूकदाराला गुंतवणूकीचे तिन पर्याय असतात:

1)      वृध्दी पर्याय: या पर्यायात गुंतवणूकीचे मुल्य बदलत जाते (शक्यातो वाढत जाते).  रक्कम हवी तेव्हा काढता येते.  यातून एक वर्षाचे आत रक्कम काढल्यास 0.25% ते 0.75% एवढा निर्गमन आकार आकारला जातो.  एक वर्षानंतर रक्कम काढल्यास संपुर्ण रक्कम दिली जाते. या योजेत ज्याना कमीतकमी जोखिम व चांगले व करमुक्त उत्पन्न हवे आहे अशानी गुंतवणूकीसाठी हा पर्याय निवडावा.

2)      डिव्हीडंड पेआऊट पर्याय: यामध्ये परत दोन प्रकार आहेत:

अ)   मासिक डिव्हीडंड– हा पर्याय स्विकारला असता दरमहा डिव्हीडंड दिला जातो.   प्रतीमहा मिळणारा डिव्हीडंड हा कमी जास्त होतो.  मिळणारा डिव्हीडंड हा करमुक्त असतो.

आ) नियमित दर महिना उत्पन्न हवे आहे काय?

तुम्ही निवृत्त झालेली व्यक्ती आहात काय? तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर नियमित दर महिना ठराविक दराने (मासिक सुमारे  १%+) करमुक्त उत्पन्न मिळावे अशी इच्छा आहे काय? सन १९९८ पासून नियमित दर वर्षी लाभांश दिला जात आहे, जानेवारी २०१६ पासून तो दर महिना देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा  

इ) तिमाही डिव्हिडंड पर्याय– हा पर्याय स्विकारल्यास दर तिन महिन्यांनी डिव्हिडंड दिला जातो. मिळणारा डिव्हीडंड हा करमुक्त असतो.

ई)      डिव्हीडंड पुर्नगुंतवणूक योजना: या योजनेत जाहिर होणारा डिव्हीडंड हा पुन: याच योजनेत गुंतवला जातो व यातील परतावा हा करमुक्त असतो.

उ)      डिव्हीडंड ट्रान्सफर योजना: योजनेत जाहिर होणारा डिव्हीडंड हा समभाग संबधीत योजनेत वर्ग केला जातो.  ज्या व्यक्तीना आपले मुद्दल पर्णत: सुरक्षीत रहावे व त्याचबरोबर शेअर बाजाराची थोडी जोखिम स्विकारुन आपले भांडवलात आकर्षक वृध्दी व्हाही असे वाटते त्यांचे साठी हा पर्याय सर्वोत्तम आहे.   ज्या व्यक्ती एकदाच एक ठरावीक रक्कम गुंतवून हा पर्याय दिर्घ मुदतीसाठी निवडतात त्याना एसआयपी प्रमाणे उत्तम परतावा मिळाला आहे.

३) कॅपिटल अॅप्रीशिएशन सिस्टीमॅटीक ट्रान्सफर प्लान चा प्रभावीपणे वापर करून जोखीम फक्त व्याजापुर्ती मर्यादित ठेवता येते. अशाप्रकारे गुंतवणूक करून एस.आय.पी. चा फायदाही घेता येतो. अधिक माहितीसाठी मला संपर्क करा.

Read more
  • Published in Investment
No Comments

गुंतवणूकदारांचे माहितीसाठी

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

केवळ गुंतवणूकदारांचे माहिती व मार्गदर्शनासाठी.

आपण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करु इच्छित असल्यास कोठेही गुंतवणूक करण्या पुर्वी हे अवश्य वाचा.

गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी:

1)      स्वकष्टाने मिळविलेला पैसा गुंतवताना तो जेथे गुंतवला जाणार आहे त्याची परीपुर्ण माहिती करुन घ्या.

2)      जी व्यक्ती तुम्हाला एखादे गुंतवणूक साधन विकावयास येते तेव्हा त्याची पार्श्वभूमी समजाऊन घ्या, तो हे काम पुर्ण वेळ करतो कि अर्धवेळ करतो आहे.

3)      गुंतवणूक करणे हे तुमचे फायद्याचे आहे कि ते विकावयास आलेल्या व्यक्तीचे फायद्यासाठी तो तुम्हाला सुचवत आहे हे पडताळून पहा.  तो फक्त त्या साधनाचे चांगल्या बाजुचीच माहिती देत असेल व त्यातील जोखमीची जर पूर्ण माहिती देत नसेल तर सावधान व्हा.

4)      तुम्ही गुंतवत असलेल्या रकमेतून किती रक्कम वजा केली जाते हे तपासून पहा.  ज्या साधनात गुंतवणूकीचे रकमेतून मुळातच कपात केली जाते अश्या कोणत्याही साधनात गुंतवणूक करू नका त्यात तुमचेच नुकसान व ते विकावयास आलेल्या प्रतीनिधीचाच फक्त लाभ असतो.

5)      बाजारात येणा-या नविन योजनेच्या मोहात पडू नका, यांत तुमचेच नुकसान होण्याची शक्यता अधिक.

6)      जीवन विमा हा प्रत्येक व्यक्तीलाच अत्यावश्यक आहे मात्र जीवन विमा हे बचतीचे किंवा गुंतवणूकीचे साधन होऊच शकत नाही.  गुंतवणूकीसाठी बाजारात अनेक पर्याय आहेत, त्यांची माहिती करून घेऊन अशा साधनात गुंतवणूक करावी.  जीवन विमा हा फक्त टर्म इंशुरन्स स्वरुपातच घ्यावा व गुंतवणूक हि फक्त गुंतवणूक साधनातच करावी.

7)       विमा प्रतीनिधी जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा तो त्याला टर्म इंशुरन्सबद्दल माहिती देण्यास सांगा ह्यात तो टाळाटाळ करू लागला तर, एक तर त्याचे ज्ञान तोकडे आहे किंवा तो स्वत:चे कमीशनचाच विचार करतो आहे हे पक्के लक्षात घ्या.

8)      शेअर बाजाराचे त्रोटक ज्ञान किंवा दुस-याने दिलेल्या टिपस् आधारे शेअर बाजारात गुंतवणूक/ट्रेडिंग करुन नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असते, त्यापेंक्षा म्युचअल फंडात दिर्घ मुदतीसाठी पण नियमीतपणे थोडी-थोडी का होईना गुंतवणूक केल्यास चांगला नफा होण्याचीच शक्यता असते.

युलिप व म्युचअल फंड तुलना

म्युचल फंड गुंतवणूकीचे माध्यमयुलिप (Unit Link Insurance Plan)
म्युचल फंड हे पूर्णतः गुंतवणूकीचे साधन आहेULIP हे इंशुरन्स कंपन्याचे प्रॉडक्ट आहे
म्युचल फंडाला एंट्री लोड अजीबात नसतो त्यामुळे सर्व रक्कम गुंतवणूकिला जातेयुलिप मध्ये पहिल्या वर्षी एंट्री चार्जेस २% ते १०% एवढे भारी असतातयाव्यतरीक्त दरवर्षी सुमाशरे ७% आकार पडतो
नंतर कितीही वेळा गुंतवणूक केली तरी वरिल प्रमा़णेच एंट्री लोड लागत नाही व सर्व रक्कम गुंतवणूकिला जाते.युलिप मध्ये दुस-या  वर्षापासून ०% ते ४% एवढे असतात. याव्यतरीक्त दरवर्षी सुमाशरे ७% आकार पडतो
एंजटला कमिशन 0.5% ते 0.75% एवढेच मिळतेएंजटला कमिशन ५% ते १०% एवढे मिळते
वार्षीक १०% गुंतवणूकी वार्षीक चक्रवाढ पध्दतिने परतावा मिळाला तर ३ -या वर्षी एकूण निव्वळ परतावा सुमारे 33% पेंक्षा जास्त होतोवार्षीक १०% गुंतवणूकी वार्षीक चक्रवाढ पध्दतिने परतावा मिळाला तरI ३ -या वर्षी एकूण एकूण गुंतवणूकी एवढेसुध्दा गुंतवणूक मुल्या होत तर नाहीच पण गुंतवणूकदार नुकसानीतच असतो
गुंतवणूक म्हणूनच विकले जाते आणि गुंतवणूकीसाठी योग्य पर्यायइंशुरन्स प्रॉडक्ट असूनही गुंतवणूकदारांची दिशाभूल करुन एजंट लोकं हे गुंतवणूक प्रॉडक्ट म्हणूनच विकतात
गुंतवणूकदाराला फायदेशीरगुंतवणूकदाराचे नुकसान व फक्त एजंट साठी फायदेशीर
गुंतवणूकदाराने यात गुंतवणूक करावीजीवन विमा हा अत्यावश्यक आहे यात काहीच संशय नाही मात्र तो टर्म इंशुरन्स स्वरुपातच घ्यावा

म्युचअल फंडात गुंतवणूकीचे फायदे:

  • गुंतवणूक करताना कोणताही आकार नसल्यामुळे संपूर्ण रक्कम गुंतवणूकीला जाते. वजावट शुन्य.
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • कमी जोखीम
  • आवश्यक तेव्हा केव्हाही पैसे काढून घेण्याची सुवीधा.
  • रोजचे रोज मुल्य समजते
  • कमीत कमी खर्च
  • पारदर्शकता
  • आयकर मुक्त परतावे
  • सेबी व अँफीचे नियंत्रण
  • आयकर कलम 80-सी खाली वजावट मिळणारे योजनेत गुंतवणूकीची सुविधा – यात 3 वर्ष पैसे मात्र काढता येत नाहीत.

म्युचअल फंडात गुंतवणूकीचे तोटे:

  • परतावे अनिश्चीत असतात.
  • शेअर बाजाराचे चढ उताराची जोखीम असते.
  • स्वत:ला नियंत्रण ठेवता येत नाही.
  • बाजार कोसळून नुकसान झाल्यास दिर्घ काळ थांबण्याची तयारी असावी लागते.
  • मागील कामगिरीचे आधारानेच गुंतवणूक करता येते.

 टर्म इंशुरन्स व म्युचअल फंड असे समीकरणाने गुंतवणूक केली तर पुढे काय होऊ शकते याचे काल्पनीक उदाहरण:

गुंतवणूक सुरु करताना वयदर महा टर्म इंशुरन्स हप्तादर महा म्युचअल फंड गुंतवणूकएकूण मासीक हप्ताजीवन विमा मुदत वर्षेमिळणारे जीवन विमा संरक्षणगुंतवणूक काढून घेताना वय वर्षमिळणारे गुंतवणूक मुल्य
1838272211043025 लाख4850 लाख
1939172211133025 लाख4950 लाख
2039772211193025 लाख5050 लाख
2141172211333025 लाख5150 लाख
2242372211453025 लाख5250 लाख
2343672211583025 लाख5350 लाख
2445072211723025 लाख5450 लाख
2546672211883025 लाख5550 लाख
2648472212063025 लाख5650 लाख
2750572212273025 लाख5750 लाख
2852772212493025 लाख5850 लाख
29552333938913025 लाख5950 लाख
30582333939213025 लाख6050 लाख
31618333939573025 लाख6150 लाख
32662333940013025 लाख6250 लाख
33709333940483025 लाख6350 लाख
34762333941013025 लाख6450 लाख
35821333941603025 लाख6550 लाख
36773333941122525 लाख6150 लाख
37837333941762525 लाख6250 लाख
38907333942462525 लाख6350 लाख
39985333943242525 लाख6450 लाख
401073333944122525 लाख6550 लाख
41635400046352015 लाख6150 लाख
42689400046892015 लाख6250 लाख
43751400047512015 लाख6350 लाख
44815400048152015 लाख6450 लाख
45883400048832015 लाख6550 लाख
46696800086961512 लाख6150 लाख
47754800087541512 लाख6250 लाख
48817800088171512 लाख6350 लाख
49886800088861512 लाख6450 लाख
50962800089621512 लाख6550 लाख
5175819500202581010 लाख6150 लाख
5282119500203211010 लाख6250 लाख
5388919500203891010 लाख6350 लाख
5496419500204641010 लाख6450 लाख
55104719500205471010 लाख6550 लाख
56 2900029000006125 लाख
57 2900029000006225 लाख
58 2900029000006325 लाख
59 2900029000006425 लाख
60 2900029000006525 लाख

वयाप्रमाणे जीवन विमा संरक्षण व मुदत यात यांत बदल केला आहे तसेच विमा हप्ता बदलला आहे.

वय वर्षे 18 त 55 पर्यंत मुदती अंती रुपये 50 लाख मिळावेत या दृष्टीने म्युचअल फंड गुंतवणूक 15% दराने करावयास हवी ती धरली आहे.

वय वर्षे 56 त 60 पर्यंत मुदती अंती रुपये 25 लाख मिळावेत या दृष्टीने म्युचअल फंड गुंतवणूक 15% दराने करावयास हवी ती धरली आहे.

हे फक्त उदाहरण आहे.  प्रत्यक्षात गुंतवणूकदाराचे गरजे नुसार व द.म. गुंतवणूकीचे क्षमतेनुसार बदल करावा लागेल.

म्युचअल फंडातून मिळणारा परतावा हा शेअर बाजाराचे चढ उतारावर अवलंबून असतो, सबब याकडे फक्त एक उदाहरण म्हणूनच पहावे.

Read more
  • Published in Investment
No Comments

FAQ

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी म्युच्युअल फंडामधे कशी गुंतवणूक करू?

प्रथमतः आमचेशी मोबाईल ९४२२४३०३०२ वर किंवा इमेल sadanand.thakur@gmail.com द्वारे संपर्क साधून चर्चा करुन गुंतवणूकीची योजना सुनिश्चित करा. मग एकतर याच संकेतस्थळावरुन फॉर्म डाउनलोड करा व पूर्ण भरुन सही / सह्या करुन सोबत चेक किंवा डीडी व आवश्यक ती कागदपत्रे जोडून आमचेकडे कुरिअर किंवा पोष्टाने पाठवा पुढले सारे आम्ही करु. अथवा आमचेकडे मागणी करा आम्ही तुमची विचारलेली माहिती कळवा आम्ही तो तुमचा फॉर्म तुम्हाला पूर्ण भरुन पाठवू सोबत कागद पत्रांची यादि कळवू आता तुम्ही फक्त फॉर्म सही / सह्या करुन सोबत चेक किंवा डीडी व आवश्यक ती कागदपत्रे जोडून आमचेकडे कुरिअर किंवा पोष्टाने पाठवा पुढले सारे आम्ही करु.

म्युचल फंडामधिल गुंतवणूक पारदर्शक असते का?

होय.  रोजच्या रोज NAV म्हणजे एका युनिटची किंमत रात्री ८ वाजता https://www.amfiindia.com या संकेतस्थळावर जाहिर केली जाते.

माझ्या गुंतवणूकीवर कसे परतावे मिळतात?

तुमचे पैसे तुमच्या योजनेच्या उदिष्टांनुसार गुंतवले जातात. तुम्ही जर इक्वीटी स्किम निवडली असेल तर पैसे शेअर बाजारात गुंतवले जातात व तज्ञ फंड मॅनेजर त्याचे रिसर्च टिमच्या सहित त्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करतो. त्या व्यवहारातून होणारा नफा अथवा तोटा सर्व गुंतव़णूकदारांमध्ये त्यांचे गुतवणूकीचे प्रमाणात वाटला जातो.  प्रथमतः तुमच्या मुळ अथवा नियमित गुंतवणूकीपोटी तुम्हाला त्या त्या वेळच्या बाजार भावानुसार युनिट अदा केली जातात व तुम्हाला त्याचे स्टेटमेंट प्रत्येकवेळी पाठविले जाते त्या युनिटची किंमत रोजचेरोज जाहिर केली जाते – किंमतीत वाढ तुमचा फायदा – किंमतित घट तुमचा तोटा. रिलायन्स ग्रोथ फंड – ग्रोथ ची NAV डिसे १९९५ मधे रु १० होती ती जाने २००८ मधे रु ४८० झाली होती व ३० जाने २०१५ रोजी रु ८१५ एवढी झाली आहे, म्हणजेच २० वर्षात गुंतवणूक ८१.५ पट झाली.

माझा पैसा कोठे गुंतवला जातो?

दर सहा महिन्यानी गुंतवणूकीचा तपशिल जाहिर करणे बंधनकारक असते व तो तसा प्रमुख वॄत्त पत्रात जाहिर केला जातो. आघाडीचे फंड दर महा फॅक्टशीट द्वारे जाहिर करतात तो https://www.amfiindia.com यासंकेतस्थळावर उपलब्ध असतो.

मी छोट्या शहरात अथवा गावात अथवा अगदि परदेशात रहातो मी गुंतवणूक कशी करु?

तुम्ही जगात कोठेहि रहात असा तुम्ही सहजपणे गुंतवणूक करु शकता. आमचे मार्फत करणेसाठी प्रथमतः आमचेशी मोबाईल ९४२२४३०३०२ वर किंवा इमेल sadanand.thakur@gmail.com द्वारे संपर्क साधून चर्चा करुन गुंतवणूकीची योजना सुनिश्चित करा. मग एकतर याच संकेतस्थळावरुन फॉर्म डाउन करा व पूर्ण भरुन सही / सह्या करुन सोबत चेक किंवा डीडी व आवश्यक ती कागदपत्रे जोडून आमचेकडे कुरिअर किंवा पोष्टाने पाठवा पुढले सारे आम्ही करु. अथवा आमचेकडे मागणी करा आम्ही तुमची विचारलेली माहिती कळवा आम्ही तो तुमचा फॉर्म तुम्हाला पूर्ण भरुन पाठवू सोबत कागद पत्रांची यादि कळवू आता तुम्ही फक्त फॉर्म सही / सह्या करुन सोबत चेक किंवा डीडी व आवश्यक ती कागदपत्रे जोडून आमचेकडे कुरिअर किंवा पोष्टाने पाठवा पुढले सारे आम्ही करु.

मला काही वाइट अनुभव आला व मला म्युच्युअल फंडाबाबत, तुमचे बद्दल अथवा दुसरे म्युच्युअल फंड वितरकाबद्दल तक्रार करावाची असेल तर ती कोठे करावी?

म्युच्युअल फंड कंपनी बद्दल प्रथम कंपनीला कळवा आफर डॉक्युमेंट मधे कोणाकडे तक्रार करावी याचा तपशिल दिलेला असतो. तेथे तक्रार निवारण न झाल्यास AMFI India कडे अथवा SEBI कडे तक्रार करावी. आमचेबाबत काही तक्रार असेल तर प्रथम आम्हाला कळवा आम्ही लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करु किंवा योग्या मार्गदर्शन करु आणि जर यात आम्ही कमी पडलो तर आमची तक्रार AMFI India कडे अथवा SEBI कडे तक्रार करावी. तसेच दुस-या म्युचल फंड वितरकाबद्दल करावे.

Read more
  • Published in About Mutual Fund
No Comments
Page 6 of 11
« Previous 1 … 4 5 6 7 8 … 11 Next »
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9

अनिवार्य सूचना (Disclaimers)

www.mutualfundmarathi.comया वेबसाईटची निर्मिती हि मराठी भाषिकांना त्यांचे मातृभाषेत म्युचुअल फंड व शेअरबाजाराची माहिती मिळावी म्हणून तयार केलेली आहे. या वेबसाईटची मालकी हि सदानंद ठाकूर याची असून येथील मजकूर पूर्व परवानगीशिवाय अन्यत्र पोस्ट करू नये. Thakur Financial Services ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस ARN-46061 व्दारे म्युचुअल फंड वितरक म्हणून AMFI व अनेक AMC सोबत रजिस्टर आहे. या संकेतस्थळावर दिलेली माहिती, फायनान्शियल प्लानिंग सुविधा, कॅलक्यूलेटर व अन्य सुविधा हि तुमच्या म्हणजे या संकेतस्थळाला भेट देणार्यांच्या माहितीसाठी त्यांनी स्वत: उपयोगात आणण्यासाठी आहे. आम्ही यासाठी कोणतीही फी किवा अन्य कोणतेही मानधन आकारत नाही. ह्याचा वापर करून केलेली गुंतवणूक तसेच परिणाम देईल असा आमचा दावा नाही. म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते. मागील कामगिरी तशीच राहील अथवा राहणार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा. (Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risk, read all scheme related documents carefully. Past performance of the scheme may or may not sustain in future).

Design & Powered By S.N Enterprises

TOP
×